Sunday, May 28, 2017

भंडारदरा परिसरात तुंबळ गर्दी झाल्याने हा एक झगमगता इव्हेंटच झाला होता. पहिला पाऊस पडेपर्यंत हा ‘काजवा महोत्सव’ रोज चालणार आहे.

सायंकाळी सात ते रात्री १० या वेळेत काजव्यांचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांची पदभ्रमंती, चांदण्या रात्री सहकुटुंब स्नेहभोजन, करमणुकीचे कार्यक्रम अशा या काजवा महोत्सवात विविध ठिकाणांहून आलेल्या पर्यटकांनी भाग घेतला आहे. पहिला पाऊस पडेपर्यंत हा महोत्सव रोज अनुभवता येणार आहे. सायंकाळपासून रात्रीपर्यंत राज्यातून आलेल्या पर्यटकांनी विविध झाडांवर चमकणाऱ्या काजव्यांचा चांदण्याच्या साक्षीने प्रकाशोत्सव अनुभवला. चित्रपट, मालिकेत दाखविण्यात आलेले हे चमकणारे काजवे प्रत्यक्ष पाहण्यासाठी पर्यटकांची  भंडारदरा परिसरात  तुंबळ गर्दी झाल्याने हा एक झगमगता इव्हेंटच झाला होता. पहिला पाऊस पडेपर्यंत हा ‘काजवा महोत्सव’ रोज चालणार आहे.
जैवविविधेतमध्ये महत्त्वाच्या आणि दुर्मीळ होत चाललेल्या काजव्यांचे दर्शन ही अनोखी अनुभूती शनिवारी  रात्री पर्यटकांनी अनुभवली. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून पहिल्या पावसाचे आगमन होईपर्यंत पांजरे , उडदवणे , मुतखेल, वाकी या जंगल परिसरातील असंख्य झाडांवर हे काजवे चमकताना दिसतात. याच काळात काजवे नैसर्गिकरीत्या आपल्या प्रकाशाने जोडीदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असतात. काजव्यांचा हा तात्पुरता आशियाना अतिशय देखणा आणि विलोभनीय दिसतो आहे.
निवडक झाडांवरच आढळतो
निसर्गातील अत्यंत अद्भुत असा हा कीटक कळसुबाई सारख्या जंगल परिसरात चमकताना आढळतो. रतनवाडी , घाटघर , बारी , वाकी , मुतखेल , कुमशेत या  जंगल परिसरातील हिरडा, बेहडा, अंजनी, जांभूळ, आंबा, उंबर, करंज या निवडक झाडांवरच हा काजव्यांचा थवा पाहण्यास आढळतो.
  भंडारदरा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या काजवा महोत्सवात शनिवारी  पर्यटकांनी काजव्यांचा अनोखा प्रकाशोत्सव अनुभवला.chukt
" या काजव्यांच्या अंडय़ांचीही गंमत असते. ती एखाद्या बशीत गोळा करून, शांत-निवांत जागी एक-दोन दिवस ठेवायची. मग अंधारात हलकेच बशीवर टिचक्या मारून तरंगलहरी उमटवल्या की, अंडीही लुकलुकून प्रतिसाद देतात. अंडं फुटून नवजात काजवा बाहेर येतो, तो क्षणही चमकीलाच असतो हे बघतांना कुतूहलमिश्रीत आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गवैभव आपण पाहतच राहतो. आणि पाहता-पाहाता भान हरपून जातो." म . टा . वृत्तसेवा , अकोले --भंडारदरा परिसरात काजव्यांच्या मायावी दुनियेचे आजपासुन आगमन झाले असुन कळसुबाई हरिश्ंद्र अभयारण्याच्या अनेक वृक्षराजीवर हे मनमोहक काजवे अधिराज्य करण्यासाठी सरसावले आहेत . संपुर्ण जंगलाला जणु विद्युत रोषणाईने आगच लागल्याचे दृश्य नजरेस अनुभवयास मिळत आहे  . ह्या काजवा महोस्तवाचे आयोजन भंडारदरा येथील महाराष्ट्र पर्यटक महामंडळाने  आयोजित केले असुन काजवा प्रेमीसाठी पर्यटक महामंडळाकडुन अनेक नियम हे काजवा प्रेमीसाठी बनविले आहेत . 
     भंडारदरा म्हटलं कि फक्त जलोस्तवाचीच पर्यटकांना आठवण यायची . पंरतु याच भंडारद-याच्या निसर्गात अजुनही खुप काही दडलेले आहे याची पारख ही भंडारद-याच्या महाराष्ट्र पर्यटन विभागाने नेमकी हेरली. पावसाच्या आगमनाच्या अगोदर काजव्यांची मायावी दुनिया वनसाम्राज्यात कसे राज्य करते हे निसर्ग प्रेमींच्या मनावर बिंबवल . आणि  काजव्यांचा हा निसर्गरुपी अविष्कार पुढे काजवा महोस्तव या नावाने उदयास आणला .या काजवारुपी प्रकाशफुलांचा जंगलामध्ये झाडावर चाललेला पाठशिवनीचा खेळ पाहण्यासाठी पुणे , मुंबई , नासिक या प्रमुख शहरासह संपुर्ण महाराष्ट्रच नाही तर परराज्यातुनही अनेक निसर्गप्रेमी आसुसलेले आहेत .
हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा मोजक्याच झाडांवर काजव्यांचा काही दिवसांचाच‘बसेरा’ असतो.आदिवासी खेड्यांच्या शिवारातली सहस्रावधी झाडे अक्षरशः कोट्यवधी काजव्यांनी लगडून गेली आहेत. ज्या विशिष्ट झाडांवर काजवे 'वस्ती'ला आलेले आहेत, ती झाडे 'ख्रिसमस ट्री'सारखी दिसताहेत! झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर अगणित काजव्यांची आरास केलीये! त्यांचे कित्येक भाईबंद झाडांभोवती पिंगा घालताहेत. विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरुये. एका लयीत, तालात अन् सुरातही! आपण बघितलं ते दृश्य आणखीन कोणाला दाखवण्याच्या हेतूने हातातले मोबाईल किंवा डिजिटल कॅमेरे फोटोसाठी पुढं सरसावतात. काजवे काही कॅमेऱ्यांना बधत नाहीत, ते काही केल्या जेरबंद होत नाहीत! आम्हाला बघायचंय तर तुमचे डोळे हेच जगातले उत्तम कॅमेरे आहेत, असेच जणू काजवे आपल्याला सांगताहेत. लखलख तेजाची ती चंदेरी दुनिया बघताना आपण धरणीवरचा स्वर्ग पाहात असल्याची भावना मात्र आपल्या मनाला आत आतपर्यंत सुखावत राहते...    
       काजवा म्हणजे एक स्वयमप्रकाशी किटक . मे महिण्यात त्याचे जिवनचक्र सुरु होते . सुरुवातीला त्यांची संख्या अगदी अत्यल्प असते . पुढे जुन महिण्याच्या मध्यापर्यंत त्यांच्या संख्येत वाढ होऊन प्रचंड मोठी भर पडते . मोसमी पावसाच्या तोंडावर ही संख्या लक्षावधी होते . तेंव्हा तर या भागातील अनोख्या काजवा महोस्तवाचा ख-या अर्थाने क्लायमॅक्स होतो . अंडी , अळी , कोश , असा जिवनप्रवास करणा-या काजव्यांच्या अळीचे दोन आठवड्यात प्रोढावस्थेत रुपांतर होते . जगभरात काजव्यांच्या जवळपास दोन हजार जाती आहेत . अळीतुन प्रोढावस्थेत जातो तेंव्हा काजवा हा स्वयंप्रकाशी बनतो . मंद काळसर किंवा पिवळ्या तांबुस रंगाच्या या किटकाच्या मादीपेक्षा नराचे पंख जास्त विकसित झालेले असतात . तुलनेने माद्या ह्या काहीशा सुस्त असतात . निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या आकाराच्या रंगाचे काजवे दिसुन येतात . पिवळा , हिरवा , नारंगी , निळा , पांढरा , तांबडा असे रंग काजवे उधळत असतात . मे - जुन महीण्याचे हे दिवस म्हणजे काजव्यांचा प्रजनन काळ असल्याचा अभ्यासकांचा कयास आहे . आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी हा किटक चमचम करीत असतो . नर आणि मादीच्या मिलनानंतर नराचे जिवनचक्र थांबते . काजव्यांची वाढत जाणारी संख्या पावसाच्या आगमनाची वर्दी देतात . मोसमी पाऊस दाखल झाला कि पुढे तो चांगलाच जोर धरतो . नंतर त्याचे रौद्र तांडव सुरु होते . या रपाट्या पावसामुळे इटुकल्या - पिटुकल्या काजव्यांच्या जिवनचक्राचीही अखेर होते . तशी ही मयसभा देखील संपुष्टात येते  सोबत फोटो

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...