Saturday, March 30, 2024

तरुणांना संधी द्या मतदारांची पुकार

अकोले,ता.३०:शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून तरुणांना संधी मिळण्याची आवश्यकता असल्याचा सूर उमटू लागले आहेत .गेली पंधरा वर्षांपासून या मतदारसंघाचा व त्यात समावेश असलेल्या अकोले तालुक्याचा फारसा विकास झाल्याचे दिसून येत नाही .केंद्र सरकार च्या ज्या प्रमाणात निधी व योजना येणे आवश्यक होते त्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याचे चित्र दिसत नाही .ज्या प्रमाणे अयोध्या,महाकाल,उज्जैन येथे कॉरिडॉर झाले तसे शिर्डीत होणे आवश्यक होते .मात्र आजी माजी खासदारांनी केंद्रात आपले वजन वापरून त्यांनी कॉरिडॉर करण्याचा प्रयत्न का केला नाही हा संशोधनाचा भाग आहे .मतदारसंघात रेल्वे आणता आली नाही .माजी खासदार यांनी शहापूर दर्याबाद रस्ता करण्याची घोषणा केली मात्र त्यासाठी विशेष असे कोणतेही प्रयत्न झाले नाही ,खासदार लोखंडे यांनी पर्यटन, औदयोगिक करणं यासाठी प्रयत्न न केल्याचे प्रकर्षाने जाणवते .कोकणात जाणारे पाणी अडवून गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी किमान होता मात्र पाणी अडविण्याचा घोषणाच ऐक्याला मिळाल्या . अकोले तालुका अतिदुर्गम आदिवासी बहुल येथील शिक्षण,आरोग्याबाबत उदासीनता दिसून येते .आदिवासी साठी केंद्रात मोठा निधी असताना हा निधी शिर्डी मतदारसंघातील अकोले तालुक्यात आणला गेला नाही .की पाठपुरावा करून केंद्रातील एकही प्रकल्प आला नाही .त्यामुळे तालुक्याचा विकास झाला असे म्हणता येणार नाही .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने लोकसभेत मते मिळाली मात्र देशाच्या विकासाबरोबरच तालुक्याचा विकास होईल या मतदारांच्या भावना ची कदर झाली नसल्याची खंत व्यक्त होत आहे . गेली वीस वर्षांपासून त्याच त्याच व्यक्तींना उमेदवारी देऊन पक्षाच्या तरुण कार्यकर्त्याना व नेतृत्वाला खुजे करण्याचा डाव सर्वच पक्षाचा दिसून येत आहे.काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले रुपवते घराणे ,स्वर्गीय दादासाहेब रुपवते,प्रेमानंद रुपवते,स्नेहजा रुपवते यांनी पक्षासाठीं खस्ता खाल्ल्या तर प्रेमानंद रुपवते यांना शिवसेनेने खासदरकीच्या तिकिट देण्याचा निर्णय घेतला मात्र आपली काँग्रेसचं बरी ही भावना अंगिकरून त्यांनी नॉटरीचेबल होऊन तिकीट नाकारले आज ते शिर्डी मतदारसंघाचे खासदार असते .गेली पाच वर्षांपासून त्यांच्या कन्या उत्कर्षाताई रुपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्क ठेवून आहेत .काँग्रेस पक्षाचे काम राष्ट्रीय व राज्य पातळीवर करत आहेत .शिर्डी लोकसभेत त्यांना संधी मिळेल अशी त्यांची व कार्यकर्त्यांची इच्छा होती मात्र महाविकास आघाडीने भाऊसाहेब वाकचौरे यांचं तिकीट जाहीर केल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांची असून त्यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेईल असून वंचित आघाडी सारख्या पक्षाचा त्यांनी विचार केला तर तरुण ,हुशार,व रुपवते घराण्याची पुण्याई म्हणून मतदार त्यांचा विचारही करतील मात्र त्यांनी नॉट रीचेबल होऊ नये असे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करून दाखविल्या आहेत .तर मुख्यमंत्री सहायता निधीचे समन्वयक नचिकेत खरात या तरुणाने देखील शिर्डी मतदार संघात आपला संपर्क वाढविला आहे .शिर्डी चे तिकीट भाजपाला मिळावे अशी कार्यकर्ते व नर्त्यांची इछ्या होती .ते शक्य झाले असते तर माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व भाजप शेतकरी सेलचे राज्य उपाध्यक्ष नितीन उदमले या तरुण नेत्याला संधी मिळाली असती मात्र सदाशिव लोखंडे यांचे तिकीट जाहीर झाल्याने ही संधी हुकली मात्र तरुणांना संधी द्यावी ही मतदारसंघातील बहुतांशी मतदार,सामान्य जनतेची इछ्या आहे हे मात्र खरे ...

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...