Thursday, November 11, 2021

वाघ बारस

आदिवासीं बांधवांचे जीवन पावण करणारा दिवस म्हणजे “वाघबारस”
अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात मात्र वाघबारस साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही आदिवासी बांधवांनी तितक्याच उत्सवाने जपली आहे. व्हिडीओ आवडला तर नक्की लाईक व सबक्राईब करायला विसरू नका.
.https://youtu.be/gpTkHFlCMUg

वाघ बारस

आदिवासीं बांधवांचे जीवन पावण करणारा दिवस म्हणजे “वाघबारस”
अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात मात्र वाघबारस साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही आदिवासी बांधवांनी तितक्याच उत्सवाने जपली आहे. व्हिडीओ आवडला तर नक्की लाईक व सबक्राईब करायला विसरू नका.
.https://youtu.be/gpTkHFlCMUg

Tuesday, November 2, 2021

वाघ बारस

🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯

*"वाघबारस "*

आदिवासी समाजात बारशीला वाघ्या / वाघदेवाची पुजा करतात. त्यालाच वाघबारस असे म्हणतात.वाघ्या हे आदिवासी कोळी महादेव समाजाचे पुज्य दैवत आहे. प्रत्येक गावाच्या शिवारावर (हद्द) किंवा खिंडीत (दोन डोंगरामधील भाग) वाघ्याची प्रतिकात्मक स्थापना केलेली आढळून येते. गावापासून ज्या ठिकाणी जंगलाची हद्द सुरू होते अशा ठिकाणी वाघ्या असतो. या मागचे कारण म्हणजे ज्या ठिकाणाहून जंगल सुरू होते तेथूनच वाघ्याचे राज्य सुरू होते.तो जंगलाचा राजा असल्याने त्याची मनोभावे सेवा केल्यास तो जंगलातील इतर प्राण्यांपासून आपल्या जनावरांचे रक्षण करील व आपल्यावरही त्याची सदैव कृपादृष्टी राहील. अशी आदिवासी बांधवांची श्रद्धा असते. 
    
      काही ठिकाणी वाघ्याला गोड खिरीचा (गोडी वाघबारस) तर काही ठिकाणी तिखटाचा( मटणाचा किंवा बोंबलाचा) नैवेद्य (बोंली वाघबारस) वाघ्याला दाखविला जातो  आंबेगाव तालुक्यातील पिंपरगणेच्या वाघोबाला दुध-खिरीचा नैवेद्य तर वारंघुशी, खेतेवाडी, शेणित, एकलहरे येथील वाघ्याला मटणाचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. गावातील गुराखी वाघबारस साजरी करताना वाघ्या समोर पाच नैवेद्य ठेवतात. त्यांच्यातीलच पाच जण वाघ्ये बनून ते पाच नैवेद्य पळवितात. त्यावेळी इतर जमलेली मुलं त्यांना मागून चिभडाने मारतात. सर्वजण वाघ्यावर रचलेली गाणी म्हणतात. जसे की....

'वाघूबा देवा-वाघूबा देवा
घोर नको लावू आमच्या जीवा
नको बाबा वाट धरू
नको गुरं-ढोरं मारू
आज हाय वाघबारस 
फेडीतो आज तुझा नवस
रागू-रूसू नको आम्हांवरी
आमची माया तुझ्यावरी
वाघूबा देवा..

 - संतोष मुठे
🌿🐾🐾🌿🐾🐾🌿🙏

Sunday, October 24, 2021

गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -88-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
    8308677799
    8806150248     
          https://kavitatavhare.blogspot.com/2021/10/blog-post_21.html       

*अहमदनगर जिल्ह्यातील अद्भूत निसर्ग सौंदर्य लाभलेल्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे गाव हे तिचे माहेर आणि सासरही.अकोले तालुक्यातील लोक अतिशय निसर्गप्रेमी,प्रचंड कलासक्त,शेतीवर भरभरून प्रेम करणारे.हे गुण लहानपणी तिच्याही अंगी होते.लोकांना येणारे विविध आजार हे रासायनिक शेती आणि हायब्रीड वानांमुळे तर येत नसावे असा विचार तिच्या मनात येतो.आणि मग सुरू होतो विषमुक्त शेती करण्याचा सर्वाना थक्क करणारा प्रवास.याला ती इतकी वाहून घेते की देशी अस्सल 52 पिकांचे 114 वाण तिच्याकडे साठवले जातात. पुढे बायफ या संस्थेच्या माध्यमातून कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन संस्था स्थापन करून देशी बियाणांची बचत बँक स्थापन करते.ती स्त्री म्हणजे भारताची  सीड मदर,बीजमाता पदमश्री राहीबाई पोपेरे*.                             

राहीबाई यांच्या या जगावेगळ्या कामाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांचा पदमश्री हा किताब देऊन सन्मान केला आहे. त्याचबरोबर त्यांना बी.बी.सी शंभर प्रभावशाली महिला, नारीशक्ती पुरस्कार ही मिळाले आहे.जगातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय  बियाणे कंपनी  कडे नाहीत असे गावठी वाण राहीबाई यांच्याकडे उपलब्ध आहेत.नुसते वालाचे 20 प्रकार त्यांच्याकडे आहेत.गावठी पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या,वांगी,भेंडी,पालक,मेथी,आंबा,यारखे अनेक गावठी वाण त्यांच्या सीड बँकेत आहेत.म्हणूनच महान शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी त्यांना दिलेली 'सीड मदर' ही उपाधी सार्थ ठरते.त्यांच्या शेजारील बागेत शेकडो झाडे लावून त्यांची नावेही सहज सांगणाऱ्या राहीबाई यांचे कोणतेही औपचारिक शिक्षण नाही.पण त्या शिक्षित माणसाला ही आपल्या अफाट ज्ञानाने विचार करायला भाग पाडतात.गावठी वाणाचे संरक्षण व संवर्धन करणे यासाठीच जणूं त्यांनी आपले आयुष्य वाहून घेतले आहे.या बिया त्या मडक्यात जतन करून ठेवतात.    

   *गावरान वाण शोधणे, त्यांची लागवड करणे,त्यांच्या बिया काढणे,त्या संकलित करणे,त्या इतरांना पेरणीसाठी देणे,त्यांना प्रेरणा देऊन बियांचे संकलन करणे ही मोठी प्रक्रिया करण्यासाठी राहीबाई यांनी तीन हजार पेक्षा अधिक महिलांचा बचत गट तयार केला आहे.हे सगळे करताना  कुटुंब ,बायफ संस्था, कोंभाळणे ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे सांगायला त्या विसरत नाही.सुरवातीला त्यांनी गावठी वाण जमा करण्याचे  काम सुरू केले तेव्हा फक्त त्या एकटया होत्या,पण त्या थांबल्या नाहीत.त्यांचे जीवन आपल्याला हेच सांगत रहाते सगळे शिक्षण पुस्तकात मिळत नाही,काही अनुभवाच्या शाळेतच शिकावे लागते.आणि त्यासाठीही  अफाट मेहनत करावी लागते.कष्ट उपसावे लागतात.मग यश पहाण्यासाठी लोकांची रांग लागते*.

Tuesday, October 19, 2021

माझी आई सौ.हेमलता मधुकरराव पिचड


माझी आई सौ.हेमलता मधुकरराव पिचड 


(आदर्श सरपंच ग्रामपंचायत कार्यालय, राजूर, ता.अकोले, जि.अहमदनगर)


माझ्या आईला प.पू.स्वामी गगणगिरी महाराज यांचे आशिर्वाद मिळाले, त्या अध्यात्मिक संस्काराचा ठसा माझ्या बालमनावर उमटला आणि त्यातूनच मी घडलो. एखाद्या शिल्पकाराने मूर्ती नव्हे तर एखादी लेणी कोरावी असे अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सर्वार्थाने जाणिवेचे संस्कार माझ्यामध्ये आईनेच साकार केले. याच शिदोरीच्या बळावर माझा सामाजिक व राजकीय प्रवास घडला. लहानपणापासूनच माझ्यावर माझ्या आईचे संस्कार असल्याने माझ्या मनात कुणाच्याही विषयीही द्वेषभावना राहिली नाही, ती नष्ट झाली, मनात दुस­यांविषयी आपुलकी, प्रेम,आस्था, जिव्हाळा तयार झाला. दुस­र्‍यांना मदत करण्याची वृत्ती व भावना माझ्या मनात बळावली.त्यामुळे मी लहानपणापासूनच माझ्या मित्रांना, नातेवाईकांना प्रेम दिले. उपेक्षितांना न्याय देण्याचे काम केले आहे. जनतेला न्याय देण्याची प्रवृत्ती, सामाजिक बांधिलकी, लोकांना न्याय देण्याची भुमिका 80 टक्के समाजकारण व 20 टक्केच राजकारण मी व माझे सर्व कुंटुब करीत आहे. प्रत्येकाला मदत करण्याची वृत्ती व सतत काम करण्याची सवय मी माझ्या आई-वडीलांकडून घेतली आहे. यातूनच माझ्यातील उपजत असणाऱ्या नेतृत्वगुणाला वाव मिळाला .समाजकारणातूनच राजकारण आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या माध्यमातून तसेच अकोले तालुका एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा व गरीब दिनदुबळयांचे अश्रु पुसून समाजकारण व राजकारण करावे ही भावना माझ्या मनामध्ये माझ्या आईने रुजवली. त्यामुळे तिने सांगितलेले नियमांचे मी काटेकोरपणे पालन करत आहे, म्हणून माझी आई समाधानी आहे. मी राजकारणात येण्यापूर्वी अतिशय मुत्सद्देगिरीने समाजहितासाठी माझ्या आईने मला अध्यात्मिक संस्कार व समाजकारणाचे धडे दिले आहे. त्यामुळे मी राजकारणातही त्याच पध्दतीने काम करीत आहे. घरातील प्रासंगिक दु:खद घटनेच्या वेळी आईने मला धिरोदत्त मार्गदर्शन केले. माझे लहान बंधू कै.जितेंद्र पिचड यांचे दु:खद आकस्मिक निधन झाले त्यावेळी माझे धैर्य फार खचले होते, माझ्या अनुपस्थितीत माझे मोठे भाऊ हेमंत व लहान भाऊ जितेंद्र हे सामाजिक व राजकीय काम करत असत. व मला नेहमी आधार देत असत. माझे लहान बंधू जितेंद्र यांचे आकस्मिक निधन झाल्याने तो आधार अचानकपणे निघून गेल्याने मी एकटा पडलो त्यावेळी माझ्या आईने मला धीर दिला. परमेश्वरकृपेने, प.पू.स्वामी गगणगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने या दु:खातून मी व माझे सर्व कुंटुब बाहेर पडलो व पुनश्च सामाजिक व राजकीय कामात पुन्हा व्यस्त झालो. त्यावेळी आईने मला सांगितले की, तुझा एक भाऊ गेला असला तरी तुझ्या कामातून, तुझ्या वागण्यातून तू अनेक भाऊ तयार कर, तू भिऊ नकोस प.पू.स्वामी गगणगिरी महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठिशी उभे आहेत असा मला माझ्या आईने धीर दिला. त्यामुळेच ख­या अर्थाने सामाजिक जीवनाचा, राजकारणाचा माझा प्रवास सुरु झाला. माझ्या आईचे माझ्या दोन्ही भावांवर व माझ्यावर प्रचंड प्रेम होते व आहे. माझ्या लहान भावाच्या दु:खद निधनामुळे माझ्या आईच्या मनावर देखील फार परिणाम झाला होता, तिला अतिव दु:ख झाले होते त्या दु:खातूनही आईने आपले दु:ख बाजूला सारुन मला धीर देण्याचे काम केले. तिच्या या आधारामुळेच मी आज राजकारणात व समाजकारणात मार्गक्रमन करत आहे. भावाच्या दुखात असताना अनेकांनी मला धीर दिला असला तरी आईचा आधार हा लाखमोलाचा ठरला आहे. 


राज्यात मी राजकीय काम करीत असताना माझा 2019 ला भारतीय जनता पार्टीमध्ये जाहिर प्रवेश झाला व थोडया दिवसात महाराष्ट्र विधानसभेच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून मी भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढवली. परंतु त्यात माझा पराभव झाला. त्यामुळे मी अक्षरश: खचून गेलो होतो. मी राजकारणातून निवृत्ती घ्यावी की काय? या मनस्थितीत होतो, हा विचार माझ्या मनात आला. मात्र हे माझ्या आईच्या लक्षात आल्याने तिने मला जवळ बोलावून घेऊन सांगितले की, लोकशाहीमध्ये हार-जीत असतेच त्यामुळे तर तिला लोकशाही म्हणतात. जनमानसावर राज्य फक्त पद असल्यानेच करता येते असे नाही. निवडणूक ही एक प्रक्रिया आहे. त्यात ज्या माणसांनी तुझ्या बाजूने कौल दिला त्या सर्वांना न्याय देण्यासाठी समाजहिताची कामे या पुढील काळात सातत्याने करावी लागतील. आपल्या कामाने जनतेमध्ये जावून आपल्या ऊणिवा दूर करण्याचे काम तू कर, तुला यश निश्चितच मिळेल त्यामुळे तू खचून जाऊ नकोस, तू जर खचला तर तुझ्याजवळ व तुझ्या सोबत असलेले कार्यकर्त्यांनी काय करायचं ? त्यांना या संकटात आधार देण्याचे काम तू केले पाहिजे, तुला मिळालेले मते हे दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. त्यामुळे त्यांचा तू विचार कर, आदर कर .आईच्या या सल्ल्याने मी पुन्हा नव्या जोमाने माझ्या कामाला सुरुवात केली.


माझ्या आईने सर्व मुलांना सारखेच प्रेम दिले. वाढदिवस व लग्नसमारंभात लहान व मोठया कौटुंबिक सदस्यांना आनंद देण्याचे काम माझ्या आईने केले आहे. घरातील सणसुद व वाढदिवस या वेळेसही सर्वांना बरोबर घेवून तिने काम केले आहे. भावा-भावांमध्ये समन्वय राखत जा, कुंटुंबातील सणसुद नातेवाईकांच्या समारंभात एकत्र राहून तिथे जाऊन त्यांच्या आनंदात आनंद मानून त्यांना धीर व आनंद देण्याचे काम मला माझ्या आईमुळे करता आले. आमच्या घरातील वाढदिवस व सणासुदीला आमचे तिन्ही चारी कुंटुंब एकत्र येत आम्ही सर्व कौटंुंबिक आदर्श जोपासला आहे. 


सामाजाचा पैसा काटसरीने वापरायचा असतो, एक-एक पैसा जमा करायचा असतो, त्यात काटकसर करुन आपल्या कामाचे कसब दाखवायचे असते. यातूनच मी चांगला धडा घेवून बंद पडायच्या स्थितीत असलेला अमृतसागर दूध संघ या संघाचा मी चेअरमन झालो. हा दूध संघ अल्पवधीतच मी चांगल्या नावारुपाला आणला. आज 8 कोटी पेक्षा जास्त हा संघ मी नफ्यामध्ये आणला आहे. याचे कारण काटकसरीने कसे काम करायचे ही शिकवण मला माझ्या आईने दिली. मला कसलेही व्यसन नाही, काटकसर, चांगल्या पध्दतीची वागणी, वायफळ खर्च करायचे नसतो या सर्व गोष्टीतून मी चांगले शिकलो व माझ्या आई-वडीलांची प्रत्येक शिकवण मला कामी आली. अशाप्रकारे सर्व सहकारी संस्थामध्ये व शैक्षणिक संस्थामध्ये मी चांगले काम करणार आहे. आईने मायाममता तर दिलीच पंरतु सामाजिक जीवनात कसे जगायचे, वागायचे, काटकसर कशी करायची, गरीबांना न्याय देण्याचे काम कसे करायचे ही सगळी भुमिका आईने पार पाडली आहे. वडील राजकारणात काम करत असायचे त्यांना पुरेसा कुंटुंबासाठी वेळ देता येत नव्हता. परंतु आईने ती दोन्ही भुमिका पार पाडली, आम्हा सर्व मुलांना संस्कार दिले आमच्या सुखदुखात, आमच्या पालनपोषणात, आमच्या शैक्षणिक जीवनात तिने चांगली भुमिका पार पाडली आहे. आमचे चार कुंटुब आहेत, त्यांचे हायकमांड माझे आई-वडील आहेत. आईच्या अस्तित्वामुळे आम्ही सर्व एकत्र राहतो, समाज व्यवसनापासून दूर कसा राहिल ही आईची शिकवण आहे. निरव्यसनी समाज ही आईची भुमिका, आईचा शब्द हा प्रमाण मानला जातो, चारही कुंटुंबात देवभक्ती वाढविणे, निरव्यवनी राहणे हे धडे आईकडून आम्हा सर्वांना मिळाले आहे. माझे व भावाचे शिक्षण  भोसला मिलिट्री स्कुल नाशिक येथे झाले आहे. लहान पणापासूनच कष्ट, साहेबांच्या पाठिमागे भक्कमपणे उभा राहिलो, लहानपणापासूनच अगदी 10 वी मध्ये असल्यापासूनच शेतावर जाणे, साहेबांनी सांगितलेले काम व्यवस्थितपणे करणे. बालपणापासून ते शिक्षण, सामाजिक काम, राजकारणात काम करणाताना अनेक संकटे आले, अनेक प्रश्न उभे राहिले, त्यातूनही मार्गक्रमन करीत आजवर इथेपर्यंतचा प्रवास चालू राहिला यातून मला अनेक चांगले मित्र व कार्यकर्ते मिळाले आहेत. संस्कार

माझी आई ही माझ्यासाठी सर्व काही आहे आणि माझ्यासाठी देव सुद्धा आहे. माझ्या आईने लहानपणापासून मला चांगले संस्कार देऊन मला घडवले आहे. जर मला काही लागलं तर ओठावर येणार पहिला शब्द म्हणजेच – आई.

तसेच संकटाच्या वेळी साथ देणारी आणि दुःख सोसून सुखात ठेवणारी आई असते. माझी आई हि माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. कारण ती आपल्या सोबत राहून किती जबाबदारी पार पडत असते.

माझी आई जर का आजारी पडली तर आम्हा सर्वाना संपूर्ण घर आजारी पडल्यासारखं वाटतं. तेव्हा असं वाटतच नाही कि, हे आपलं घर आहे. माझी आई नेहमी जी कामे करते ती कामे इतर कोणालाही करून संपत नाही

आई मायेचा सागर

आई हि मायेचा सागर आहे. या विषयावर अनेकांनी काव्ये आणि निबंध लिहिले आहेत. रामायणात प्रभू श्रीरामचंद्रांनी सांगितले होते की" जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी " स्वर्णमयी लंकेपेक्षा आणि स्वर्गापेक्षा आपली अयोध्या या जन्म भूमीला सर्वश्रेष्ठ मानले आहे.हे सांगताना त्यांनी आपल्या जन्मभूमीची बरोबरी आईशी केली आहे.


 मराठीमध्ये प्रसिद्ध कवी यशवंत यांनी आपल्या कवितेमध्ये स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी हि ओळ लिहून आईची महानता वर्णविली आहे.


आईच्या समाजकारणाची दिशा अतिशय योग्य असल्याने तिने दिलेल्या सामाजिक आदेशाची अंमलबजावणी डोळे झाकून जरी केली तरी ते नेहमी समाजहिताचे ठरले. आदर्श सरपंच असताना आईने वसुंधरा पुरस्कार मिळवताना केलेले काम हे फक्त मानवजातीच्या कल्याणाचे आहे. राजूरच्या चौतर्फा लावलेली झाडे उद्या निश्चित वनराईचे स्वरूप प्राप्त करतील नेहमीच समाजहित व मानवजातीचे कल्याण हा सामायिक हेतू ठेवून समाजकारण व राजकारण करण्याचे धडे तिने मला दिले. निश्चितच तिच्या तत्त्वांनी केलेला प्रवास हा मला फलदायी ठरेल यात कुठलीही शंका नाही.

  🍂 ' गावच्या विकासात्मक राजकारणाची बाब सोडल्यास आईने कधीही तालुका , जिल्हा अथवा राज्याच्या राजकीय घडामोडीं संदर्भात मतप्रदर्शन केले नाही . मोठ्या पदांकरिता हस्तक्षेप केला नाही . 


  🍂   व्यसनमुक्ती , वृक्षसंवर्धन - वनक्षेत्र वाढीस लागावे यासाठीची तळमळ , ग्रामस्वच्छता मोहीम याबाबत मात्र आईने गावच्या विकासकामांसाठी फार मोलाची कामगिरी करुन वेळ दिला आहे . 

   


    🍂 घरातील माणसांसाठी ती कायमच प्राधान्यक्रमाने  सर्वप्रथम मोलाचा भावनिक आधार राहिली आहे . शक्यतो सामंजस्याने - सौजन्यशील भावनेतून कोणतीही समस्या सोडविण्यावर आईचा कटाक्ष असतो . 

   


    🍂 संस्कार हे सहजगत्या रुजविण्याचा आईंचा प्रयत्न असतो . कोणताही जाणीवपूर्वक घटनाक्रम दिखाऊपणातून नसतो किंवा मग अहंकार देखील नसतो की आपण संस्कार जोपासतो आहोत असा ! 

  


   🍂  साधेपणा - निगर्वी स्वभाव , प्रयत्नवादी भूमिका , अंत:करणातील तळमळ , जपलेली जिव्हाळ्याची नाती हे सद्गुण आईचे बलस्थान आहेत .. 

शब्दांकन - मा.आ.वैभवराव मधुकरराव पिचड

   @@@@


Sunday, October 17, 2021

प्रधानमंत्री वनधन विकास योजना’ व ‘शबरी आदिवासी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ‘आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थे’ने ‘प्रधानमंत्री वनधन विकास योजना’ व ‘शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळा’च्या माध्यमातून सुरु केलेल्या ‘वनधन केंद्रा’मार्फत गौणवनउपजावर प्रक्रिया करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.

या संस्थेला आता १ कोटी, ५७ हजार रूपयांचा गुळवेल पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे. यामुळे वनवासी समूहातील कुटुंबीयांना आर्थिक उत्पन्नाचा शाश्वत मार्ग सापडला आहे.

 

adivasi inmarathi 4

 

वैदिक काळापासून आपल्या देशात वनौषधींचा वापर होत आलेला आहे. मुख्य म्हणजे ऋषिमुनींनी ’आयुर्वेद’ ही जगाला दिलेली देणगी आहे. जंगल ही वनौषधी निर्मितीची मुख्य केंद्र आहे.

भारतातील जंगलात सुमारे ४५ हजार वनस्पतींचे प्रकार आढळतात. शतावरी, अश्वगंधा, सर्पगंधा, अडुळसा, कळलावी, सफेद मुसळी, वेखंड, ब्राह्मी, गुळवेल, गुंज, वावाडिंग, रक्तचंदन, बिवळा, बिबा, हिरडा, बेहडा, आवळा, बेल, ऐन, सीताअशोक, अर्जुन, केवडा त्यातीलच काही वनस्पती आहेत. आजही वनवासी समूह आपला उदरनिर्वाह या उपजांच्या माध्यमातून करत असतात.

सध्या कोरोना संकटामुळे वनौषधींना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. बदलती जीवनशैली, तणावाखालील जीवन, ‘फास्ट फूड’, दूषित वातावरण यामुळे अनेक रोग निर्माण झाले असून त्याच्या उपचारांवर औषधी वनस्पतीला विशेष महत्त्व आहे.

 

 

adivasi inmarathi 7

हे ही वाचा – तंत्रज्ञानाची कास धरून हा स्मार्ट शेतकरी घरबसल्या २०० एकर शेतावर ठेवतोय लक्ष!!

जागतिक पातळीवर वनौषधींना मोठी बाजारपेठ आहे. आता जगातील अनेक देशही त्याकडे आकर्षित झाले आहेत. जागतिक बाजारपेठेत वनौषधींची मागणी १४ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक आहे. या बाजारपेठेत चीनचा वाटा १९ टक्के आहे, फ्रान्स ६० टक्के, जर्मनी सात टक्के, तर भारताचा वाटा मात्र नऊ टक्क्यांवर आहे. मात्र, केंद्र सरकार वनौषधींचे उत्पादन वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

आदिवासी डोंगराळ भागातील अनुसूचित जमातींच्या कुटुंबांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठतीं ‘शबरी वनवासी वित्त व विकास महामंडळ’ व ‘केंद्रीय जनजाती केंद्रीय मंत्रालय (ट्रायफेड)’ यांच्या मार्फत ‘पंतप्रधान वनधन योजना’ प्रभावीपणे राबविली जात आहे. देशात ११०० वनधनकेंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात ‘आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन’ने कोकण विभागात रायगड १५, रत्नागिरी ९, ठाणे १५ आणि पालघर जिल्ह्यात ३० प्रस्थापित वनधन विकास केंद्रे मंजूर केली आहेत. सध्या वन गौण उपज संकलन करण्याचा हंगाम सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ‘आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थे’ला वनधन केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे.

ध्येयवादी तरुणांमुळे घडून आला बदल

शहापूर तालुक्यातील खरीड या वाडीत कातकरी समूह मोठ्या प्रमाणात राहतो. दीड वर्षांपूर्वी रोजगारासाठी इथला कातकरी बांधव शहरात स्थलांतर करत असे. महिला वीटभट्ट्यांवर काम करत.

आर्थिक अडचणींमुळे अनेकांच्या इच्छा आणि गरजाही पूर्ण होत नसत. आर्थिक परिवर्तन घडवून आणल्याशिवाय समाजाला स्थिरता प्राप्त होणार नाही, हे वाडीतील २७ वर्षीय सुनील पवार या तरुणाने ओळखले.

 

adivasi inmarathi

 

दहा-बारा तरुण सजग मित्राच्या मदतीने ‘आदिवासी एकात्मिक विकास संस्थे’ची स्थापना केली. यामुळे कातकरी समूहात नवी जाणीव जागृत निर्माण झाली.

सुनील यांनी मोठ्या कष्टाने शिक्षण घेतले आहे. त्यांचे विचार व त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरले आहे. कातकरी समूहाचा उत्कर्षाचा मार्ग कसा गवसला, याविषयी सांगताना सुनील म्हणतात, “माझं बालपण खरीड या कातकरी वाड्यावर गेलं. आईवडील वीटभट्टी व खडी फोडण्याचं काम करत.

 

adivasi inmarathi 6

 

पाड्यावरचे सर्वच लोक रोजगाराच्या शोधात शहरात स्थलांतर करत. हे वास्तव मी लहानपणापासून पाहत होतो. पुढे काही सामाजिक संस्थेच्या ओळखी झाल्या. त्यांचे काम पाहून मी ‘आदिवासी एकात्मिक विकास संस्थे’ची स्थापना केली.

एकदा मी नाशिक इथे ‘वनवासी भवना’त ‘प्रधानमंत्री वनधन विकास योजने’ची माहिती घेतली. ‘शबरी आदिवासी मंडळा’चे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी विश्वास दाखवून वनोउपज जमा करण्यास प्रोत्साहित केले. पहिल्यांदा २९ कातकरी मुले या कामाशी जोडलो गेलो. आता ८५ कातकरी वाड्यावरचे दोन हजार कातकरी या कामात सहभागी झाले आहेत.”

सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे डॉ. दिगंबर मोकाट (वनशास्त्र विभाग) प्रशिक्षण देतात. ठाणे येथील ‘मजूर फेडरेशन’चे संचालक अरूण पानसरे यांनी विनामोबदल्यात संस्थेच्या कार्यालयासाठी जागा दिली.

सहा ‘वनधन केंद्रां’ची स्थापना

शहापूर तालुक्यातील ३०० कातकरी कुटुंब ‘वनधन केंद्रां’शी जोडली गेली आहेत. शहापूर, मोखावणे, ढाकणे, वेहळोली, खरीड व अल्याणी या सहा आदिवासी पाड्यांवर ‘वनधन केंद्र’ सुरू आहेत.

सर्व केंद्रांना सरकारकडून अर्थसाहाय्य मिळाले आहे. केंद्रांच्या माध्यमातून पळस, रुई, आघाडा, पिंपळ, शमी, खैर, उंबर, दर्भ, दुर्वा अशा नवग्रह समिधा विक्री होते, तर हिरडा, बेहडा, आवळा, गुळवेल, मोहफुले, शिकेकाई, गोखरू, नागमोथा असे जवळपास ३५० वनोउपज खरेदी व विक्री केले जातात.

 

adivasi inamrathi 1

 

महिलांसाठी बचत गट स्थापन करून पत्रावळी प्रशिक्षण दिले जाते. मेणबत्ती व अगरबत्ती तयार करणे, पापड बनविणे, औषधी, पावडरी तयार करणे अशी विविध प्रशिक्षणे या केंद्राच्या माध्यमातून दिली जातात.

या ‘वनधन विक्री केंद्रां’तून अनेक मोठे उपक्रम चालवले जातात, तसेच गुळवेल पावडरसह ३५ हून अधिक उत्पादनांची व प्रक्रिया केलेल्या पदार्थांची विक्री होते. आज अनेक महिला मुंबई येथे वनोउपज घेऊन जात असतात. त्यामुळे महिलांचे स्थलांतर थांबले आहे.

गुळवेलातून रोजगार निर्मिती

गुळवेल ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. तिचे खोड अनेक रोगांवरील औषधांत वापरतात. त्यामुळे बाजारात यास मोठी मागणी आहे. विषाणूजन्य ताप आणि मलेरियासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी या वनौषधीचा मोठा उपयोग होतो. त्याशिवाय मधुमेहावरदेखील हे प्रभावी औषध मानले जाते. त्याचा अर्क, द्रव, भुकटी किंवा मग त्याचा गर काढून वापरला जातो.

 

adivasi inmarathi 2

हे ही वाचा – दूरदर्शनवरील एका सिरीयलचा असाही परिणाम: शेतकरी झाला मशरूमचा राजा!

सुनील पवार सांगतात की, “गुळवेल पावडर बनवण्याच्या या प्रक्रियेत कातकरी बांधव स्वतः झाडावर चढून गुळवेल तोडून घेतात. त्यानंतर आठ ते दहा दिवस ती सुकवली जाते. ही सुकवलेली गुळवेल शहापूरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी आणून दळून घेतली जाते. नंतर त्याची पाकिटे बनवून, शिक्के मारून अनेक दुकानांच्या माध्यमातून खरेदीदारांना विकली जाते. २०२० वर्षी ३४ टन, तर यंदा जवळपास १०० टनांपेक्षा गुळवेल संकलन करण्यात आले आहे.

गेल्या दीड वर्षांत या संस्थेने १२ लाख, ४० हजार रुपये किमतीची गुळवेल पावडर विकली आहे, तर सहा लाख दहा हजार रुपयांची कच्ची गुळवेल विक्री केली आहे. मार्च २०२० ते २०२० जूनच्या मध्य या कालावधीत ‘वनधन विकास केंद्र , शहापूर’ने स्थानिक आदिवासींकडून ३४०० टनाहून अधिक गुळवेल खरेदी केली आहे. प्रत्येक महिन्याला तीन ते चार लाखांची विक्री होत असते.

दीड कोटींच्या ‘ऑर्डर्स’

संस्थेने ‘डाबर’, ‘बैद्यनाथ’, ‘हिमालय’, ‘विठोबा’, ‘शारंगधर’, ‘भूमी नॅचरल प्रॉडक्ट्स’ यासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांना गुळवेल विक्री केली आहे. सुनील सांगतात, “वनधन केंद्र व शबरी आदिवासी महामंडळाच्या सहकार्यामुळे गुळवेल पावडर व कच्च्या मालाची विक्री होत आहे.”

 

adivasi inmarathi 3

 

यंदा कोरोनाच्या संकट काळातही हिमालया (३०० टन), डाबर (२५० टन), भूमी नॅचरल प्रोडक्ट्स कंपनी (४००टन) यासारख्या नामवंत कंपन्यांनी १ कोटी, ५७ लाख रुपयांच्या गुळवेल पुरवण्याच्या ऑर्डर्स दिल्या आहेत. स्थानिक बाजारपेठा आणि औषधी कंपन्यांपुरते मर्यादित न राहता आम्ही ‘डी-मार्ट’सारख्या मोठ्या किरकोळ साखळ्यांच्या मदतीने गुळवेलीला दूरच्या बाजारपेठेत नेण्याची योजना आखली आहे.

आम्ही एक संकेतस्थळही तयार करत आहोत. ‘लॉकडाऊन’ कालावधी दरम्यान ‘ऑनलाईन’ विक्री त्याद्वारे होत आहे. उत्पादनांची वाहतूक आणि विक्री कोणत्याही अडथळ्याविना करता यावी आणि म्हणून आम्हाला पास देण्यासाठी सरकार मदत करत आहे.”

दोन लाख गुळवेल रोपांचे उद्दिष्ट

एकेकाळी कातकरी बांधव गुळवेलाचा सरपण (जळण) म्हणून वापर करायचे, आता हेच बांधव गुळवेलाचा एकेक तुकडा जमा करण्यासाठी धडपडत आहेत. एकूणच कातकरी बांधवांना गुळवेलाचे महत्त्व लक्षात आले आहे.

गुळवेल या औषधी वनस्पतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी दोन लाख रोपांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे, असेही पवार यांनी सांगितले.

 

gulvel inmarathi

 

वनौषधी उद्योगात संधी

कोकण, विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रात त्या त्या मातीचे गुणधर्म लक्षात घेऊन वनौषधी शेती विकसित करण्यासाठी सरकार व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे त्या त्या भागात वनौषधी आधारित छोटे उद्योग उभे करण्यास संधी राहणार आहे, असे सुनील पवार यांनी सांगितले.

 

adivasi inmarathi 5

हे ही वाचा – छंदाचे रुपांतर व्यवसायात करून, महिन्याला ३० हजार रुपये कमावणाऱ्याची भन्नाट कथा

सरकारने काय करावे?

१) वनौषधी लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना संघटित करणे.

२) महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना वनौषधी शेतीचे महत्त्व पटवून देणे आणि वनस्पतींची लागवड करण्यासाठी मार्गदर्शन करणे.

३) औषधी वनस्पतींची व्यापारी तत्त्वावर शेतीत लागवड करताना उत्तम बियाणे, अनुकूल वातावरण व तांत्रिक माहितीची आवश्यकता उपलब्ध करून देणे.

४) औषधी वनस्पतींची लागवड करणारे शेतकरी, आरोग्यतज्ज्ञ आणि विविध औषधी उत्पादक कंपन्यांमध्ये नियोजनबद्ध समन्वय साधणे.

आदिवासी कातकरी समूहाच्या ‘वनधन केंद्रा’ची ही यशोगाथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर संकल्पने’चे हे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून समोर येत आहे.

विकास पांढरे,९९७०४५२७६७
अधिक माहितीसाठी संपर्क – सुनील पवार (अध्यक्ष, आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्था, शहापूर जि.ठाणे) मो.नं:-+91 7378956592
ईमेल: adivasiass@gmail.com sunil.pawar.sp129@g

Saturday, October 16, 2021

तालुक्यातील गणोरा येथील शेतकरी देविदास वाकचौरे व संजय. वाकचौरे या शेतकरी पिता पुत्रांनी जैविक शेती

: अकोले, ता.१६:तालुक्यातील गणोरा येथील शेतकरी  देविदास वाकचौरे व संजय. वाकचौरे या शेतकरी पिता पुत्रांनी जैविक शेती करून राज्यात एक आदर्श निर्माण केला असून भारतात  जैविक शेतीचे  मॉडेल शेतकऱ्याने तयार केले असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे.
नुकताच त्यांनी तालुक्याचा दौरा केला त्यावेळी त्यांनी काही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची शेती पहिली .प्रसंगी त्यांनी  व्यक्त होताना वाकचौरे पितापुत्रांनी कोणत्याही तथा कथित तज्ञांचा सल्ला न घेता रासायनिक शेती वर मात करून जैविक शेतीची कास धरून आपली शेती आदर्श बनवली आहे.या शेतीला भेट देऊन शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घ्यावे असे हे शेतीचे मॉडेल असून  त्यातून अधिक उत्पादन व उत्पन्न मिळत असल्याचे दिसून आले .असेही राजू शेट्टी म्हणाले. अतिशय मेहनत करून जैविक शेतीचे मॉडेल पाहून मी आश्चर्य चकित झालो जैविक शेती करताना किडीचे नियंत्रण न झाल्याने शेतकरी पुन्हा रासायनिक शेतीकडे वळले मात्र वाकचौरे यांनी आपल्या नवनवीन कल्पना जागृत करून किडीचे नियंत्रण करून जैविक शेती मॉडेल बनवले हे मॉडेल राज्याला दिशादर्शक  ठरणारे आहे. शेतीत घेतलेले डाळिंब, अपेल बोर,चिकू,याचे उत्पादन घेतले आहे .एकीकडे भारतातील शेतकरी रासायनिक शेती व तणनाशक मुळे मेटाकुटीला आला असताना हा शेतकरी निसर्गातील विविध प्रकारचे वनस्पती उपलब्ध करून त्यातून कीटक नाशक औषधे बनवून कीड, बुरशी या रोगांवर मात करून उत्कृष्ट शेती करत असल्याने  याचा मला अभिमान आहे. यावेळी नामदेव संत,देविदास वाकचौरे,संजय वाकचौरे उपस्थित होते शेट्टी यांनी शेतकऱ्याच्या घरीच जेवण घेण्याचे पसंत केले: वैभव पिचड : 
   
  🍂 ' गावच्या विकासात्मक राजकारणाची बाब सोडल्यास आईने कधीही तालुका , जिल्हा अथवा राज्याच्या राजकीय घडामोडीं संदर्भात मतप्रदर्शन केले नाही . मोठ्या पदांकरिता हस्तक्षेप केला नाही . 


  🍂   व्यसनमुक्ती , वृक्षसंवर्धन - वनक्षेत्र वाढीस लागावे यासाठीची तळमळ , ग्रामस्वच्छता मोहीम याबाबत मात्र आईने गावच्या विकासकामांसाठी फार मोलाची कामगिरी करुन वेळ दिला आहे . 

   
    🍂 घरातील माणसांसाठी ती कायमच प्राधान्यक्रमाने  सर्वप्रथम मोलाचा भावनिक आधार राहिली आहे . शक्यतो सामंजस्याने - सौजन्यशील भावनेतून कोणतीही समस्या सोडविण्यावर आईचा कटाक्ष असतो . 

   
    🍂 संस्कार हे सहजगत्या रुजविण्याचा आईंचा प्रयत्न असतो . कोणताही जाणीवपूर्वक घटनाक्रम दिखाऊपणातून नसतो किंवा मग अहंकार देखील नसतो की आपण संस्कार जोपासतो आहोत असा ! 

  
   🍂  साधेपणा - निगर्वी स्वभाव , प्रयत्नवादी भूमिका , अंत:करणातील तळमळ , जपलेली जिव्हाळ्याची नाती हे सद्गुण आईचे बलस्थान आहेत .. 

   @@@@

माझी आई सौ.हेमलता मधुकरराव पिचड (आदर्श सरपंच ग्रामपंचायत कार्यालय, राजूर, ता.अकोले, जि.अहमदनगर)

माझी आई सौ.हेमलता मधुकरराव पिचड 
(आदर्श सरपंच ग्रामपंचायत कार्यालय, राजूर, ता.अकोले, जि.अहमदनगर)
माझ्या आईला प.पू.स्वामी गगणगिरी महाराज यांचे आशिर्वाद मिळाले, त्या अध्यात्मिक संस्काराचा ठसा माझ्या बालमनावर उमटला आणि त्यातूनच मी घडलो. एखाद्या शिल्पकाराने मूर्ती नव्हे तर एखादी लेणी कोरावी असे अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सर्वार्थाने जाणिवेचे संस्कार माझ्यामध्ये आईनेच साकार केले. याच शिदोरीच्या बळावर माझा सामाजिक व राजकीय प्रवास घडला. लहानपणापासूनच माझ्यावर माझ्या आईचे संस्कार असल्याने माझ्या मनात कुणाच्याही विषयीही द्वेषभावना राहिली नाही, ती नष्ट झाली, मनात दुस­यांविषयी आपुलकी, प्रेम,आस्था, जिव्हाळा तयार झाला. दुस­र्‍यांना मदत करण्याची वृत्ती व भावना माझ्या मनात बळावली.त्यामुळे मी लहानपणापासूनच माझ्या मित्रांना, नातेवाईकांना प्रेम दिले. उपेक्षितांना न्याय देण्याचे काम केले आहे. जनतेला न्याय देण्याची प्रवृत्ती, सामाजिक बांधिलकी, लोकांना न्याय देण्याची भुमिका 80 टक्के समाजकारण व 20 टक्केच राजकारण मी व माझे सर्व कुंटुब करीत आहे. प्रत्येकाला मदत करण्याची वृत्ती व सतत काम करण्याची सवय मी माझ्या आई-वडीलांकडून घेतली आहे. यातूनच माझ्यातील उपजत असणाऱ्या नेतृत्वगुणाला वाव मिळाला .समाजकारणातूनच राजकारण आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या माध्यमातून तसेच अकोले तालुका एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा व गरीब दिनदुबळयांचे अश्रु पुसून समाजकारण व राजकारण करावे ही भावना माझ्या मनामध्ये माझ्या आईने रुजवली. त्यामुळे तिने सांगितलेले नियमांचे मी काटेकोरपणे पालन करत आहे, म्हणून माझी आई समाधानी आहे. मी राजकारणात येण्यापूर्वी अतिशय मुत्सद्देगिरीने समाजहितासाठी माझ्या आईने मला अध्यात्मिक संस्कार व समाजकारणाचे धडे दिले आहे. त्यामुळे मी राजकारणातही त्याच पध्दतीने काम करीत आहे. घरातील प्रासंगिक दु:खद घटनेच्या वेळी आईने मला धिरोदत्त मार्गदर्शन केले. माझे लहान बंधू कै.जितेंद्र पिचड यांचे दु:खद आकस्मिक निधन झाले त्यावेळी माझे धैर्य फार खचले होते, माझ्या अनुपस्थितीत माझे मोठे भाऊ हेमंत व लहान भाऊ जितेंद्र हे सामाजिक व राजकीय काम करत असत. व मला नेहमी आधार देत असत. माझे लहान बंधू जितेंद्र यांचे आकस्मिक निधन झाल्याने तो आधार अचानकपणे निघून गेल्याने मी एकटा पडलो त्यावेळी माझ्या आईने मला धीर दिला. परमेश्वरकृपेने, प.पू.स्वामी गगणगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने या दु:खातून मी व माझे सर्व कुंटुब बाहेर पडलो व पुनश्च सामाजिक व राजकीय कामात पुन्हा व्यस्त झालो. त्यावेळी आईने मला सांगितले की, तुझा एक भाऊ गेला असला तरी तुझ्या कामातून, तुझ्या वागण्यातून तू अनेक भाऊ तयार कर, तू भिऊ नकोस प.पू.स्वामी गगणगिरी महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठिशी उभे आहेत असा मला माझ्या आईने धीर दिला. त्यामुळेच ख­या अर्थाने सामाजिक जीवनाचा, राजकारणाचा माझा प्रवास सुरु झाला. माझ्या आईचे माझ्या दोन्ही भावांवर व माझ्यावर प्रचंड प्रेम होते व आहे. माझ्या लहान भावाच्या दु:खद निधनामुळे माझ्या आईच्या मनावर देखील फार परिणाम झाला होता, तिला अतिव दु:ख झाले होते त्या दु:खातूनही आईने आपले दु:ख बाजूला सारुन मला धीर देण्याचे काम केले. तिच्या या आधारामुळेच मी आज राजकारणात व समाजकारणात मार्गक्रमन करत आहे. भावाच्या दुखात असताना अनेकांनी मला धीर दिला असला तरी आईचा आधार हा लाखमोलाचा ठरला आहे. 
राज्यात मी राजकीय काम करीत असताना माझा 2019 ला भारतीय जनता पार्टीमध्ये जाहिर प्रवेश झाला व थोडया दिवसात महाराष्ट्र विधानसभेच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून मी भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढवली. परंतु त्यात माझा पराभव झाला. त्यामुळे मी अक्षरश: खचून गेलो होतो. मी राजकारणातून निवृत्ती घ्यावी की काय? या मनस्थितीत होतो, हा विचार माझ्या मनात आला. मात्र हे माझ्या आईच्या लक्षात आल्याने तिने मला जवळ बोलावून घेऊन सांगितले की, लोकशाहीमध्ये हार-जीत असतेच त्यामुळे तर तिला लोकशाही म्हणतात. जनमानसावर राज्य फक्त पद असल्यानेच करता येते असे नाही. निवडणूक ही एक प्रक्रिया आहे. त्यात ज्या माणसांनी तुझ्या बाजूने कौल दिला त्या सर्वांना न्याय देण्यासाठी समाजहिताची कामे या पुढील काळात सातत्याने करावी लागतील. आपल्या कामाने जनतेमध्ये जावून आपल्या ऊणिवा दूर करण्याचे काम तू कर, तुला यश निश्चितच मिळेल त्यामुळे तू खचून जाऊ नकोस, तू जर खचला तर तुझ्याजवळ व तुझ्या सोबत असलेले कार्यकर्त्यांनी काय करायचं ? त्यांना या संकटात आधार देण्याचे काम तू केले पाहिजे, तुला मिळालेले मते हे दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. त्यामुळे त्यांचा तू विचार कर, आदर कर .आईच्या या सल्ल्याने मी पुन्हा नव्या जोमाने माझ्या कामाला सुरुवात केली.
माझ्या आईने सर्व मुलांना सारखेच प्रेम दिले. वाढदिवस व लग्नसमारंभात लहान व मोठया कौटुंबिक सदस्यांना आनंद देण्याचे काम माझ्या आईने केले आहे. घरातील सणसुद व वाढदिवस या वेळेसही सर्वांना बरोबर घेवून तिने काम केले आहे. भावा-भावांमध्ये समन्वय राखत जा, कुंटुंबातील सणसुद नातेवाईकांच्या समारंभात एकत्र राहून तिथे जाऊन त्यांच्या आनंदात आनंद मानून त्यांना धीर व आनंद देण्याचे काम मला माझ्या आईमुळे करता आले. आमच्या घरातील वाढदिवस व सणासुदीला आमचे तिन्ही चारी कुंटुंब एकत्र येत आम्ही सर्व कौटंुंबिक आदर्श जोपासला आहे. 
सामाजाचा पैसा काटसरीने वापरायचा असतो, एक-एक पैसा जमा करायचा असतो, त्यात काटकसर करुन आपल्या कामाचे कसब दाखवायचे असते. यातूनच मी चांगला धडा घेवून बंद पडायच्या स्थितीत असलेला अमृतसागर दूध संघ या संघाचा मी चेअरमन झालो. हा दूध संघ अल्पवधीतच मी चांगल्या नावारुपाला आणला. आज 8 कोटी पेक्षा जास्त हा संघ मी नफ्यामध्ये आणला आहे. याचे कारण काटकसरीने कसे काम करायचे ही शिकवण मला माझ्या आईने दिली. मला कसलेही व्यसन नाही, काटकसर, चांगल्या पध्दतीची वागणी, वायफळ खर्च करायचे नसतो या सर्व गोष्टीतून मी चांगले शिकलो व माझ्या आई-वडीलांची प्रत्येक शिकवण मला कामी आली. अशाप्रकारे सर्व सहकारी संस्थामध्ये व शैक्षणिक संस्थामध्ये मी चांगले काम करणार आहे. आईने मायाममता तर दिलीच पंरतु सामाजिक जीवनात कसे जगायचे, वागायचे, काटकसर कशी करायची, गरीबांना न्याय देण्याचे काम कसे करायचे ही सगळी भुमिका आईने पार पाडली आहे. वडील राजकारणात काम करत असायचे त्यांना पुरेसा कुंटुंबासाठी वेळ देता येत नव्हता. परंतु आईने ती दोन्ही भुमिका पार पाडली, आम्हा सर्व मुलांना संस्कार दिले आमच्या सुखदुखात, आमच्या पालनपोषणात, आमच्या शैक्षणिक जीवनात तिने चांगली भुमिका पार पाडली आहे. आमचे चार कुंटुब आहेत, त्यांचे हायकमांड माझे आई-वडील आहेत. आईच्या अस्तित्वामुळे आम्ही सर्व एकत्र राहतो, समाज व्यवसनापासून दूर कसा राहिल ही आईची शिकवण आहे. निरव्यसनी समाज ही आईची भुमिका, आईचा शब्द हा प्रमाण मानला जातो, चारही कुंटुंबात देवभक्ती वाढविणे, निरव्यवनी राहणे हे धडे आईकडून आम्हा सर्वांना मिळाले आहे. माझे व भावाचे शिक्षण  भोसला मिलिट्री स्कुल नाशिक येथे झाले आहे. लहान पणापासूनच कष्ट, साहेबांच्या पाठिमागे भक्कमपणे उभा राहिलो, लहानपणापासूनच अगदी 10 वी मध्ये असल्यापासूनच शेतावर जाणे, साहेबांनी सांगितलेले काम व्यवस्थितपणे करणे. बालपणापासून ते शिक्षण, सामाजिक काम, राजकारणात काम करणाताना अनेक संकटे आले, अनेक प्रश्न उभे राहिले, त्यातूनही मार्गक्रमन करीत आजवर इथेपर्यंतचा प्रवास चालू राहिला यातून मला अनेक चांगले मित्र व कार्यकर्ते मिळाले आहेत. संस्कार

माझी आई ही माझ्यासाठी सर्व काही आहे आणि माझ्यासाठी देव सुद्धा आहे. माझ्या आईने लहानपणापासून मला चांगले संस्कार देऊन मला घडवले आहे. जर मला काही लागलं तर ओठावर येणार पहिला शब्द म्हणजेच – आई.

तसेच संकटाच्या वेळी साथ देणारी आणि दुःख सोसून सुखात ठेवणारी आई असते. माझी आई हि माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. कारण ती आपल्या सोबत राहून किती जबाबदारी पार पडत असते.

माझी आई जर का आजारी पडली तर आम्हा सर्वाना संपूर्ण घर आजारी पडल्यासारखं वाटतं. तेव्हा असं वाटतच नाही कि, हे आपलं घर आहे. माझी आई नेहमी जी कामे करते ती कामे इतर कोणालाही करून संपत नाही

आई मायेचा सागर

आई हि मायेचा सागर आहे. या विषयावर अनेकांनी काव्ये आणि निबंध लिहिले आहेत. रामायणात प्रभू श्रीरामचंद्रांनी सांगितले होते की" जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी " स्वर्णमयी लंकेपेक्षा आणि स्वर्गापेक्षा आपली अयोध्या या जन्म भूमीला सर्वश्रेष्ठ मानले आहे.हे सांगताना त्यांनी आपल्या जन्मभूमीची बरोबरी आईशी केली आहे.
 मराठीमध्ये प्रसिद्ध कवी यशवंत यांनी आपल्या कवितेमध्ये स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी हि ओळ लिहून आईची महानता वर्णविली आहे.
आईच्या समाजकारणाची दिशा अतिशय योग्य असल्याने तिने दिलेल्या सामाजिक आदेशाची अंमलबजावणी डोळे झाकून जरी केली तरी ते नेहमी समाजहिताचे ठरले. आदर्श सरपंच असताना आईने वसुंधरा पुरस्कार मिळवताना केलेले काम हे फक्त मानवजातीच्या कल्याणाचे आहे. राजूरच्या चौतर्फा लावलेली झाडे उद्या निश्चित वनराईचे स्वरूप प्राप्त करतील नेहमीच समाजहित व मानवजातीचे कल्याण हा सामायिक हेतू ठेवून समाजकारण व राजकारण करण्याचे धडे तिने मला दिले. निश्चितच तिच्या तत्त्वांनी केलेला प्रवास हा मला फलदायी ठरेल यात कुठलीही शंका नाही.

शब्दांकन - मा.आ.वैभवराव मधुकरराव पिचड

Friday, September 24, 2021

मुळात गोडतेल तरी किती? तर आमच्या कुटुंबातल्या १५-१६ माणसांच्या कालवणात

मुळात गोडतेल तरी किती? तर आमच्या कुटुंबातल्या १५-१६ माणसांच्या कालवणात धारभर तेल वापरले जाई. होय, धार हेच एकक होतं कालवणात तेल टाकायचं. पाट्यावर वाटून शेंगदाणे, खुरासनी आणि मसाल्याचे पदार्थ टाकून गोडतेलाशिवाय चवदार भाजी होत असे. गरज भासल्यास शेजाऱ्यांकडून तेल उसने आणले जाई.
ही देवघेव अनेक बाबतीत होई.

तेल खूपच जपून वापरले जाई. आई दोघी सुनांकडे विशेष लक्ष ठेवून असायची. तेल आणि साखरेचा वापर खूपच जपून केला जाई. गोडतेल पॅकिंगमध्ये मिळत नव्हतं. तेलाला काचेच्या उभट बाटल्या वापरल्या जात. आमच्या घरातल्या बाटलीत सायरीचा टोकदार काटा ठेवलेला असायचा.(त्याचं कारण माहीत नाही.) आम्ही पोरं दुकानातून गरजेपुरते तेल आणायचो. सणासुदीच्या बाजारात भजे, कुरडया, पापड्या तळायच्या हिशोबाने जास्तीचे तेल आणले जाई. लसणाच्या चटणीत तेल टाकून खाताना लज्जत वाढते. आई लसणाच्या भल्यामोठ्या गोळ्यात तेलाची धार टाकायची. तेलाची बाटली खुंटीला टांगून ठेवली जायची. तिथली मातीने सारवलेली भिंत तेलकट होत असे. शाळकरी वयात डब्यात अनेकदा भाकरी आणि लसणाची चटणी असायची. पेंडकं बांधलेल्या कापडामधून चटणीतले तेल झिरपून वह्यापुस्तकं तेलकट होत. शिक्षकांचे बोलणे खायला लागत.

आमच्या परिसरात राजूर(ता. अकोले) येथे तेलाचे घाणे होते. खुरासनी घेऊन जायचे आणि तेल काढून आणले जायचे. त्या तेलाला रुचकर चव आणि विशिष्ट वास होता. आताच्या पिशवीतल्या तेलांना ना वास ना चव! अकोल्यात शेंगदाणा मील होत्या. शेंगा खरेदी करून तेल आणि पेंड विकली जात असे. तिथून दिवाळीच्या दिवसांत तेल आणले जायचे. घाण्यातले शेंगदाणा तेल मिळते अकोल्यात अजूनही.

एकदा पोळ्याच्या सणाच्या दिवशी सारात तेल जास्त पडलं त्याचा तवंग दिसला म्हणून बापाने जेवण नाकारले होते! ताट भिरकावून दिलं होतं. तेलाचा विषय निघाला की ही आठवण हटकून जागी होते....

आमच्याकडे डांगी गायी असायच्या. तेलाचा दुष्काळ असला तरी तुपाची रेलचेल असायची. चुलीवर भाजलेल्या बाजरीच्या गरम भाकऱ्या चुरून त्यात तूप आणि गूळ घालून केलेला काला(मलिदा) आमच्या आवडीचा पदार्थ होता. 

बालपणी एखाद्या मित्राची तेलकट भाजी बघून तोंडाला पाणी सुटत असे. तेलकट पदार्थ खायला मिळत नसत याचं वाईट वाटायचं. आता तेल खरेदी करायची ऐपत झाली असली तरी तेलकट पदार्थ खायला आवडत नाहीत. 

घरात गोडतेल, खोबरंतेल आणि घासलेट अशी तीन तेलं असायची. गोडतेल आणि खोबरं तेलाच्या विशिष्ट आकाराच्या बाटल्या असायच्या. चिमणी आणि घासलेट इतिहासजमा झाले आहे. तेलांच्या बाटल्या जाऊन पिशव्या आल्या आहेत. काळाचा महिमा दुसरं काय? फेसबुकवर एका मित्राची पोस्ट वाचून हे सगळं आठवलं...

Monday, June 28, 2021

भांगरे, राघोजी : ( ८ नोव्‍हेंबर १८०५ – २ मे १८४८ ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. त्‍यांचा

भांगरे, राघोजी : ( ८ नोव्‍हेंबर १८०५ – २ मे १८४८ ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. त्‍यांचा जन्‍म अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव (ता. अकोले) येथे रामजी व रमाबाई या दाम्पत्यापोटी महादेव कोळी जमातीत झाला. रामजी हे कोळी साम्राज्य असलेल्या जव्‍हारच्‍या मुकणे संस्‍थानच्‍या राजूर प्रांताचे सुभेदार होते. रामजी यांनी राघोजींना घरी शिक्षणाची व्‍यवस्‍था केली. पुढे राघोजी तलवारबाजी, भालाफेक, पट्टा चालविणे, बंदुकीने निशाणा साधणे, घोडेस्‍वारी करणे यांत तरबेज झाले.


राघोजी भांगरे यांचे स्मारक, अकोले, अहमदनगर (महाराष्ट्र).
पेशव्यांच्या पराभवानंतर (१८१८) ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत असलेले किल्ले, वतने यांकडे मोर्चा वळविला. त्यामुळे रामजी भांगरे यांच्या नेतृत्‍वाखाली रतनगडावर गोविंदराव खाडे, वाळोजी भांगरे, लक्षा ठाकर इत्यादींनी इग्रजांच्या विरोधात जाहीर उठाव केला; तथापि त्यांचा पराभव झाला (१८२१). रामजी भांगरे व गोविंदराव खाडे यांना अटक केली. पुढे खटला चालवून त्‍यांना काळ्या पाण्‍याची शिक्षा दिली. वडिलांच्‍या अनुपस्थितीत राघोजी आपल्‍या गावात पोलीस पाटील पदाचा कारभार पाहत होते. आपल्‍या चोख कारभारामुळे राजूर पोलीस ठाण्‍यात राघोजींना इतरांपेक्षा अधिक मान होता. राजूर प्रांताच्‍या रिक्‍त असलेल्‍या पोलीस अधिकारी पदासाठी राघोजींनी अर्ज केला; परंतु ब्रिटिशांनी ही मागणी फेटाळून अमृतराव कुलकर्णी यांची पोलीस अधिकारी म्‍हणून नेमणूक केली. पुढे कोकणातील एका दरोडा प्रकरणात राघोजींचा सहभाग असल्‍याचा खोटा अभिप्राय अमृतराव कुलकर्णी यांनी सरकारला पाठविला. वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी पुरेसा तपास न करताच राघोजींना अटक करण्‍याचा आदेश काढला. राघोजी पोलीस ठाण्‍यात हजर झाले. आपल्‍यावरील खोट्या आरोपाचा जाब त्यांनी विचारला. या दरम्‍यान राघोजी व अमृतराव यांच्‍यात बाचाबाची झाली. या वादात अमृतराव मारले गेले. पुढे राघोजी आणि इंग्रज यांच्यातील संघर्ष तीव्र झाला.

राघोजींचे संघटन कौशल्‍य चांगले होते. त्‍यांना मुळा खोरे, चाळीसगाव डांगाण, बारागाव पठार या परिसरातून विविध जातीजमातीचे अनेक तरुण येऊन मिळाले. अन्‍यायी अत्‍याचारी सरकार, सावकार, जमीनदार यांच्या विरोधात आवाज उ‍ठविण्‍याचे काम राघोजींच्‍या नेतृत्‍वाखाली सुरू झाले. राया ठाकर, देवजी आव्‍हाड हे त्यांचे सहकारी. पुढे त्यांनी कोतुळ राजूर व खीरवीरे परिसरातील जुलमी व अत्‍याचारी सावकारांवर धाडी टाकल्या. त्‍याची संपत्‍ती लुटून गोरगरिबांना वाटून टाकली, तसेच सावकारांनी कब्‍जा केलेल्‍या जमिनींचे सर्व कागद व दस्‍तऐवज यांची होळी केली. महिलांवर हात टाकणाऱ्या सावकारांचे कान, नाक कापले. राघोजींच्या वाढत्‍या दबदब्‍यामुळे या भागातील सावकार व जमीनदार आपले सर्व अधिकार सोडून अकोले व संगमनेर परिसरात गेले. पुढे राघोजींनी सावकारशाही विरोधातील लढा अधिक व्‍यापक करत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा, पेठ, कळवण येथील सावकारशाहीविरुद्ध संघर्ष केला.

राघोजींचा बंदोबस्‍त करण्‍यासाठी ब्रिटिशांनी सु. दोनशे बंदूकधारी शिपायांची तुकडी पाठविली. याचवेळी राघोजींनी आपले निवासस्थान बाडगीच्‍या माचीवरून अलंग व कुलंग किल्‍ल्‍यावर हलविले. ब्रिटिश शिपाई घनदाट जंगलातून वाट काढत असताना राघोजींच्या साथीदारांनी त्यांच्यावर जोरदार हल्‍ला केला. या हल्‍ल्‍यामुळे शिपाई जंगलात सैरावैरा पळू लागले. देवजी आव्‍हाड, बापू भांगरे व खंडू साबळे या साथीदारांसह राघोजींनी अनेक शिपायांची कत्‍तल केली. या लढाईत राघोजींना मोठ्या प्रमाणात काडतुसे व बंदुका मिळाल्‍या. राघोजींच्या या कृत्याने इंग्रज सरकार हादरले. त्यांना पायबंद घालण्यासाठी इंग्रजांनी वेगवेगळे प्रयत्‍न केले. बक्षिसांचे आमिष दाखवले; परंतु यश येत नव्‍हते. शेवटी इंग्रज अधिकाऱ्यांनी राघोजींचा ठावठिकाणा शोधण्‍यासाठी अत्‍याचारी मार्ग अवलंबिला. त्यांच्या घरातील माणसांना त्रास द्यायला सुरुवात केली. वारंवार राघोजींच्‍या घरी धाडी घातल्‍या. तरीही काही हाती न लागल्‍याने शेवटी त्‍यांची आई रमाबाईला ताब्‍यात घेतले. तसेच गावागावांत जाऊन महादेव कोळी व ठाकर समाजातील इतर लोकांना छळले; परंतु त्‍याचाही उपयोग झाला नाही.

सातारचे छ. प्रतापसिंह भोसले यांनी राघोजींना सातारा भेटीचे आमंत्रण देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली होती. सातारा येथील पदच्युत छत्रपतींना पुन्हा गादीवर बसवावे म्हणून झालेल्या बंडात राघोजींचा सहभाग असावा, असे अभ्यासकांचे मत आहे.

राघोजी इंग्रजांशी छुप्‍या मार्गाने लढत होते. इंग्रजांशी समोरासमोर लढण्यासाठी त्यांनी जुन्नर येथे जाहीर उठाव केला (१८४५). यावेळी राघोजी व इंग्रज सैन्यांत तुंबळ लढाई झाली. राघोजी जुन्नर बाजारपेठेचा फायदा उठवत सहीसलामत बाहेर पडले. या उठावात त्यांनी मोठ्या प्रमाणात आपले साथीदार गमावले. त्‍यामुळे पुढे भूमिगत राहून लढा देण्‍याचे ठरविले. त्यांना पकडण्‍यासाठी इंग्रजांनी दहा हजार रुपये व गाव इनाम देण्‍याची घोषणा केली. पुढे ते पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले असताना लेफ्टनंट जनरल गेल याने शेकडो पोलिसांचा फौजफाटा घेऊन मंदिराला वेढा दिला व राघोजींना ताब्यात घेतले (१८४७). त्‍यांच्यावर खटला भरून ठाणे येथील कारागृहात फाशी देण्‍यात आली.

Friday, June 11, 2021

भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.येथे भंडारदरा धरण आहे.

[11/06, 1:55 pm] Manju: भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.येथे भंडारदरा धरण आहे. या गावाजवळ जलविद्युत केंद्र आहे. भौगोलिक अक्षांश- १९० ३१’ ४” उत्तर; रेखांश ७३० ४’ ५”पूर्व.

भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.

भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.

भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. भंडारदरा धरणाचे मूळ नाव नावविल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे. हा प्रदेश महर्षी अगस्ती आणि महर्षी वाल्मिकी अशा ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेला असून जवळच अकोले येथे महर्षी अगस्ती यांचा आश्रम व आजोबाचा डोंगर येथे महर्षी वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. प्रवरेच्या बाबतीत अशी आख्यायिका आहे की अगस्ती ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देव पृथ्वीवर अवतरले व त्यांनी गंगेचीच एक धारा असलेली प्रवरा नदी इथे प्रवाहित केली. प्रवरा नदीचे पाणी हे अमृतासमान असून म्हणून नदीला "अमृतवाहिनी" असे म्हटले जाते.

मुख्य आकर्षण

कळसूबाई 
भंडारदरा परिसरातच कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच शिखर असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे १६४६ मीटर आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे मंदीर आहे. नवरात्रात इथे दररोज हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. शिखरावरुन दिसणारे परिसराचे दृश्य अतिशय मनमोहक असे आहे.

अम्ब्रेला फॉल 
विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा असून त्याच्या छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला 'अम्ब्रेला फॉल' असे म्हणतात. धरणाचे आवर्तन सुरु असताना खुप दुरवरुनही अम्ब्रेला फॉल बघता येऊ शकतो. मात्र हा अम्ब्रेला फॉल केवळ जुलै ते ऑक्टोबर महिन्यांतच पहायला मिळतो.

रंधा फॉल 
शेंडी या गावापासून १० किलोमीटर अंतरावर रंधा या गावात एक विशाल धबधबा असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतो. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजुने अजुन एक धबधबा पहायला मिळतो. दोन्ही धबधबे पुर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे.

रतनवाडी 
भंडारदऱ्याहुन बोटिंगचा आनंद घेत रतनवाडी येथे जाता येते. रतनवाडी येथे अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंथी मंदीर आहे. या मंदीरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असुन त्यात मुख्य गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे, पावसाळ्यात हे शिवलिंग पुर्णत: पाण्यामध्ये बुडालेले असते.                                 
                           

'नान्ही फॉल नेकलेस फॉल'                                      

घाटघर 
शेंडी येथुन पश्चिमेकडे २२ किमीवर घाटघर हे निसर्गसौंदर्याने नटलेले एक गाव आहे. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरपर्यंत करावयाचा प्रवास अतिशय आनंददायी आहे. घाटघर गावचा कोकणकडा अतिशय प्रसिद्ध असुन इथुन कोकण आणि सह्याद्री पर्वताचे विलोभनीय दृश्य पहायला मिळते. इथे अनेक धबधबे असुन पावसाळ्यात हा संपुर्ण परिसर धुक्यात हरविलेला असतो. घाटघरला खुप पाऊस पडतो म्हणुन यास नगर जिल्ह्याचे चेरापुंजी असे म्हंटले जाते.
                                                                    सादंन दरी                                                   साम्रद गावापासून  10 ते15 मिनिटांत दरीत पोहोचते  दरी 3ते 4 किमी आहे आशिया खंडातील 2 नंतरची सादंन दरी आहे
[11/06, 1:57 pm] Manju: सांधण व्हॅली ! सह्याद्री मधली एक खोल दरी, आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी.अत्यंत सुंदर आणि तितकीच भयाण. सांधण व्हॅली ची खोली फक्त २०० फूट असली, तरीही त्या २०० फूट मध्ये सह्याद्रीचं  सौंदर्य ठळकपणे दिसतं ! रतनगड, कळसुबाई शिखर, अलंग मदन कुलंग यांनी वेढा दिलेली अशी ही "valley  of shadows" म्हणजे प्रत्येक गिर्यारोहकासाठी अगदी ऑल इन वन पॅकेजच !
[11/06, 2:04 pm] Manju: सांदण दरी... सांदण दरी

एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. असच एक

सह्याद्रीनव म्हणजे सांदण

दरी..... सह्याद्रीच्या रुपापुढे फक्त या नतमस्तक व्हायच.... आपण कितीही मोठे झाले असलो तरी या सह्याद्रीच्या निसर्गाच्या पुढे किती खुजे आहोत याची जाणीव यांच्या नुसत्या दर्शनाने आपल्याला होते. सांदण दरीचे वैशिष्ठ म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि ज

G People also view
[11/06, 2:05 pm] Manju: जवळ १ कि.मी लांबवर पसरलेली आहे. पावसाळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळते. त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा. दरीतील ऊन सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.

दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात. पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो. येथे हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते. सांदण दरीला जाण्यासाठी जाण्यासाठी साम्रद गाव गाठावे लागते. साम्रद ही छोटेखानी आदिवासी वाडी आहे. मुंबईपासुन जवळ-जवळ १५० कि.मी अंतरावर असलेल्या साम्रद गावाला जाण्यासाठी मुंबईहुन नाशिकला जाणारा

महामार्ग पकडायचा. कल्याण-शहा
[11/06, 2:06 pm] Manju: घळ उतरायला लागल्यावर सुरुवातीचा सोपा कातळटप्पा उतरुन आपला आत दरीच्या नाळेत प्रवेश होतो. आत दरीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसते. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ही अतिशय अरुंद नाळ असुन दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त झाली आहे. एका सपाटीवरुन चालणं फार थोडं आहे. वाट खाली खाली जात राहते, विश्वास बसु नये असे शिलाखंड समोर दिसतात. त्यांच्या मागुन पुढुन वर खाली जाताना गारवा जाणवायला लागतो. हा गारवा वा-याचा नाही, पाण्याचा नाही तर इथपर्यंत सुर्यकिरणंच पोहोचु शकत नसल्यानं थंड झालेल्या दगडांचा आहे. अशातच एका मोठया शिलाखंडाच्या बाजुनं खाली उतरलो की दोन पाणीसाठे आहेत. त्यामूळे तयार झालेल्या अरूंद पात्रातून मार्गक्रमण करत
[11/06, 9:52 pm] Sk: अनोळखी गावात जायचे, अनोळखी लोकांशी संवाद साधायचा, त्यांच्या घरी जायचे, ते खातील ते खायचे. त्यांच्याबरोबर जंगल फिरायचे  असे करता करता मला माहिती तर मिळतच होती. पण तिथल्या माणसांशी एक अनोखे नातेही तयार होत होते. आज माझे इथल्या प्रत्येक गावात हक्काचे घर आणि हक्काची माणसे आहेत. माझ्या अनेक आदिवासी मैत्रिणी आहेत आणि भाऊही. इथे मला कधीच कोणती उपरेपणाची, महिला म्हणून भेदभावाची वागणूक मिळाली नाही. आजही ते माझ्या आणि मी त्यांच्या जीवनातील सहप्रवासी आहोत.  हे सर्व आज आठवले कारण ‘बखर रानभाज्यांची’ लिहतानाचा प्रवास आणि पावसाच्या सुरवातीलाच मिळणारे कोरफड/कात्रुड ही अळंबी. 
कोरफड शोधायचे तर धुंद पाऊस आणि धुक असायलाच हवे. जसे धुके निघते तसे कात्रुड उगवते. जांभूळ किंवा आंब्याच्या जुन्या झाडावर.. उंच डोंगरावरील दाट वनराई.. पावसात चिंब भिजत झालेला हा प्रवास आणि गूढ रानातल्या गप्पा.. असे हे अनोखे कात्रुड बऱ्याच प्रतीक्षेनंतर हाताला लागते तेव्हा.. चेहऱ्यावरचा आनंद आणि कौतुक दोन्ही ! त्यानंतर पारूबाईच्या हातची चुलीवरची भाजी .. अहाहा. 
यांनतर अळंबी शोध सुरु झाला आणि पुस्तकात अळंबी हा स्वतंत्र विभाग तयार झाला. 
#Bakhar_Ranbhajyanchi #बखर_रानभाज्यांची

Wednesday, June 9, 2021

बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू

बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशननरी स्कूल मध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून- मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.


बिर्सा मुन्दा
बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात इ.स १८९५ साली लढा उभारला.

इंग्रजांनी त्याला अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला. ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला. (असे अनेक जननायक आहेत : जननायक तंट्या भिल्ल, जननायक जयप्रकाश नारायण, वगैरे वगैरे)

Monday, June 7, 2021

शेकरू


 अकोले, ता . ६:

 हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा वन्यजीव व राजूर वन्यजीव वनपरिक्षेत्रात  सुनिल लिमये साहेब अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)  वनसंस्थळ पश्चिम मुंबई मा.  अनिल अंजनकर वन्यजीव नाशिक  गणेश रणदिवे सा. वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राजुर वन्यजीव वनपरिक्षेत्रात दिनांक २७/०५/२०२१ ते ३/०५/२०२१ पर्यंत महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरु या वन्य प्राण्यांची प्रगणना करण्यात आली प्रगणनेसाठी संरक्षण मजुरवनरक्षक वनपाल यांनी शेकरु चे घरटे (जुनेनवे) प्रत्यक्ष दिसलेले

 

शेकरु  धानुसार प्रगणना करण्यात आली आहे.

 

 हरिश्चंद्रगड- अभयारण्यात ९७  शेकरू आढळले आहेत. यामुळे शेकरूंच्या संख्येत यंदा मागील वर्षीपेक्षा दिडपट वाढ झाल्याचे नुकत्याच झालेल्या शिरगणतीनुसार स्पष्ट झाले आहे. वन्यजीव विभागाच्या माहितीनुसार या अभयारण्यात आतापर्यंत शेकरूंची ३९६  घरटी आढळली आहेतमात्रत्यांची संख्या ९७  असून  कोथळे ४३,विहीर २० , लव्हाळी १७ ,पाचनई१४ , कुमशेत ३  शेकरू आहेत  ही संख्या वाढल्याने वन्यप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

 

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेकरू नवीन घरटी बनवितात. या मुळे शेकरूंची गणना मे मध्ये केली जाते. पहिल्या टप्प्यात शेकरूंची संख्या प्राप्त झाली असून हे सर्वेक्षण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असते. त्यामुळे अंतिम आकडा हा जूनमध्ये मिळेलअसे वन विभागाचे मत आहे. ही गणना 'जीपीएसया तंत्राद्वारे केली जाते. यंदा केलेल्या गणनेत शेकरूंचा आकडा वाढू

 

शकतोअशी आशा स. वनसरंक्षक गणेश रणदिवे  यांनी व्यक्त केली आहे. इतरत्र त्यांचा अधिवास आहे कायाचा अभ्यास करणार असल्याचे वनक्षेत्रपाल डी. डी.पडवळ यांनी सांगितले. अकोले तालुक्यात

चौकट

तळकोकणातही शेकरूंचे दर्शन

 

वजन दोन ते अडीच किलोलांबी अडीच ते तीन फूट असलेल्या शेकरूंची डोळे गुंजीसारखे लाल असतात. त्याला मिशाअंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावरपोटावर पिवळसर पट्टाझुबकेदार लांब शेपूट असते शेकरू वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरू झाडाच्या बारीक फांद्यावर सहा ते आठ घरटी तयार करते ते १५ ते २० फुटांची लांब उडी मारू शकते. विविध फळे व फुलांतील मध हे त्याचे खाद्य असते. महाराष्ट्रात भीमशंकरकळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यआजोबा डोंगररांगांमध्येमाहुलीवासोटामेळघाटताडोबात शेकरू आढळतात. शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलांत त्यांचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्यांची संख्या वाढली आहे. दाट लाल रंगाचाआकर्षकशेपटी असलेल्या शेकरूंच्या जोड्या नारळाच्या बागांमधून लीलया उड्या मारताना दिसतात..

कोरोना मुळे

शेकरूंची नोंद करण्याचे काम काही अंशी झाले असून हरिश्चंद्रगड अभयारण्यात वापरातील व वापरात नसलेली ३९६  घरटी आढळली असून एकूण ९७  शेकरू या परिसरात असून कळसूबाई

 

घाटघर परिसरात १७ शेकरू असून तेथेही ४३ घरटी आढळली आहेत. गतवर्षी प्राणी पक्षांसह अभयारण्य क्षेत्रात २८० प्राणी व ४५० पक्षी आढळल्याची माहिती वनाधिकारी पडवळ यांनी दिली. photo akl6p1,2 

 


Tuesday, June 1, 2021

आजचा वाढदिवस, मधुकरराव पिचड
http://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/todays-birthday-madhukarrao-pichad-77096?amp

मधुकर पिचड साहेब

आजचा वाढदिवस, मधुकरराव पिचड
http://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/todays-birthday-madhukarrao-pichad-77096?amp

Sunday, May 30, 2021

उजाड,ओसाड माळरानावर पाणी उपलब्ध करून हिरवाई करणारे ,',भगीरथ '

अकोले (शांताराम काळे )महाराष्ट्रातील थोर विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान हे मधुकरराव पिचड यांचे गुरू. त्यांचे विचार पिचड यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यास मोलाचे ठरले. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर ते अकोल्यात आले. प्रस्थापित मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो, त्यांच्याविरुद्ध बंड करण्याचे बाळकडू पिचड यांना तालुक्यातील मातीने व पाण्याने दिले.पंचायत समितीचे सभापती झाल्यानंतर संपूर्ण तालुका त्यांनी पायी फिरून पिंजून काढला. ग्रामस्थांचे प्रश्न समजून घेतले. १९८० मध्ये आमदार झाल्यानंतर तालुक्यातील पाणी शेतीला कसे मिळेल, याचे नियोजन केले. भंडारदरा चाक बंद आंदोलन करून तालुक्याच्या वाट्याला पाणी देऊन पाणीदार नेता अशी ओळख मिळवली .आजही ८०वर्षे पूर्ण होऊनही आपल्या कार्य कर्तुत्वाने समाजमनाला गवसणी घालणारा ८१ वर्षात पदार्पण करणारा तरुण नेता कोरोना काळातही सातत्याने तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी धडपड करताना दिसत आहे .ओसाड उजाड माळ रानावर हिरवाईचे मळे फुलविणारे "भगीरथ "आज ८१ व्या  वर्षात पदार्पण करत असताना तालुक्याच्या जनतेच्या वतीने त्रिवार मनाचा मुजरा व शुभेच्छा ..... 
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मधुकरराव  पिचड यांनी  पंचायतसमितीचे सभापती म्हणून तालुक्याच्या राजकारणात प्रवेश केला . त्यावेळी स्वर्गीय दादासाहेब रुपवते , यशवंतराव भांगरे , साठी अमृतभाई मेहता हे दिग्गज तालुक्यात नेतृत्व  करत होते मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती आणि विधायक राजकीय महत्वकांक्षा जोडीला कार्यकर्ते , मोठा लोकसंग्रह या बळावर मधुकर पिचड साहेब यांनी  तालुक्यावर स्वतःची  राजकीय पक्कड मजबूत केली. सभापतीपासून सुरु झालेला त्याचा  कार्य कर्तृत्वाचा राजकीय आलेख दिवसेंदिवस  उंचावतच गेला . आमदार , राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री , विरोधीपक्ष नेते ,पक्षाचे अध्यक्ष ,राज्यातील नव्हे तर देशातील आदिवासींचे मसीहा ,नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्मान केली त्यांना व्यापक समाज मान्यता मिळत गेली  . विविध खात्यांचा पदभार सांभाळताना अफाट क्षमतेचे राजकीय नेते असे बिरुद त्यांना लावले गेले . अकोले तालुक्यात निळवंडे  प्रकल्पाच्या उभारणीचा अगस्ती साखर कारखाना , अमृतसागर दूध संघ ,कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ,या संस्थांच्या उभारणीत त्याचे अतुलनीय योगदान आहे . टिटवी , घोटी शिलवंडी , बलठन ,येसार्थव , पिंपळगाव खांड  , अंबित असे छोटे मोठे २४ जलाशय प्रकल्प उभारले त्यामुळे अकोले तालुक्यातील उजाड , ओसाड शिवार समृद्धीने फुलविण्याचे काम या जलदूताने "भगीरथाने" केले आहे .अकोले तालुक्याच्या ओसाड जिरायत शेत जमिनीला पाणी उपलब्ध करून  बागायती बनवून शेकडो शेतकऱ्यांना  स्वतःच्या पायावर उभे करून आत्मनिर्भर बनविण्याचे ऐत्यासिक काम मधुकरराव पिचड साहेबांच्या खात्यावर जमा आहे . पिचड दूरदृष्टीचा नेता

शिक्षण, रोजगार, पाणी, रस्ते अशा प्रश्नांचा पाठपुरावा करून ते तडीस नेण्यासाठी मधुकरराव पिचड यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. आदिवासी विद्याथ्र्यांना इंग्रजी शिक्षण मिळावे, यासाठी नवीन इंग्रजी शाळांऐवजी सध्या अस्तित्वात असलेल्या आश्रमशाळांमध्येच इंग्रजी शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. आश्रमशाळेचे जाळे संपूर्ण राज्यात विणून पिचड यांनी आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शरद पवार यांनी पिचड यांना आदिवासी विकास मंत्रीपदाची संधी दिली. आदिवासींचा स्वतंत्र अर्थसंकल्पही केला.

बंद आंदोलन करून हक्काचे पाणी मिळविले. सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत

निळवडे धरणाच्या घळभरणीचे काम सुरू करण्यास प्रकल्पग्रस्तांचा ठाम विरोध होता. त्यामुळे हे काम ठप्प झाले होते. या वेळी तत्कालीन मंत्री अजित पवार यांनी या प्रश्नात लक्ष घातले. ज्या प्रकल्पग्रस्तांना जमिनी नको होत्या, त्यांना हेक्टरी आठ लाख ८७ हजार ३०० रुपये दराने रोख स्वरूपात सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला. हे अनुदान स्वीकारण्यास बहुतेक खातेदारांनी मान्यता दिल्याने पुनर्वसन प्रश्नाची तीव्रता कमी झाली. प्रकल्पग्रस्तांना पाणी परवाने देण्याचेही मान्य करण्यात आले. एक जूनला पिचड यांचा वाढदिवस याच दिवशी निळवंडेच्या घळभरणीच्या कामास प्रारंभ झाला. धरणात पाणी साठविण्याचा मार्ग मोकळा झाला. अकोल्याच्या इतिहासात नोंद व्हावी, अशीच ही बाब ठरली. या पाण्यामुळे राजूर- पिंपरकणे या रस्त्यांचा काही भाग धरणात बुडणार आहे. आदिवासी भागाचे केंद्र असणाऱ्या राजूर गावाशी असणारा १४ गावांचा संपर्क त्यामुळे तुटणार आहे. हा संपर्क सुरळीत राहावा, यासाठी जलाशयावरून जाणारा उड्डाणपूल पिंपरकणे येथे बांधावा, अशी या गावातील लोकांची, तसेच प्रकल्पग्रस्तांचीही मागणी होती. मधुकरराव पिचड हेही यासाठी आग्रही होते. त्यामुळे सरकारने ३० कोटी ७० लाख रुपये खर्चाच्या या पुलास मंजुरी दिली आहे. प्रकल्प खर्चातूनच हा पूल बांधण्यात येत आहे. पुलाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. धरणाच्या पाण्यावरून जाणारा हा अर्धा किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा पूल तालुक्यात येणाऱ्या हजारो पर्यटकांचे खास आकर्षण ठरणार आहे. मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नांमुळे वाड्या वस्त्यांवर वीज पोचली. 

१३ मध्ये ५२ वाड्यांवर १ कोटी ५२ हजार, २०१३-१४ मध्ये ३० वाडयांना १ कोटी २९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. राजूर येथील वीज उपकेंद्राच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली  या उपकेंद्रासाठी महसूल विभागाने जागाही हस्तांतरित केली आहे.या वीज केंद्रामुळे तालुक्यातील पश्चिम भागात वाडी वस्तीवर सतत वीज मिळत असल्याने आदिवासी खुश आहेत.समशेरपूर, कोतूळ, सांगवी, पाडाळणे या उपकेंद्रांनाही मंजुरी मिळाली . पिचड यांना राष्ट्रवादी पक्षाने राज्याची जबाबदारी दिली होती. ही सर्व जबाबदारी संभाळून त्यांनी तालुक्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. आदिवासींचे शोषण रोखून पारदर्शक पद्धतीने त्यांना विकासाची संधी देण्यासाठी पिचड यांनी निर्णयाचा धडाका सुरू केला. खावटी कर्जाची पद्धत बंद करून आदिवासींना बँकेच्या खात्यातून या कर्जाची रक्कम देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय पिचड यांनी घेतला. तसेच, आदिवासी आश्रमशाळांना यापुढे खुल्या बाजारातून शिधा खरेदी करण्याची पद्धतही बंद करण्याचा निर्णय घेतला. 'पिचड पॅटर्न' मधुकर पिचड यांनी राज्यात सुरू केल्याची भावना आदिवासी आमदार व्यक्त करत आहेत. राज्यातील आदिवासी आश्रमशाळांना यापुढे सार्वजनिक वितरण यंत्रणेच्या माध्यमातूनच शिधा खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे अपहाराला आळा बसला आहे. १९८० साली जिल्ह्यातील व तालुक्यातील पुढारी मधुकरराव पिचड यांना तिकिट मिळू नये म्हणून प्रयत्न करीत होते. मात्र पिचड थेट दिल्लीला पोचले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. गांधींनी मुलाखतीत त्यांना आणिबाणीच्या काळात कुठे होता, असे विचारले, तेव्हा पिचड यांनी विसापूर जेलमध्ये असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांचे तिकिट निश्चित केले. वसंतदादा पाटील यांनी पिचड यांना मंत्रीपदाची संधी दिली. भंडारदरा चाकबंद आंदोलनाच्या वेळी सरकारने त्यांच्यावर खटले भरले. ते खटले काढण्याचे काम वसंतदादा यांच्यामुळेच झाले.स्वाभिमानी नेता म्हणून त्यांची ओळख आहे .

गेली चार दशके अकोल्याच्या सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , सहकार , शेती जीवनाशी एकरूप झालेले मधुकर पिचड ८१ व्या  वर्षात पदार्पण करत आहे मात्र शरीर थकले असले तरी मानाने ते थकलेले , खचलेले नाही आजारपणाशी ते यशस्वी लढा देत अकोल्याच्या समाज जीवनाशी ते आजही एकरूप आहेत कोव्हीड च्या काळात तालुक्यातील नागरिकांना , रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी ते बसल्या जागेवरून ते प्रयत्न करत आहेत .        

Friday, May 28, 2021

मा. प्राचार्य सौ. मंजुषा शांताराम काळे

मा. प्राचार्य सौ. मंजुषा शांताराम काळे

"दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मेसूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥" - संत ज्ञानेश्वर माऊली

आदरणीय मंजुषाताई, आपणास आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा 'संस्थात्मक कार्यकर्ता गौरव पुरस्कार' प्रदान करताना संस्थेला अतिशय आनंद होत आहे.

ताई आपण आपली आवश्यक अशी एम.ए., एम.एड. अर्हता प्राप्त करून; आदिवासी भागात शिक्षिका म्हणून सेवा करण्याचे असिघाराव्रत घेतलेत. गत पंचवीस वर्षांपासून आपण 'श्री स्वामी समर्थ सेवा संस्था' संचालित 'समर्थ कन्या प्रशाला' या संस्थेत राजूर येथे सेवारत आहात. त्याचबरोबर आपण त्या संस्थेच्या उभारणीत सिंहाचा वाटा असून; आपल्या आदिवासी मुली व महिला यात शैक्षणिक व सामाजिक प्रबोधनाचे काम करीत आहात.

आदिवासी भागातील नापास झालेल्या मुलींना प्रोत्साहन देऊन त्यांच्यासाठी पुन्हा शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम आपण सुरू केलेत. आदिवासी भागात असे काम करणे हे अतिशय अवघड कार्य होते. या प्रयत्नांतूनच आपण सामाजिक व शैक्षणिक प्रबोधनाची, राष्ट्रीय दृष्टी असलेल्या, सेवाभावी, धुरीण कार्यकर्त्यांच्या सकारात्मक सहाय्याने; संस्थात्मक कार्यास सुरुवात केलीत. गाईच्या गोठ्यात बीस विद्यार्थिनींना घेऊन सुरू केलेल्या कार्याचा आता वटवृक्ष झाला आहे. आता एक हजार कन्या या विद्यालयाचा लाभ घेत आहेत. हे केवळ आपली सेवावृत्ती, जिद्द आणि चिकाटी यामुळेच शक्य झाले आहे. या शैक्षणिक कार्याबरोबरच आपण हुंडाबंदी, बालविवाह प्रतिबंध, युवती सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे, पर्यावरणपूरक कार्यक्रमांतर्गत पाणी बचत कार्यक्रम, लेक वाचवा लेक शिकवा, महिला प्रबोधन व सक्षमीकरण मेळावे, संस्कारवर्ग अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून; सामाजिक प्रबोधन, पर्यावरण संरक्षण आणि राष्ट्रीय प्रश्न सोडवणूक; असे महत्त्वाचे कार्य करीत आहात.

आपण राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप, बालविवाह प्रतिबंध यासाठी प्रबोधक व्याख्याने, या गोष्टी करण्यात पुढाकार घेतलात. कोणतीही शिक्षणसंस्था आणि त्यातील आचार्य, प्राचार्य ह्या व्यक्ती केवळ व्यवसाय म्हणून कार्य करीत नसतात; तर 'विश्व मोहरे लावावे' यासाठीचा सेवा व प्रबोधनाचा यज्ञ करीत असतात. या सेवाव्रताचा आपण वस्तुपाठ आहात. समाजाने शासनाने आपल्या या ध्येयनिष्ठ सेवाकार्याची नोंद घेऊन आपल्याला मार्गदर्शक, प्रबोधक आणि उपक्रमशील प्राचार्य म्हणून गौरविले आहे. आपले जलसंधारणाचे कार्य हे वाखाणण्यासारखे आहे.

याशिवाय आपण राष्ट्रीय वृत्ती जोपासण्यासाठी पालक समुपदेशन, गडकोटकिल्ले स्वच्छता अभियान, इफ्तार पार्टी आयोजनातून सामाजिक समरसता संदेशन, शालाबाह्य विद्याथ्र्यांना शिक्षणप्रवाहात आणण्याचे कार्य, वाचन संस्कृती अभिवृद्धी ही वैशिष्ट्यपूर्ण कार्येकरीत आहात. आदिवासी भागात हे कार्य करणे म्हणजे सत्वपरीक्षा होय. आपण ह्या सत्वपरीक्षेत उत्तीर्ण झालातच. इतरांनाही या कार्यात जोडता आहात. माणूस घडविण्यासाठीचे ऋषीकार्य आपण करीत आहात. आपल्या द्या, उपेक्षित आणि वंचितांसाठीच्या कार्यास अभिवादनपूर्वक संस्थात्मक कार्यकर्ता गौरव पुरस्कार देऊन गौरवितांना, हे सन्मानपत्र प्रदान करीत आहोत. आपल्या पुरस्कार स्वीकृतीने पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली आहे. अभिनंदन आणि आभार

Wednesday, May 19, 2021

राम रुपी वैभव भाऊची सेवा करणारा हनुमंत रुपी रमेश...

राम रुपी वैभव भाऊची सेवा करणारा हनुमंत रुपी रमेश... 
राजकारणात माणसे धरसोड करतात आजचा कार्यकर्ता उद्या दुसरीकडेच पाणी भरताना दिसतो,तसेच व्यवसाय नोकरीत असेच काहीशे चित्र पाहायला मिळते .एकनिष्ठ रामभक्त होणे आजच्या युगात कठीण काम आहे .त्याचे कारण दोघांनी एकमेकांना सांभाळून घेणे आवश्यक असते हे ज्याला जमले तो यशस्वी होतो. मात्र असाच एक रामभक्त हनुमान रमेश पुंड  गेली दोन तप राम रुपी वैभव भाऊ पिचड यांचेकडे चक्रधरांच्या माध्यमातून काम करत आहे .त्याच्या इतका विश्वासू एकनिष्ठ सध्याच्या कलियुगात दुरापास्त आहे. वैभव भाऊ सोबत त्यांचे कौटुंबिक संबंध त्यांनी निर्माण केले आहेत .मित भाषिक रमेश पिचड कुटुंबीयांना जीवापाड जपतो कधी चालक कधी अंगरक्षक तर कधी कुटुंबातील घटक ,अश्या विविध भूमिका बजवणारा हा अवलिया तालुक्यात,राज्यात,देशात वैभव भाऊ पिचड कुठे ही जावो त्यांची साथ कधीच सोडत नाही. नेता कसा असावा मालक कसा असावा भाऊ कसा असावा मित्र कसा असावा तर वैभव भाऊ सारखा असा रमेश पुंड छातीठोकपणे सांगतात .त्यांच्या कामाचे कौतुक कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार सतत करत असतात सत्ता  असो अगर नसो मात्र माझे दैवत वैभव भाऊच असे हनुमान रुपी रमेश नेहमी सांगत असतो .मात्र त्याच्या या योगदानाबद्दल वैभव भाऊही भरभरून बोलतात रमेश माझ्या कुटुंबातील एक घटकच आहे माझ्या सुख दुःखात उन, वांरा,पाऊस,असो बाराही महिने माझ्या सोबतीला तो असतोच  .त्याच्या कामाचे मोल शब्दात व्यक्त करता येणार नाही असे वैभव भाऊ म्हणतात.असा या अवलिया हनुमान रुपी रमेश भाऊ पुंड यांचा आज वाढदिवस त्यांना आजच्या दिवशी तमाम तालुक्यातील जनतेच्या तसेच मित्र,हितचिंतक यांच्यावतीने हार्दिक शुभेछ्या.त्यांनी घेतलेला वसा असाच पुढे चालत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना .टीमचे पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे व भरभराटीचे जावो.ही ईश्वरचरणी प्रार्थना....

काजवा महोत्सव कोरोना मुळे ....

: नाशिक- नगर जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील भंडारदरा-कळसूबाई या पर्यटनस्थळांवर दर वर्षी मेमध्ये रंगणाऱ्या काजवा महोत्सवाला यंदा लॉकडाउनमुळे वनविभागाने प्रतिबंध केला आहे. त्यामुळे राज्यातील या बहुचर्चित काजवा महोत्सवातील ५० लाखांहून अधिकचे अर्थकारणही "लॉक" होणार आहे.
 ग्रीष्म ऋतू संपतो न संपतो, तोच वर्षाराणीच्या स्वागतासाठी निसर्गदेवताच जणू काजव्यांच्या रूपात धरतीवर अवतरलीय की काय, असा विचार मनात चमकून जावा. गगनातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय! इथे रात्रच चांदण्याची झालीय, याचा प्रत्यय येथील महोत्सवाच्या निमित्ताने काजव्यांच्या दुनियेत येतो. मात्र, हा निसर्गाविष्कार पर्यटकांना, निसरप्रेमींना यंदा पाहता येणार नाही. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जून च्या १५ तारखेपर्यंत काजवा महोत्सव पाहण्यासाठी या परिसरात प्रचंड गर्दी होते.
 मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्यासाठी वनविभागाने ३१ मे पर्यंत अभयारण्य परिसरात प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे भंडारदरा परिसरातील काजव्यांचे लुकलुकणे यंदा अनुभवता येणार नाही.

काजव्यांची अनोखी दुनिया
भंडारदरा घाटघर कळसूबाई परिसरात पावसाळ्यातील जलोत्सव, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फुलोत्सव आणि मेअखेर आणि जूनच्या पहिल्या पंधरवड्यात हजारो झाडांवर काजव्यांची ही अनोखी दुनिया अवतरते. कळसूबाईच्या पायथ्याशी घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत, मुतखेल, कोलटेंभे, भंडारदरा, चिचोंडी, बारी या खेड्यांच्या शिवारात आणि रंधा धबधब्याजवळची झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडतात. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अदभुत खेळ चालतो.
यंदा मात्र पर्यटकांना बंदी
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जगभर कोरोनाचा उपद्रव वाढत आहे. हा कोरोना आपल्या गावात येऊ नये यासाठी खबरदारीचा भाग म्हणून प्रशासनाने व वन्यजीव विभागाने मागील काही दिवसांपासून  या परिसरात पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे.त्यामुळे येथील जवळपास दीडशे ते दोनशे   गाइड्सचा रोजगार बुडून हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक फटका बसणार आहे.
दोनशे गाइड यांचा रोजगार बुडणार
काजवा महोत्सवाच्या निमित्ताने त्या भागात साधारण ५० ते ६० लाखांची उलाढाल होते. पर्यटकांकडून शुल्कापोटी सात लाख, दोनशे गाइडना साधारण चार ते पाच लाख, तर दहा ते पंधरा हॉटेलचा साधारण ४० लाखांच्या आसपासचा हॉटेल व्यवसाय होतो. यंदा महोत्सव होणार नसल्याने सगळ्यांचे मिळून ५० ते ६० लाखांच्या आसपास अर्थकारण बुडणार आहे.
काजवा महोत्सवात वन्यजीव विभागांतर्गत ग्रामविकास समिती काजवा महोत्सवात पर्यटकांकडून जे शुल्क आकारते ते साधारण सात लाख रुपये यंदा बुडणार आहेत. पर्यटकांना  कळसूबाई- भंडारदरा अभयारण्यात  वनविभागाकडून ३० मे पर्यंत बंदी करण्यात आली आहे. त्यासाठी आमचे कर्मचारी तैनात आहेत.
- अमोल आडे, वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारदरा

Friday, April 9, 2021

फुल शेतीतून सोने उगले

फुलशेतीतून सुखाचा बहर
http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-arote-family-has-raised-their-income-through-floriculture-42451

Friday, February 12, 2021

मोहमोहाचे महत्व मोहाच्या झाडाला राजश्रय - राज्य झाड होण्याची गरज

मोहाचे महत्व मोहाच्या झाडाला राजश्रय 
- राज्य झाड होण्याची गरज

मध्य भारतात किमान 50 जिल्ह्यांत आदिवासींना रोजगार देणारे झाड म्हणजेच मोह होय. इतर अनेकांसाठी हे फक्त एक झाड म्हणून गणले जाते परंतु आदिवासी लोकांसाठी हे झाड ‘मोठा देव’ आहे. याच झाडाच्या खाली ‘मुटम्या देव’ किंवा मोठा देव मांडला जातो. मोहाच्या झाडाची मूळं, फांद्या आणि खोड इंधन म्हणून वापरला जातो, कुऱ्हाडीच्या एकाच घावात मोठ्या लाकडाचे सुद्धा दोन उभे तुकडे होतात, जाळण्यासाठी मोहाच्या झाडाचा सगळ्यात जास्त होतो, हा लाकूड लवकरच फुटतो आणि लवकरच जळतो म्हणून इंधन म्हणून मोहाचा सगळ्यात जास्त वापर होतो. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धानाची शेती खूप आहे, या सर्व लोकांच्या घरी विशेषता शेतकरी, पाटलांच्या घरी बैलांना पाणी पिण्यासाठी मोहाच्या लाकडाच्या डोंग्या बनवले जातात, हीच स्थिती बालाघाट कडे पाहावयास मिळते. या लाकडाच्या पाट्या चांगल्या बनत असल्यामुळे टेबल-खुर्ची अशी साधने बनवण्यासाठी सुद्धा मोहाचा वापर होतो. मासेमारीसाठी लागणारा डोंगा मोहाच्या लाकडाचा असतो, आणि सोनार मोहाच्या कोळशावर सोने, चांदी ठेवून नळीने फुंकर घालीत असतो, लोहार तर नांगर पाजवताना मोहाचेच कोळसे घेऊन या असे आवर्जून सांगतो

मोहाची साल पाण्यात शिजवली जाते आणि एखाद्या मनुष्याच्या अंगात जर थंडी भरली असेल तर किंवा त्याचे अंग दुखत असेल तर अशा पाण्याने त्या मनुष्याची आंघोळ केली जाते, याचा त्वरित फायदा होत असतो.    गायी किंवा बैलांचे शरीर सुद्धा मोहाच्या सालीने शेकले जाते.

मोहाच्या पानाच्या पत्रावळी, द्रोण बनवले जातात. गावागावांत जंगलातून मोहाची पाने गोळा करून उन्हाळ्याच्या दिवसात  लग्नकार्य व इतर समारंभात विकल्या जातात आदिवासींना या पत्रावळी पासून मोठा रोजगार मिळतो. गडचिरोली कडील पत्रावळी नागपुरात उमरेड नाका, रघुजी नगर चौक इत्यादी भागात अगदी कालपर्यंत विकल्या जात होत्या. अक्षयतृतीया ला मी तुकूम(चंद्रपुर-मी रहातो तो वार्ड) मध्ये मोहाच्या पत्रावळी गावातील बायांना विकताना पाहिल्या त्या पत्रावळीवर अन्न ठेवून आपल्या पूर्वजांना अर्पण केले जाते. मोहाचे स्थान निव्वळच आदिवासी नाही तर सर्वसामान्य लोकांच्या जीवनात त्यांच्या धर्म कार्यात, त्यांच्या लग्नकार्यात आणि सामाजिक जीवनात अत्यंत मोठे आहे. जंगलामध्ये इतरही झाडांची पाने आहेत परंतु सामान्यता मोहाच्या पानांनाच प्रीफर केले जाते. पोळा हा आपल्या सर्व शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण आहे पोळ्याच्या दिवशी फक्त मोहाच्या पत्रावळीत बैलाला जेवायला दिले जाते.

गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये या भागांमध्ये भात पिकवला जातो त्या भागात धानाची रोवणी करताना मोहाच्या पानांचा बनवलेला मोर्या अंगावर घेतला जातो. बांबू आणि मोहाची पाने यापासून बनवलेला हा मोरया विशेषता पेरणी करताना, धानाच्या पेंड्या उपटताना, व धानाचे ट्रान्सप्लांटेशन करताना अत्यंत महत्त्वाचा आहे, याशिवाय रोवणीची कल्पनाच करता येत नाही. पेरणी करताना मोहाच्या मोरया वर कितीतरी गीत आजपर्यंत बाया म्हणतात आली आहेत….. एक गीत, “रोवना रोउ बाई, रोवना रोउ बाई… मोऱ्या कोटी ठेऊ…”

ज्या दिवशी रोहिणी संपते त्या दिवशी या मोऱ्याची पूजाही केली जाते, नंतर ते सुरक्षित ठेवले जातात आणि पुढील वर्षी त्यात पुन्हा सुधार करून त्यांचा वापर केला जातो. पावसाळ्यात मोरया एक तर गरम राहतो आणि शरीराला पाणी लागू देत नाही

मोहाचे अनंत गुण आणि कार्य असताना मोह फक्त दारू साठी बदनाम करण्यात आलेला आहे, मोहामुळे आदिवासीची सुद्धा बदनाम केली जाते, खरे तर ते आमच्या पेक्षा जास्त सुसंस्कृत आहेत. मोहाची दारू पिऊन लोक गावात फिरत असतात, दारू शिवाय त्यांचे जीवनच चालत नाह.  जन्म होताना, लग्न होताना आणि मरताना सुद्धा दारू आदिवासींची सोबती आहे, त्याच गावात झामपर नसलेल्या स्त्रिया सुधा रस्त्याने जात असताना, अगदी जंगलात सुद्धा अशा फिरत असताना, आदिवासींच्या परिसरात एखादा बलात्कार झाला, कुणीतरी एखाद्या स्त्रीची छेड काढली असे कधीच पहावयास मिळत नाही.
बाळंतपणाच्या वेळी मोहाची दारू सुद्धा पाजली जात होती, तिने बळ येते व बाळांतीनचे शरीर गरम राहते.  लग्नात  नवरदेव आणि नवरी मोहाच्या पाटावर किंवा पिढ्या वर बसलेले असतील, लग्नात मोवई चे  खांब केंद्रस्थानी लावले जाते, या खांबावर सुंदर नक्काशी काढली जाते. 

मोहापासून फक्त दारूच मिळते असं नाही, मागील महिन्यात मी  अनेक गोष्टी पाहिल्या आणि खाल्ल्यात सुद्धा. माझे मित्र डॉक्टर कुंदन दुपारे आणि डॉक्टर विना जांबेवार यांनी तयार केलेले मोहाचे लाडू गुजरातच्या स्त्रियांनी विकत घेऊन नेले. बोराचे बोरकुट जसे असते तसे मोहाची सुद्धा लहान लहान बिस्किट्स तयार केले गेले, दाळीच्या पुरणपोळी पेक्षा मोहाची पुरणपोळी अतिशय स्वादिष्ट असते, डॉक्टर विना जंबेवार ह्या होम इकॉनॉमिक्स या विषयाच्या प्रमुख आहेत आणि त्यांची पीएचडी ' नॉन टीम्बर फॉरेस्ट प्रॉडक्ट' या विषयावर आहे. त्यांच्या संशोधनात त्यांनी असंख्य असे प्रोडक्स प्रोपोज्ड केले आहेत. शासनाने जर अशा संशोधकांना चालना दिली तर या संपूर्ण भागातील आदिवासींचे जीवन उंचावू शकते. काजू हे भारतातील फळ नाही ते पोर्तुगीजांनी बाहेरून गोव्याकडे आणलेले आहेत, परंतु मागील शंभर वर्षात काजू पासून बनवलेली "फेणी" निव्वळ राजाश्रय मिळाल्यामुळे आम्ही तयार करू शकलो तसा राजाश्रय मोहाला दिला गेला नाही. जग एका अतिशय सुंदर अशा दारूला मुकलेले आहे कारण यावर संशोधन झाले नाही. हे लिहिताना मी फक्त इकॉनॉमिक्स कन्सिडर करतो इथिक्स बाजूला ठेवीत आहे. आदिवासींची मोहापासून दारू बनविण्याची पद्धती जगात अतिशय वेगळी आहे, इंटेलेक्चअल प्रोपर्टी राइट्स (IPR) मध्ये तिच्या प्रोसेस ला रजिस्टर करून तिच्यापासून पेटेंट मिळवता येऊ शकतो, इतकी ती वेगळी आहे, परंतु आपल्याकडील माझे अतिशय खराब आणि इंपोर्टेड म्हणजेच अतिशय सुंदर हा भ्रम भारतीयांच्या मनात झाल्यामुळे आमची गोची झाली आहे.

मोह फुलांची भाजी सुद्धा केली जाते, टोळीच्या तेलात फ्राय करून तिखट मीठ टाकून, मोहफुलांची भाजी केली जाते. वाळलेल्या मोहात  चण्याची किंवा लाखोरी ची डाळ टाकून मोहांचा वरण सुद्धा केला जात होता. आजकाल गावागावांत भाज्या उपलब्ध झालेल्या आहेत, पावसाळ्यातील दिवसात अशा भाज्या मिळत नव्हत्या तेव्हा मोहाचे वरण सुद्धा केले जात होते. जवस आणि मोह भाजून व कुटून सुपारी सारखे खेड्यामध्ये खातात. मोहफुले पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी काढून ते शिजवले जाते, ते अगदी शहदासारखे बनते त्याला पोळी सोबत खाल्ले  जाते. कधी कधी यात मुरले टाकून त्याचे लाडू तयार केले जातात, मोहाची वाळलेली फुले भाजून त्यात गूळ टाकून त्याचे लाडू बनवले जातात तर कधी पीठ टाकून त्याचे वडे म्हणजेच मूठ्ठे बनवतात, भंडाऱ्याकडे यांना मोहाचे बुढें असे म्हणतात, याला मोहाचे बोंड असेही म्हटले जाते. बुड्ढे गरम असतात, त्यांनी पोट भरतो यामुळे खोकला होत नाही

मोहापासून आणखी एक पदार्थ मिळतो तो म्हणजेच टोळ होय. मोह संपल्यानंतर फुलांचे ऐवजी फळ लागते, तो म्हणजे टोळ होय. टोळीचे तेल काढले जाते, आयुर्वेदात या तेलाला  महत्त्वाचे स्थान आहे. हात पाय दुखल्यास खूप थकल्यास आम्ही मेडिकल मधून अनेक तेल विकत घेतो, टोडीचे तेल गरम करून हात-पाय चुडा आणि दहा मिनिटात तुमच्या शरीराला मिळालेला आराम स्वतः अनुभव घेऊन पहा. टोळीचे तेल डोक्याला लावतात, याला अमिताभ बच्चन सारख्या एखाद्या माणसाने नवरत्न सारखी फक्त एडवर्टाइज करायची गरज आहे, तो सातासमुद्रापार विकला जाईल याची शंभर टक्के खात्री आहे. तीस वर्षांच्या अगोदर गावातील लोकांनी टोळीच्या तेलाची भाजी फ्राय केली आहे, देवळात टोळीच्या म्हणजेच मोहाच्या तेलाचा दिवा लावला गेला आहे, आधी गावागावांमध्ये तेलाचे घाणे असायचे, टोळ टाकून त्यात तेल वेगळे आणि ढेप वेगळी केली जात होती, जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक होती.  परंतु या सर्व गोष्टींना आता आम्ही मुकलो आहोत. आमच्या विकासाचा मॉडेल जंगल, त्यातील पदार्थ या सगळ्यांचा नाश कसा होईल आणि विदेशातून आलेले बाजारू पदार्थ आमच्या घरापर्यंत कसे येतील असाच आहे. 1955- 56 च्या आसपास महाराष्ट्र बनायच्या अगोदर आणि नागपूर राजधानी असताना सरकारने एक शासन निर्णय काढला होता. या शासन निर्णयात म्हटले गेले होते की मोहाची झाडे तोडून टाका त्यापासून आदिवासी दारू बनवतात आणि त्यांचे जीवन नाश पावते, याच शासन निर्णयात असेही म्हटले गेले होते की आदिवासींच्या जीवनात टोळीचे खूप मोठे महत्त्व आहे म्हणून टोळीच्या झाडांचे संरक्षण झाले पाहिजे. जंगलातील पदार्थांबाबत सरकारचा किती अभ्यास आहे ते या शासन निर्णयातून स्पष्ट होते.

टोळीच्या आतील बियांपासून आंघोळीची साबणे तयार केले जातात, पिकलेल्या केळीचे पिवळ्या रंगाचे सालटे खायला गोड असते लहानपणी आपण सर्वांनी ती खाल्ली असतील, पावसाळ्यात स्वयंपाक झाल्यानंतर गरम चुलीत काही टोळी टाकतात, त्या वासाने साप घरात येत नाही असा समज होता आणि तो खरा सुद्धा होता.  टोळ बाळंतीन बाईला खायला देतात, टोळ खाल्ल्यामुळे तिला चांगला दूध देतो असा समज आहे. टोळीपासून खाण्याचे अनेक पदार्थ सुद्धा बनवले जातात.

मोहाचे झाड अत्यंत उंच असल्याने आणि तप्त उन्हाळ्यात सुद्धा हिरवेगार असल्याने या झाडाचे पर्यावरणीय दृष्ट्या सुद्धा अत्यंत मोठे महत्त्व आहे, अनेक प्राणी आणि पक्षी यांचा आश्रय म्हणजेच मोह आहे. मोहाच्या झाडावर अनेक वानर येऊन मोहफुले खातात आणि नशा आली की झाडावर धिंगाणा करतात. अस्वल, गावठी डुक्कर, रान डुक्कर, ससा, सांबर, नीलगाय, शेळ्या, गाई, बैल, हरीण हे सर्वच प्राणी मोहफुले खात असतात. या झाडाची बायोलॉजिकल कॅरिंग कॅपॅसिटी इतर कोणत्याही झाडांपेक्षा जास्त आहे.

एवढं सगळं असताना महाराष्ट्रात मात्र आज महाराष्ट्र फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन च्या वतीने सरसकट मोहाची झाडे सुद्धा कापली जाऊन त्या ठिकाणी फक्त सागवन आणि बांबू लावला जातो, मागील चार महिन्यात वडसा(गडचीरोली-चंद्रपुर सीमेगत) जवळील 11 गावांतील  सर्वच झाड सरसकट कापली गेली, गावातील गावकऱ्यांनी किमान मोहाची झाडे कापू नका फळांची झाडे कापू नका अशा प्रकारची विनंती शासनाला केली परंतु त्यांच्या मागणीकडे शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामसभा आता सुप्रीम कोर्टात गेलेल्या आहेत. ज्या सागवणाला लावले जाते त्याची बायोलॉजिकल कॅरिंग कॅपॅसिटी किती ? याचा आपण कधीच विचार करत नाही. सागावणाच्या झाडावर एक  पक्षांचा घरटा दाखवा आणि बक्षीस मिळवा अशा प्रकारची पैज लावायची माझी इच्छा आहे.
 
हे सर्व होताना एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ती अशी की मोहाचे झाड राज्याचे झाड होण्यासाठी आपण काही हातभार लावू शकतो का ? सध्या आंबा हा महाराष्ट्राचा राज्य झाड आहे, परंतु आंब्याच्या तुलनेत मोह हा कल्पवृक्ष समजला जातो. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आंब्यापेक्षा मोह जास्त महत्वाचा आहे…
[माहिती साभार :- #डॉ_योगेश_दुधपचारे_चंद्रपुर]

Sunday, January 10, 2021

संस्काराचे विद्यापीठ....

हळव्या मायेच्या बोलांनी माणसाला जीव लावणारी काही नाती विलक्षणच असतात . भले ही नाती नसूद्यात रक्ताची .. अकोल्यातील चिरेबंदी परिसरात टाकळकर वाड्यात होतं असंच गजबजलेलं नांव अन् एक मायेचं गांव .. टाकळकर मामी नावाचं ! या नावाचं वलय आणि मात काय सांगावी देवा ! 

   प्रमिला पुरुषोत्तम टाकळकर हे झालं लौकीक नाव हो . पण ' टाकळकर मामी ' हीच खरी ओळख या आजींची . वयाच्या ९२ वर्षी नुकताच निरोप घेतला मामींनी . टाकळकर मामांची पत्नी , प्रकाश उर्फ मधू टाकळकरांची आई , टाकळकर वाड्यासह पंचक्रोशीतील मामी ! हळव्या मायेचं उत्साही बोलणारं व्यक्तित्व . आल्यागेल्यांची आस्थेनं  विचारपूस करणारं , चहापाणी - नाश्ता घेतल्याविना दाराबाहेर पडू न देणारं , गोडगोडव्या शब्दांत संवाद करणारं , खणखणीत आवाजातलं , समजुतीनं बोलणारं असं सारं वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तित्व म्हणजे टाकळकर मामी ! आपुलकीनं अनेकांचा या घरात सातत्याने वावर असायचा .. 

   मामी म्हणजे शिस्त . मामी म्हणजे वळण . मामी म्हणजे समजून उमजून लळा लावणारं घर . मामी म्हणजे तब्येतीची ख्यालीखुशाली विचारणारं आदराचं ठिकाण . मामी म्हणजे जिव्हाळ्याची सावली . जुन्या वळणाचा जिना पार करुन मामींना आवर्जून भेटायला जाताना घराला दार असेल .. उंबरा असेल .. पण येणाऱ्याच्या पावलांना नव्हता अटकाव आणि अडसर - अडथळा ! इथल्या आतिथ्य सागराला नव्हता कधी किनारा . प्रत्यक्ष भेटीत मामींचं आवर्जून स्मरणभरलं बोलणं असायचं , ' सर , परवा बातमी वाचली . मागचा लेखही वाचला बरं का ! अभिमान वाटतो . ' तर कधी - ' मधू सरच हवेत का .. घाई नाही ना निघण्याची .. म्हटलं बघूयात परस्पर जाताय काय ! ' अशी सारी एकंदर विचारपूस .. 

   कधी चिरेबंदी वाड्याच्या मुख्य कमानीसमोरील पुरातन शिव मंदिराच्या ओट्यावर बसलेल्या मामी माणसांची मनाची - आदराची श्रीमंती जमवत संवादी सूर जपणार . तर कधी वाट पाहणारं हे दार  किलकिल्या नजरेनं ममतेचं नातं अधिक दृढ करणार ! 
    कधी मामी हळव्या मनानं म्हणायच्या -
     ' तुम्ही मधूकडं येतात . माझ्याकडे येतात आठवणीनं . फार बरं वाटतं . '  
   ' मामी तुमच्यासाठीच तर यायचं की . टळून टाळून कधी घडेल काय ? ' 
  ' हो ना .. हो ना . आहे तोवर येत जा ! ' 
     मामी दीर्घायु ठरल्या . वय होतं अधिक . पण मन आणि उत्साही बोलणं .. अगत्य अन् आतिथ्य नाही कधीच उणं पडलं इथं .. या आस्था - आपुलकीनं मग आठवतात पाडगावकरांच्या ओळी - 
       ' कुठे कुणाच्या घडल्या भेटी ।
      गीत एक मोहरले ओठी । 
      त्या जुळल्या ह्रदयाची गाथा ।
     सूर अजूनही गाती । 
     देवघरच्या समईमधुनी अजून जळती वाती .. ' 

     वाट पाहणारं हे दार , हा वाडा , हा जिना , चिरेबंदीचा परिसर , शिवालयाचा ओटा आता अधिक अधिक शांत शांत , सुना सुना ... रिता रिता .. हरवलेल्या श्रीमंती क्षणांची , आठवणींची गडदगर्द सावली विरळ - जाळीदार पिंपळ पानासारखा याद देणारा असेल .. 
      ----------------------------------- 🍂🍂

    📚 डॉ . सुनील शिंदे

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...