Tuesday, March 5, 2024

आदिवासी भागातील १०० गावांना बी. एस. एन. एल. रेंज मिळणार

अकोले,ता.५:आदिवासी भागातील १०० गावांना बी. एस. एन. एल. रेंज मिळणार असून ३८टॉवर्स उभारण्यात आले असून हे काम अंतिम टप्प्यात आल्याचे आदिवासी भागात फेर फटका मारला असता दिसून आले .प्रत्येक गावातील ग्रामपंचायत तसेच वैयक्तिक लँड लाईन कनेक्शन देखील देण्यात येणार आहे .त्यामुळे अकोले तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागाचा संपर्क वाढणार आहे . ग्रामपंचायत,महसूल,जिल्हा परिषद शाळा,माध्यमिक शाळा,शिक्षण संस्था,बँक,बचत गट,बांधकाम,वनविभाग यांना रेंज मिळाल्याने संगणकाद्वारे ऑन लाईन कामे जलद गतीने होतील हे कामे जलद गतीने होण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी या कामासाठी मदत करत आहेत .तर स्थानिक ग्रामस्थ देखील टॉवर्स कामासाठी जागा उपलब्धता ,तांत्रिक कर्मचारी याना भोजन ,पाणी,राहण्याची व्यवस्था करून हे काम रात्र दिवस एक करून कोणत्याही परिस्थितीत गावात रेंज येण्यासाठी वाट्टेल ते म्हणत सर्वच काम करीत आहेत . सयाजी अस्वले (सरपंच कुमशेत)आमचे गाव अतिदुर्गम असून रस्ता नाही,वीज जाते,दळण वळण कधी बंद तर कधी चालू त्यात मोबाईल ला रेंज नसल्याने गावाचा संपर्क तुटतो मात्र अलीकडे बीएस एन एल टॉवर्स उभे राहत असून त्यामुळे आमच्या मुळा परिसरातील पन्नास गावांचा वाडी वस्ती वर रेंज आल्यावर आम्हाला सर्वत्र संपर्क साधता येणार आहे तसेच ग्रामपंचायत कार्यालयात नेट उपलब्ध झाल्यावर ऑन लाईन प्रस्ताव पाठवता येऊन काम जलदगतीने होण्यास मदत होणार आहे. वैभव पिचड (माजी आमदार )अकोले तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात रेंज नसल्याने मोठी अडचण होती .शेतकरी,विधार्थी ,बँक,ग्रामपंचायत यांची कामे ठप्प झाली होती याबाबत केंद्र व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार संपर्क साधून प्रश्न उपस्थित केला. केंद्र व राज्य सरकारने तातडीने टॉवर्स उभारून या भागातील प्रश्न मार्गी लावल्याने भागात समाधान व्यक्त होत आहे सदाशिव लोखंडे (खासदार)अकोले तालुक्यात ३४टॉवर्स मंजूर करून आदिवासी ग्रामीण भागात बीएस एन एल रेंज मिळण्यासाठी प्रयत्न केले आज हे काम अंतिम टप्प्यात असून १००गावांना त्याचा निश्चित फायदा होईल . कुमार सुमित (जे.टी. ओ, बी.एस.एन.एल.अकोले) तालुक्यात जुने चार टॉवर्स असून फोफसंडी, खिरविरे, पळ सुंदे,कोहणे, या चार गावातील परिसरात अपग्रेड करण्यात आले असून नवीन ३४टॉवर्स बसविण्यात आले असून परिसरातील १००गावात रेंज येणार असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे .तसेच सर्व तांत्रिक काम सत्तर टक्के पूर्ण झाले आहे . यापूर्वी कोणत्या ठिकाणी सिग्नल आहे नाही याचा सर्व्हे करून त्याप्रमाणे लोकेशन निश्चित करून टॉवर्स बसविण्यात आले . प्राथमिक सिग्नल टेस्ट करून सर्व नियोजन झाले असून लवकरच सर्व ३८टॉवर्स वरून प्रत्येक वाडी वस्तीत रेंज येऊन संपर्क वाढणार आहे .यातील सर्व अडचणी दूर झाल्या असून मार्च अखेर किंवा एप्रिल मे पर्यंत तालुक्यातील सर्व टॉवर्स मधून व्यवस्थित रित्या बी एस एन एल ची सेवा जनतेला मिळेल .

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...