Tuesday, May 9, 2017

आज आमच्या लग्नाला २५ वर्ष झाली परंतु मला २५ वर्षे साथ देणारी मंजुषा ..फक्त पत्नी नाही तर जीवनसाथी! मस्त बहरलेलं नातं.ऋषी , स्वप्नील मुळे आणखीच खुललेलं. २५ वर्ष झाली तरीही नात्यातला टवटवितपणा तोच.
माझी अर्धांगिणी,
माझ्या चांगल्या वाईट दिवसांमध्ये सदैव माझ्याबरोबर असणारी,
कठीण प्रसंगी मला धीर देणारी,
सुखात सर्वांना सामावून घेणारी, दुसर्‍यांचे दुःख कमी करणारी,
प्राचार्यपद सांभाळताना आपल्या कार्यकर्तुत्वाने वेगळा ठसा उमटवणारी,
काम करताना जितकी कठोर आणि निर्णायक भुमिका घेणारी,
तितकीच मनाने हळवी आणि प्रेमळ असणारी,
आज मी जे काही आहे ते फक्त तिच्यामुळेच आहे
माझी बायको जिच्यावर माझे निस्सीम प्रेम आहे..... सहजीवन दिवसेंदिवस बहरतंय. लोकनिंदेने किंवा टिकेने फारसे व्यथित झालो नाहीत. आणि यशाने हुरळून गेलो नाहीत. समजून उमजून घेत, एकमेकाला पूरक राहिलो.
महिलांना सुपरमॅनेजर का म्हणतात, ते मंजुषा कडे पाहिलं की कळतं. एक उत्तम गृहिणी , प्राचार्य पद सांभाळताना उत्कृष्ट प्रशासन उपेक्षित घटकातील मुलामुलींना असणारा तिचा आधार व माझ्यामागे खंबीरपणे उभी राहणारी एक सहचारिणी त्यामुळेच मी गेली २५ वर्षे अनेक संकटाना सामोरे जात संघर्ष करीत टिकून आहे . शिक्षण संस्थेचे काम करताना तिने दिलेले सल्ले मोलाचे ठरले
माझं पत्रकारितेचं करिअर हे सातत्यानं चढउताराचं. मात्र कसलीही कुरबुर न करता तिची साथ कायम राहिली.
हीच मंजुषा आहे. स्वत:च्या हक्काव्यतिरिक्त आणखी काहीच न मागणारी. अगदी हट्ट करूनही गरजेव्यतिरिक्त काहीच न घेणारी.
आज लग्नाला २५ वर्ष झाली. मात्र तेच प्रेम आहे. दिवसागणिक आणखीच मुरत चाललेलं. श्वासासारखंच तिचं अन् माझं नातं आहे!….

No comments:

Post a Comment

वन्यजीवांचीही आबाळ

Swami Amazing Saturday, June 18, 2011 वन्यजीवांचीही आबाळ राजूर, १८ जून/वार्ताहर अकोले तालुक्यातील रतनगड, हरिश्चंद्रगड व कळसूबाई शिखर परिस...