Sunday, May 7, 2017

राजूर , ता . ७:केळी रुम्हणवाडी येथील आदिवासी ठाकर वस्तीच्या व तीर्थक्षेत्राच्या जवळ ग्रामपंचायतने अनधिकाराने विरोध असतानाही ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन मयत व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी कोंभाळणे पुलाजवळ नदीपात्रालगत शासकीय निधीचा वापर करून स्मशान भूमी बांधली असून वस्तीतील लोक मरणयातना भोगत असून त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असून अनेक वेळा प्रशासनाला अर्ज करूनही न्याय मिळत नसल्याने हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्याचा निर्णय मागणी आदिवासी ठाकर समाजाचे उमाजी रावजी मेंगाळ व ५० आदिवासी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे केली आहे . याबाबत निवेदनात म्हटले आहे कि , केळी रुम्हणवाडी येथे मयत व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी कोंभाळणे पुलाजवळ नदी पात्रालगत शासकीय निधीचा वापर करून स्मशान भूमीचे बांधकाम गट नंबर ३०० व मिळकत नंबर ४०९मध्ये केलेले होते ग्रामसभा २६ जानेवारी २०१५ चे ग्रामसभेत सदर स्मशान भूमी गट नंबर ४२१ मध्ये घेणेबाबत इतर समाजाच्या उपस्थितांनी मांडला मात्र आम्ही आदिवासी ठाकर समाजाची वस्ती या गट नंबरमध्ये असल्याने व पेसा अंतर्गत स्वतंत्र गाव असूनही आमच्या विरोधाला न जुमानता ४२१ मध्ये ज्या ठिकाणी पवित्र केळेश्वर महादेव मंदिर समोर व पेसा अंतर्गत नवीन तयार झालेल्या तीर्थक्षेत्र अंतर्गत वस्तीच्या बजरंगपूर गावात घराजवळ हे स्माशानभूमी घेण्याचा ठराव पास करून गेली ४० वर्षांपासून आम्ही राहत असलेल्या वस्तीतील लोकांना या निर्णयामुळे त्रास सहन करावा लागत असून या ठरावाच्या विरोधात ४ फेबूर्वरी २०१५ ला अर्ज देऊनही गेली दहा महिन्यापासून कोणतेही दखल घेतली नाही उलट ३० डिसेंबर २०१५ रोजी इतर समाजाच्या व्यक्तीमार्फत सरपंच ग्रामसेवक यांनी जेसीबी ने रास्ता करून बांधकाम सुरु केले आहे व अगोदरचे मोडकळीस आलेले स्मशानभूमी तसेच ठेवून दुसरे बांधकाम करून आमच्या आदिवासींवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे १२ जानेवारी २०१६ ला विशेष ग्रामसभा घेऊन जागेबाबत वरिष्टाना कालवून निर्णय घेण्याचे ठरले तरीदेखील आमच्या वस्तीजवळ स्मशान भूमी अस्तित्वात नसताना ८ प्रेतांचे दहन करण्यात आले सदर प्रेत जळत असताना उग्र वास यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले असून याठिकाणी राहणे मुश्किल झाले आहे याबाबत पालकमंत्री ., ग्रामविकास मंत्री याना भेटून मुख्य कार्यकारी अधिकारी , तहसीलदार याना आदेश देऊनही आजपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने हा प्रश्न विधानसभेत मांडावा यासाठी आम्ही वस्तीतील राहणारी सर्व ठाकर समाजाचे लोक मंत्रालयात जाऊन हा प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी विनंती करणार आहोत तसेच संबंधित अधिकारी याना निलंबित करण्याची मागणी हि करण्यात येणार आहे तर काही गावगुंडांकडून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला गेला असून आमच्या वस्तीला पोलीस संरक्षण मिळावे असेही निवेदनात म्हटले आहे यावर उमाजी मेंगाळ , रावसाहेब पथवे ,अशोक तळपाडे ,नामदेव मेंगाळ, दामोदर मेंगाळ, महादू मेंगाळ, एकनाथ मेंगाळ, मावजी उघडे , भिका उघडे , तुकाराम उघडे , सुरेश उघडे , पांढरी उघडे,सोमनाथ उघडे, ढवळा उघडे, लहू उघडे, राजेंद्र उघडे, संजय उघडे, अर्जुन उघडे , सीताराम मेंगाळ , लक्ष्मण मेंगाळ ,कळू मेंगाळ, वसंत मेंगाळ , नवशिराम मेंगाळ , बुधाबाई मेंगाळ विलीन मेंगाळ आदी ५० ग्रामस्थांच्या सुवाक्षरी आहेत . आदिवासी समाजाला वेठीस धरण्याचा हा प्रकार असून याबाबत आपण लक्ष्य घालणार असल्याचे भाजपचे तालुका ध्य्क्ष सीताराम भांगरे यांनी सांगितले तर जिल्हा परिषद सदस्य डॉ . किरण लहामटे यांनीही या प्रश्नात लक्ष्य घालून न्याय मिळवून दिला जाईल असे म्हटले आहे .











No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...