Tuesday, March 6, 2018

. किरण यमाजी लहामटे (भाजप )शिक्षण बीएएमएस , जन्मतारीख

राजूर, ता . ५ : डॉ . किरण यमाजी लहामटे (भाजप )शिक्षण बीएएमएस , जन्मतारीख   - तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नव निर्माण सेना , अध्यक्ष सह्याद्री क्रांती दल , सदस्य जिल्हा परिषद राजूर गट - कै . सखाराम लहामटे (आजोबा ) यमाजी सखाराम लहामटे (जिल्हा परिषद सदस्य , पंचायतसमिती उपसभापती ,उपाध्यक्ष  आदिवासी प्रकल्प समिती , सदस्य , आदिवासी उन्नती सेवा मंडळ , अध्यक्ष आदिवासी सहकारी संस्था )
अकोले तालुक्यात आरोग्यसेवेचा सामाजिक भावनेतून मी  वैधकीय पदवी घेऊन राजूर येथे रुग्णालय सुरु केलेमात्र तालुक्यातील आरोग्य , रस्ते , रोजगार  याबाबत दिसून आलेली उदासीनता पाहून आपण  सह्याद्री क्रांती दलाची स्थापना केली . तर वडील यमाजी सखाराम लहामटे शिक्षक पदाची नोकरी सोडून राजकारणात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायतसमिती निवडणूक लढवून जिल्हा परिषद सदस्य झाले व पंचायतसमितीचे उपसभापती पद मिळाले पदाच्या माध्यमातून अंबित , अप्पर अंबित होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते मात्र नेतृत्वाने सगळे कामे एकाच वेळी करायचे नसतात असा त्यांना सल्ला दिला . त्यामुळे माझ्या मनात राष्ट्रवादी नेत्याबद्दल राग होताच त्यातच मी एका सभेत माजी मंत्री पिचड यांच्या उपस्थितीत केवळ नारळ फोडून विकास कामे होत नाही हात दुखवण्यापेक्षा तर प्रत्यक्ष कृतीवर भर द्या असे ठणकावून सांगितले . त्याचा पिचड याना राग आला त्यांनी वडिलांना मुलाला समजून सांगा असे सांगितले  तर वडिलांना  जिल्हा परिषद समाजकल्याण पद हि नाकारले व पंचायतसमितीचे  सभापती पद देण्याचे कबुल करूनही ते दिले नाही व उपसभापतीपद हि काही काळ च त्यांच्याकदे ठेवून त्यांचा राजीनामा मागितला त्या दिवसापासून वडिलांनीही स्वाभिमान दुखविल्याने राष्ट्रवादीशी सोडचिट्ठी घेऊन घरी बसण्याचा निर्णय घेतला   त्याच वर्षी आपण मनसे ची स्थापना केली व गावागावात मनसे च्या शाखा सुरु करून राजकारणात पूर्णवेळ उतरलो . विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मधुकर तळपाडे याना साथ केली . वैभव पिचड निवडून आल्यानंतर राजकारणात प्रामाणिक माणसाचे काम नाही अशी मनाशी खूणगाठ बांधून पुढील वैधकीय शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेलो मात्र राजूर जिल्हा परिषद गटाची जागा  रिकामी झाली . त्यावेळी वडिलांनी मला जिल्हा परिषद लढविण्यास सांगितले मात्र धनशक्तीच्या विरोधात लढणे अवघड होते त्यात मी शिवसेनेला विधानसभेत  मदत करूनही   मोठ्या मनानें मला भाजपचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे यांनी भाजपमध्ये येण्यास सांगून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी करण्यास सांगितले त्यावेळी काशिनाथ दादा साबळे , किरण माळवे , श्रीनिवास एलमामे व असंख्य कार्यकर्ते यांनी आग्रह केल्याने मी राजूर गटात जिल्हा परिषद निवडणूक लढवली व सर्वांच्या मदतीने भाजप पक्षातर्फे निवडूनही आलो . या संधीचा फायदा घेऊन रस्ते , गटारी , वीज , शिक्षण या प्रश्नावर आवाज उठवून निधी आणून काम केले त्यानंतर सातेवाडी गटातूनही मोठ्या मताधिक्याने दुसऱ्यांदा निवडून आलो . तर राजूर ग्रामपंचायतमध्येही राजूर विकास आघाडीची स्थापना करून ५ सदस्य निवडून आणले . एक गाव एक गणपती सामुदायिक विवाह या माध्यमातून सामाजिक काम उभे केले . भाजपचे सरकार केंद्रात व राज्यात आल्याने अकोले तालुक्यातील टोलारखिंड , पिंपरकणे पूल , रस्ते , पाणी योजना यासाठी निधी मिळविण्यासाठी आपली धडपड आहे पठारभाग आजही विकासापासून वंचित आहे तेथे सोयी सुविधा करून आश्रमशाळेच्या दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी आपला भर आहे नामांकित शाळेच्या नावाखाली राष्ट्रवादीचे मंडळी आपले भले करून आदिवासींच्या मुलांना दुय्य्म वागणूक देत आहे यावर अंकुश ठेवणे आवश्यक आहे , खेतवाडी येथे ७० लाख रुपये आरोग्य केंद्रास निधी आणला असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून वागदरी व चिंचवणे येथे रस्ते मंजूर केले पेठ्याची वाडी येथे रास्ता , हायमॅक्स देण्यात आले आहेत . २०१९ च्या निवडणुकीत आमचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे याना विधानसभेची उमेदवारी मिळाली तर मी त्यांचा प्रचार करेल मात्र मला उमेदवारी मिळाली तर त्यांचे आशीर्वाद असणे हि अपेक्षा आहे . माझे विरोधक पिचड पितापुत्र असून जे त्यांच्याविरोधात लढेल त्यांना पपाठिंबा देईल मात्र आदिवासींचे हक्क बिगर आदिवासींना व आपल्या कुटुंबातील व्यक्तींना देऊन आदिवासींवर अन्याय  होत असेल तर पिचडांविरोधात रस्त्यावर उतरून लढा देऊ जिल्हा सहकारी बँकेतील नोकरी घोटाळा , तालुक्यातील बसस्थानकात झालेला गोंधळ याची निःपक्षपातीपणे चौकशी होण्याची मागणी आपण करणार आहोत .तर जिल्हा विभाजन होऊन राजूर तालुका व्हावा हि माफक अपेक्षा सोबत फोटो

aadivasi vidharthi

 म . टा . वृत्तसेवा ,अकोले- अकोले तालुक्यातील आदिवासी भागात एस टी  बस वेळेत नसल्याने खेड्यापाड्यातील शालेय विध्यार्थ्यांना आपला प्रवास मोटरसायकल व जीपवर करावा लागतो . सध्या राजूर , अकोले , कोतुळ , समशेरपूर येथे परीक्षाकेंद्र असून परीक्षा केंद्रावर रोज वेळेत पोहचण्यासाठी खाजगी जीप अथवा मोटरसायकलवर विधार्थी जा ये करतात त्यात एका गावातून १५ ते २० विधार्थी असल्याने व जीप मध्ये जागा न होत असल्यामुळे जीपच्या टपावर  बसूनही  जीवघेणा प्रवास करावा लागण्याची वेळ या विधार्थ्यांवर अली आहे . या भागात मिनी बस सुरु कराव्यात या साठी अकोले आगर व्यवस्थापकांना वेळोवेळी अर्ज व निवेदन देऊनही याबाबत अधिकारी गप्प आहेत तर आहे त्या एस टी बशी नादुरुस्त असल्याने विधार्थी बसच्या भरवशावर न राहता खाजगी जीप करून कॉलेजला येतात त्यामुळे आदिवासी भागात रोज खाजगी जीप विधार्थी व प्रवासी वाहतूक करताना दिसतात .विधार्थी प्रवास करीत असल्याने पोलिसही याकडे दुर्लक्ष्य करतात मात्र एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण असा प्रश्नी उपस्थित झाला आहे .
चौकट - विध्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी जीप वेळेवर मिळत नसल्याने नाविलाजास्तव विधार्थी खाजगी जीपने प्रवास करतात तर पालकांनाही माहित असून वेळेवर बस नसल्याने ते याबाबत बोल्ट नाहीत तर विधार्थी आपल्या पालकांकडे मोटारसायकलची मागणी करून मोटरसायकलवर तीन ते चार विधार्थी एकच वेळेस प्रवास करतात त्यामुळे शिक्षणासाठी काही पण .... असा सूर विधार्थी  आळवतात  यावरून हे चित्र समोर आले आहे .
अकोले तालुक्यात ५ केंद्रावर सुमारे ३९८६ विधार्थी १२ वी च्या परीक्षेसाठी बसले असल्याची माहिती  गट शिक्षण अधिकारी अरविंद कुमावत यांनी दिली आहे , कॉपीमुक्त वातावरणात सर्वच परिक्षेकेन्द्रावर परीक्षा सुरु असून केंद्रावर बंदोबस्तही ठेवण्यात आला असल्याचे म्हणाले .
अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील विधार्थी राजूर , अकोले , कोतुळ  या ठिकाणी परीक्षेसाठी आले असून  शिक्षकही त्यांच्यासोबत  परीक्षा देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करीत आहे . पहिल्या दिवशी आज इंग्रजी पेपरसाठी प्रत्येक केंद्रावर विधार्थी १५ मिनिट अगोदरच हॉल मध्ये जाऊन प्रश्न पत्रिकेचे वाचन करताना दिसले  अकोले  कॉलेज येथे १७७२ विधार्थी , केळी रुम्हणवाडी आश्रमशाळा ४५७ विधार्थी सर्वोदय विधा मंदिर राजूर ८५८ विधार्थी तर कोतुळेश्वर विधालय कोतुळ येथे ५९० विधार्थी तर नव्यानेच देण्यात आलेल्या राजूर येथील महाविधालयात  स्वयंअर्थ ज्युनियर कॉलेज केंद्रावर ३०९ विधार्थी असे ३९८६ विधार्थी परीक्षा देत आहे . चौकट --  नव्याने देण्यात आलेल्या केंद्र बाबत वशिलेबाजी झाल्याचा आरोप -- नव्यानेच राजूर येथे एका च संस्थेला दुसरे केंद्र देऊन  अधिकारी वर्गाने वशिलेबाजी करून अगोदर अर्ज असताना व कॉलेजला १० वर्षे झालेल्या एका कॉलेजला ५५०० रुपये प्रस्ताव फी भरूनही केंद्र देण्यात न आल्याने आदिवासी भागातील ,पालक  विधार्थी व संस्थाचालक यांनी  नाराजी व्यक्त करून शिक्षण मंत्री यांचेकडे तक्रार केली आहे तर शेंडी भंडारदरा येथील विध्यार्थ्यांना २० किलोमीटर राजूरला येऊन परीक्षा द्यावी लागत असल्या ने या केंद्रालाही मंजुरी देणे आवश्यक असताना केवळ वशिलेबाजी व निकष न पळताही नवीन केंद्र कसे देण्यात आले याबाबत जोरदार चर्चा आहे . सोबत फोटो rju २३p ३ ,४आज पहिल्याच दिवशी राजूर येथून अर्ध किलोमीटरवर पायी , मोटरसायकलवर जाऊन विध्यार्थ्यानी परीक्षा दिली


इंदूबाईने शिंदूबाई सपकाळांचा आदर्शावर पाऊल ठेवत त्या जिरायती शेतीचे रुपडे बागायती मध्ये बदलले आहे

म . टा . वृत्तसेवा , संगमनेर --ग्रामीण भागात आजही सामाजिक बंधनात असलेली महिला आपण बघतो मात्र अशाच सर्व सामाजिक बंधनाला झूगारून पंचविस वर्षापूर्वी नवऱ्याने (पती) साथ सोडलेली असताना जिद्दीने उभी राहीलेल्या इंदूबाईची कहाणी  काहीशी वेगळीच आहे ... ह्या आजी चक्क नऊवारी घालून भन्नाट मोटारसायकल चालवतात आणि पुरुषाला लाजवील असे कामही करतात त्यांनी आपली शेतीवाडी , हाॅटेल व्यवसाय सक्षमपणे उभा केला आहे....  या भन्नाट आजी हम  किसीसे कम नही ... या उक्तीप्रमाणे आपल्या कुटुंबाचा विकास करून समाजात प्रतिष्ठा व सन्मान मिळवून आदर्श निर्माण करीत आहे .
इंदुबाई ढेंबरे या  संगमनेर तालुक्यातील साकुर पासून १ किलोमीटर  बिरेवाडी वस्तीवर राहतात . वयाच्या ६५ व्या  वर्षात त्या हॉटेल व भाजीपाला व्यवसाय करतात दोन मुली झाल्यानंतर २५ वर्षांपूर्वी नवऱ्याने सोडल्याने इंदूबाईने शिंदूबाई सपकाळांचा आदर्शावर पाऊल ठेवत त्या  जिरायती शेतीचे रुपडे बागायती मध्ये बदलले आहे . तर परिसरातील अनाथ महिलांनाही त्यांचा आधार असल्याचे ग्रामस्थ सांगतात . वयाच्या सत्तरीकडे जातानाही त्यांच्यातील आत्मविश्वास व काम करण्याची जिद्द अनेक गोष्टी सांगून जातात . नऊवारी साडी नेसून त्या मोटरसायकलवर शेतीमाल आणून विकत असत २० वर्षे भाजीपाल्याची शेती केली

_ आज आपण ग्रामीण भागातील  आजीने कुणाचीही साथ नसताना जिद्दीने आपले कुटूंब सांभाळले आहे ह्या आजीने सामाजिक बंधने झुगारली आणी पुरूष प्रधान संस्कृती मोडीत काढलीय... इंदूबाई ढेंबरे वय अवघे ६५ वर्षे... हि आजी गेल्या पंचविस वर्षापासून ग्रामीण भागात कुतूहलाचा विषय ठरलीय... त्याला कारणही तसेच आहे हि आजी काही दिवसापूर्वी दररोज आपल्या मोटरसायकलहून सकाळी भाजीपाला घेऊन जाताना दिसायची... हे चित्र ग्रामीण भागासाठी नविन होते कारण चुल आणी मुल या पलीकडे न दिसणारी नऊवारी घातलेली एखादी आजी भन्नाट गाडी चालवेल अशी कल्पनाही कोणी केली नसेल... मात्र हि केवळ मजा म्हणून केलेली गोष्ट नव्हती तर यामागे आहे कुणाच्याही आधाराविना इंदूबाईच्या सक्षमपणे उभी रहाण्याची कहाणी...


 
 तीस वर्षापूर्वी दोन मुली लहान असताना पतीने  इंदूबाईची साथ सोडली मात्र त्यांनी खचून न जाता आपल्या लहानग्या मुलींना घेवून वडीलांचे घर गाठले ... त्यांच्यावर ओझे न बनता इंदूबाईने शेतीत कष्ट करायला सुरूवात केली .. मुलगा नसल्याने शेतीमाल शहरात न्यायचा कसा असा प्रश्न त्यांना पडला यावर मात करत त्या चक्क मोटरसायकल चालवायला शिकल्या...कित्येक वर्षे त्यांनी दररोज पन्नास साठ किमी प्रवास करत आपला शेतीमाल शहरात विकला... त्यावर आज मोठी बोलेरो गाडी घेतलीय आणी एक छोटेसे हाॅटेलही सुरू केले आहे .. इंदूआजी स्वतः सगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतात... तंदुर भट्टीवर छान रोट्या बनवतात..इंदू आजीच्या हातचं व्हेज नाॅनव्हेज जेवण खाण्यासाठी खवय्यांचीही मोठी रीघ लागलेली असते.. या कामात त्यांची लहान मुलगी आणी नातही त्यांना मदत करते...आपल्या आईने मोठ्या कष्टाने आम्हाला वाढवल्याचं सांगताना मुलीलाही गहिवरून आलं ....नांगरापासून ते मोटारसायकलवरील त्यांचा प्रवास अनेक महिलांना सबला  होण्याचे धारिष्ट्य दाखवून देत आहे . इंदुबाई शेतीचे काम झाल्यानंतर छोटेखानी हॉटेल चालवतात त्यात त्या शाकाहारी मांसाहरी  सुग्रास जेवण बनवतात त्याचा स्वाद घेण्यासाठी संगमनेरचं नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील खवय्ये इथे येतात प्रचंड मेहनतीने मातीतून सोने उगविण्याची शिवधनुष्य या आजीने उचलले असून त्यांच्या हिमतीला दाद देण्यासारखेच आहे 
 कोट -- इंदूबाई ढेंबरे ----- पतीपासून विभक्त झाल्यानंतर दोन मुलींना सांभाळत मी माझा आजपर्यंतचा प्रवास करून समर्थ पणे उभी आहे नांगर चालविण्यापासून मोटरसायकलवर दूध घालणे काम करणे असे कार्य माझे चालू आहे पहाटे ४ वाजल्यापासून नांगरणे , मोटार चालविणे , मोटरसायकलवर जाऊन भाजीपाला विकते , लोकांनी नावे ठेवली लोक काय म्हणतील यापेक्षा माझे काम कसे चांगले होईल याला मी   महत्व  देते , स्वतःच्या हिमतीवर जगा कायम अबला न राहता स्वतःच्या हिमतीवर सबला व्हा हिमतीवर उभ्या राहा ,शेती करा, हॉटेल व्यवसाय , मशीन काम करा , तुम्ही काही तरी कमवून दाखवा आपले कुणी मालक होण्यापेक्षा आपणच मालक बनून काम करा आलेल्या संकटाना न घाबरता त्याला जशाच तसे उत्तर देऊन आपले अस्तित्व सिद्ध करा असे इंदुबाई यांनी महिलांना संदेश दिला आहे .

  कोट - सुनिता भागवत ( इंदुआजीची मुलगी)- आईने आम्हाला बापाची आठवण येऊ दिली नाही रात्रभर काम करून आमचे शिक्षण कपडे लत्ता देऊन आम्हाला आमच्या पायावर उभे केले आहे . आमच्या मुलीलाही ती जीव लावून त्यांनाही आमच्यासारखे प्रेम देते आमच्या आईचा आम्हाला अभिमान आहे


 कोट- सुभाष भडांगे गावकरी --- आज ग्रामीण भागातील अनेक महिला सामाजिक बंधनात जगताहेत मात्र हि इंदूआजी अशा  सर्व महिलांना नवी उमेद देणारी आहे

 ह्या आजीने जशी सामाजिक आणी कोंटूबिक बंधने झुगारत उभे राहण्याचे धाडस केले तसा इतर महिलांनीही प्रयत्न केला तर त्यांनाही कुणाच्याही आधाराची गरज पडणार नाही... सोबत फोटो -




Monday, March 5, 2018

खऱ्या सोन्यापेक्षाही झळाळी लाभलेल्या सोनाबाई

म . टा . वृत्तसेवा , अकोले- - खऱ्या सोन्यापेक्षाही झळाळी लाभलेल्या सोनाबाई
  अपघातात दोन्ही हात मोडलेल्या जिद्दी सौ.सोनाबाई विठ्ठल भांगरे रा.पिंपळदरावाडी ता. अकोले जिल्हा अहमदनगर यांचे शिक्षण जेमतेम २ री पर्यंतच झालेले. वयाच्या १८ व्या वर्षी त्या लग्नानंतर सासरी पिंपळदरावाडी
येथे आल्या. लहानपणापासूनच शेतात आई वडिलांना मदतीची सवय व पडेल ते कष्ट उचलण्याची सवय यामुळे त्यांना पतीच्या घरी स्थिरावण्यास जास्त वेळ लागला नाही. 
सोमाबाई यांना ४ आपत्य त्यातील ३ मुली व १ मुलगा याप्रमाणे त्यांनी मुलांचाही योग्य संस्कार व प्रेरणा देऊन सांभाळ केला. पुढे त्या गावातच सुरु असलेल्या बायफ संस्थेच्या
(सन १९९७ साली) संपर्कात आल्या. मुळातच समाज सेवेची आवड व प्रेमळ स्वभाव त्यामुळे त्यांनी गरीब आदिवासी व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या महिलांना संघटीत केले. 
त्यांचे स्वयम सहाय्यता समूह बनविले. त्यांना नियमित बचतीची व बँकेशी व्यवहार करण्याची सवय लावली. संघटन कौशल्य व जबरदस्त इच्छा शक्ती यांच्या जोरावर त्यांनी
स्वतःच्या व आजूबाजूच्या गावांमध्ये सुमारे २०-२५  स्वयम सहाय्यता समूहांची स्थापना केली. त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा देत राहिल्या त्यांच्या दर्जेदार व कौशल्यपूर्ण 
निसर्गाविषयी ज्ञानामुळे त्यांनी बायफच्या मदतीने अनेक उपक्रम यशस्वी राबविले. त्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी गावाचे शिवाऱ्यात असलेले झरे त्यांनी दुरुस्त करण्यासाठी
महिलांच्या समूहांना प्रेरित केले. व बायाफच्या मदतीने २ झरे संरक्षक भिंती व टाक्या बांधून पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित केले. त्यामुळे आज गावातील लोकांना, वाटसरूंना, 
प्राणी-पक्षी यांना स्वच्छ व निर्मळ पाणी पिण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. नुकतेच या कामांना आंतरराष्ट्रीय स्थरावरून अमेरिका येथून आलेल्या रेबेका डेरझेक्स यांनी भेट देऊन 
सोनाबाईंचे विशेष आभार व कौतुकही केले. त्यांनी सुचवलेले व लोकसहभाग व बायफच्या मदतीने निर्माण केलेले गावातील पहिल्या वहिल्या वळण बंधाराचे काम आज १५-२० एकर 
क्षेत्र ओलिताखाली आणून दिले. या कामासाठी महिलांना त्यांनी मार्गदर्शन करून श्रमदान व सहभाग देण्यासाठी प्ररित केले. सुमारे २०००० रु. गुंतवून तयार केलेला वळण बंधारा 
सर्वात कमी खर्चाचा व बहुउपयोगी ठरला आहे. यामध्ये सोनाबाई यांनी सुचवलेली बंधाऱ्याची जागा मोठी जमेची बाजू ठरली. कोणाच्याही शेतीचे नुसकान न करता राबवला गेलेला
हा उपक्रम सोनाबाईंचे निसर्गाविषयी असलेले ज्ञान व समज सिद्ध करते. या पाण्याचा वापर आता टोमॅटो, वांगी, मिरची, वाल, कांदा, कोबी अशी भाजीपाला पिके घेण्यासाठी व
भात, भुईमुग यासारखी खरीप हंगामातील महत्वपूर्ण पिके घेण्यासाठी शेतकरी शेती करत आहे. सोनाबाई यांनी स्वतःच्या कल्पनेतून साकारलेले आजून एक कार्य म्हणजे आपल्या
समूहातील महिलांना प्रेरित करून गावातील पहिली उपसा जलसिंचन  योजना होय. या योजनेत सुमारे ६००-७०० मीटर अंतरावरून पाणी आणले व सुमारे १० कुटुंबाना उपयोगात
आले आहे. या उपसा जलसिंचन योजनेमुळे या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले व त्यांना आता गाव सोडून बाहेरगावी मोल मजुरीसाठी स्थलांतर करावे लागत नाही. त्यांनी
पारंपारिक पिकांसोबतच भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात लागवड करण्यास सुरुवात केली आहे.  
  उपसा जलसिंचन योजनेमुळे त्यांना स्थायी रोजगार आपल्याच शेतात व गावात उपलब्ध झाला आहे. सुमारे ५०-६० हजार रु. निव्वळ उत्पादनात वाढ झाली आहे. सोनाबाईंच्या
पुढाकाराने व प्रेरणेने समूहातील ५ महिलांच्या घरी सुधारित पद्धतीचा बायोगॅस बसविला गेला आहे. त्यामुळे या गरीब कुटुंबाचे जळावू लाकूड फाटा गोळा करण्याचे व त्यासाठी
होणारी पायपीठ कायमची थांबली आहे. स्वयम सहाय्यता समूहातील महिलांना हाताशी घेऊन त्यांनी प्रत्येकीचे किचन/ स्वयंपाक गृह सुंदर व सुलभ केले आहे. स्वयंपाकासाठी 
ओटा, धूर बाहेर जाण्यासाठी व सूर्यप्रकाश आत यावा यासाठी धुराडी व काचेचे कौल, पिण्याचे पाणी स्वच्छ मिळावे म्हणून जीवनड्रॉप चा वापर, फिल्टरचा वापर, भांडे ठेवण्यासाठी
रॅकचा वापर, स्वयंपाक गृहात रात्री स्वयंपाक नीट करता यावा यासाठी सौरदिव्यांचा वापर, सांडपाणी व्यवस्थापनासाठी दर्जेदार परसबाग लागवड व त्यातून सात्विक व पौष्टिक 
आहार प्रत्येक परिवाराला उपलब्ध करून देणे. भाजीपाला व फळझाडे लागवड, शास्वत शेतीसाठी गांडूळखत निर्मिती सुधारित पद्धतीने भात लागवड, शेतीच्या पाण्यासाठी विहीर 
खोदाई व नवीन विहिरींची निर्मिती, शेतीपुर्वक जोड धंदा, कुकुटपालन असे अनेक दिशादर्शक उपक्रम त्यांनी महिलांमार्फत आदिवासींच्या उन्नतीसाठी बायफच्या सहकार्याने राबवले
आहे. निस्सीम समाजसेवा, प्रेमळ स्वभाव व जगाच्या कल्याणा असावे सादर! या उक्तीप्रमाणे सदैव्य समाजासाठी दिशादर्शक राहिलेल्या व नावाप्रमाणेच सोन्याप्रमाणेच आपल्या 
कार्यकौशल्याने चमकणाऱ्या सोनाबाईंना वंदन व भावी कार्यास शुभेच्छा.
 मध्यंतरी शेतात काम करतांना त्यांचे दोन्ही हात एका अपघातात मोडले होते. घरावर मोठे संकट आले होते त्यातून त्यांनी उमेद न हारता मात केली. व परत जोमाने कामाला
लागल्या. आजही मोडलेल्या हाताने कामे करणे अवघड जाते. कारण दोन्ही हात मनगटातून मोडले होते.   सोबत फोटो -      
















shantabai dhande




























Saturday, March 3, 2018

सुनंदाताईंना मुलगा नसल्याने मुलगा दत्तक घेण्या एवजी खेडयातील मुलींना शिक्षण मिळावे

म टा . वृत्तसेवा , संगमनेर - इयता पहिली शिक्षण घेऊन शाळेची भीती मनात घर करून बसलेल्या सुनंदाताई  भागवत यांनी पाचशेपेक्षा अधिक मुलींना शिक्षणाचे कवाडे उघडी करून देत आपल्या जीवनाला व आयुष्याला वेगळा अर्थ निर्माण करून देत आपला जीवन प्रवास अनाथांची माय म्हणून सर्व जगाला करून दिला नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ या गावात सून म्हणून आलेल्या  पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या बोरी  शिरोली गावच्या लेकीने आपले संस्कार सासरच्या मातीत रुजवत  ओसाड माळरानावर, अंध अपंग , मूक बधिर ,एड्स  ग्रस्त, अनाथ , ,  शोषित , अबला अश्या शेकडो  मुलींचे आयुष्य "सुंदर , निरामय , साक्षर बनवत  संस्काराची जोड देत आपल्या जीवनाला आकार देतानाच  आपल्या वसतिगृहात आलेल्या  राज्यातील व राज्याबाहेरील चिमण्यांच्या पंखाला बळ देऊन त्यांना सबला बनवून त्यांना सक्षम बनवत आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो हि संकल्पना त्यांच्या मनात खोलवर रुजवात एक अभिनव उपक्रम राबवितानाच गावाचा चेहरा मोहराही बदलवून जिराईत शेती  भाग बागायती करून कृषी कन्या म्हणवून जगाच्या पटलावर प्रतिमा  उंचविण्याऱ्या सुनंदाताई  भागवत या आजी , आई , मावशी  अनाथांची माय , या समाजातील आदर्श मातेला सलाम ....

सावीत्री बाई फुलेनी १८४७  साली पुण्यात महीलांसाठी पहीली शाळा काढत स्रीयांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली त्या नंतरही महीलांना शिक्षणासाठी झटावे लागत होते. अहमदनगर जिल्ह्यातल्या पठार भागातील सुनंदाताई भागवत यांनीही सावित्री बाईंचा वसा पुढे चालवण्याचा निर्धार करत या भागातील महीलां आणि मुलीच्या आर्थिक आणि शैक्षणीक प्रगती साठी कार्य सुरु ठेवलय. सुनंदाताईंना मुलगा नसल्याने मुलगा दत्तक घेण्या एवजी खेडयातील मुलींना शिक्षण मिळावे या साठी वसतीगृहाची स्थापना करत आता पर्यंत पाचशे च्या वर मुलांना शिक्षण देत त्यांच्या पायावर उभ केलय. आपली संपत्ती दत्तक मुलगा घेऊन त्याला देण्यापेक्षा समाजातील गोरगरीब अत्याचारित मुलींच्या शिक्षणासाठी पालन पोषणासाठी देण्याचा त्यांचा निर्धार असून त्यांनी तसे मृत्युपत्र तयार करूनही ठेवले आहे . नांदूर खदरमाळ येथे १९७५ साली सुनंदा ताई आल्या त्यावेळी गावात वीज , पाणी , रस्ते कोणत्याही सुविधा नव्हत्या त्यांनी गावात पाणी योजना आणण्याचा निर्धार केला व थेट मुंबईला वर्ष बंगल्यावर मुख्यमंत्री शरद पवार याना भेटल्या २ लाख ७० हजाराची नळयोजना होती मात्र २७ हजार रुपये भरण्यासाठी त्यांच्याकडे नव्हते मुख्यमंत्री पवार याना "साहेब आम्हाला भाऊबीजेच्या  साडी ऐवजी भाऊबीज भेट म्हणून २७ हजार नळ योजनेसाठी द्या अशी मागणी केली त्यांच्या एका शब्दावर १०० टक्के अनुदानावर हि नळ योजना मंजूर केली .

सावीत्री बाईं फुलेंच्या पुण्यातील शाळा सुरु करण्यच्या तब्बल शंभर वर्षा नंतर पुणे जिल्ह्यातीलच जुन्नर तालुक्यातील बोरी शिरोली  या गावात १९४८साली सुनंदाताईंचा जन्म झाला वडील नोकरी निम्मीत मुबईत असल्याने सुंनंदा ताईंच लहानपण मुबईतच गेल.  त्या नंतर त्यांनी पहीलीला प्रवेशही घेतला मात्र त्या काळी त्याच्या शेजारी रहाणारी एक मुलगी गायब झाल्याने त्यांच्या बालमनावर परीनाम झाला आणि आई वडीलांनाही भीती वाटल्याने त्यांच शिक्षण सुटल  सावित्री फूलेंने प्रमाणेच सुनंदा ताईंच लग्न वयाच्या 12 वर्षी लग्न झाल त्या नतंर त्या संसारात  रमल्या त्यांचे पती संगमनेर जिल्ह्यातील नांदुर खंदरमाळ येथे राहत होते आणि नोकरी निम्मीती मुबईतही राहत होते त्या नंतर सुनंदाताई सुट्टी साठी नांदुर खंदरमाळला यायच्या हे गाव तस दुष्काळीच गाव त्या काळी महीलाच्या डोक्यावर हंडा त्या नेहेमी बघत त्या नतंर त्यांनी १९७५ साली या गावाला येवुन राहण्याच ठरवत गावातील १५० महीलांना एकत्र करत अहमदनगर जिल्ह्यातील महीलांनी सुरु केलेली पहीली पाणी पुरवठा योजना सुरु केली होती. त्या नंतर त्यांनी आपल जीवन गावाच्या कल्याना साठीच वाहुन घेतल.  सन १९८९साली गावातील मुला मुलींना शाळेसाठी लाबं जाव लागत असल्याने गावात महीलांच्याच्या सहकार्याने पहीली शाळा सुरु केली होती. त्या नंतर ९० साली मुलींना शिक्षणाची सोय व्हावी या साठी वसतगृह सुर केल त्या साठी त्यांना आपली एक  एकर जमीनीह दान दिली आहे. सरकारचे अनुदान आले तर ठीक नाही आले तर  ठीक त्याची वाट न पाहता आपल्या शेतीतील उत्पन्नातून व आपल्या पतीच्या पेन्शन मधून त्या वसतिगृह चालवतात . तर राज्यातील अनाथ मुलींना त्या स्वीकारून त्यांचे पालनपोषण करून शिक्षण देतात त्या आधुनिक काळातील सावित्रीबाई फुले आहेत असे ग्रामस्थ म्हणतात 

 कोट-सुंनदाताई भागवत. समाजीक कार्यकर्त्या-- माझी आई राधाबाई बालाजी शेटे ७वी  शिकलेली ती मला "पठया "म्हणायची माझ्या पठ्ठयाला मी श्रीमंताला नाही तर गरिबाला देईल ती गरीबाचा संसार चांगला करील त्याप्रमाणे मला गिरणी कामगाराला दिले मुंबईला माझे १२ वारशाची असताना लग्न झाले माझे मन तिथे रमले नाही मग मी सासरी आले नांदूर खांदरमळ मध्ये येऊन मी गावच्या प्रश्नात लक्ष्य घातले पाणी , वीज रस्ते हे प्रश्न सोडवतं गावात मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केली वसतिगृह सुरु करून अनाथ मुलींना त्यात प्रवेश दिला . मुलींनी मोबाईल वापरू नये त्यामुळे मुली बिघडतात असे माझे ठाम मत आहे . त्यामुळेच माझ्या ५०० मुली आजही आई म्हणून माझे संस्कार अंगिकारतात . मुलगा दत्तक घेण्यापेक्षा या मुलींसाठी आयुष्याचे शेवटचे दिवस काढायचे माझे सर्व काही या मुलींचे आहे मी असेल नसेल माझ्या संपत्तीतूनच यापुढेही मुलींचे शिक्षण व पालनपोषण सुरु रावावे म्हणून मी मृत्यू पत्र तयार करून ठेवले आहे . गावातील पंढरीनाथ सुपेकर , यमाजी मोरे भीक मोरे , नामदेव सुपेकर , लक्ष्मण भागवत , इंदिराबाई गर्भे , भीमाबाई घुले रंभाबाई भागवत व माझे पती यांनी मला साथ दिल्यामुळे मी हे काम करू शकले

सुनंदाताईंनी गावातील मुलींना शिक्षण देत असतांनाच यशवंतराव चव्हान  मुक्त विदयापीठा अंतर्गत वयाच्या ६४ व्या वर्षीबीए  च शिक्षण पुर्ण केलय. सुनंदाताईंनी सुरु केलेल्या वसतीगृहाला शासनाचा तुटपुंज अनुदान मिळत त्या मुळ लोकांच्या मदतीनु वसतीगृहाचा इतर खर्च भागावला जातो सुनंदाताई केवळ वसतीगृहच चालवत नाही तर त्या आणि त्यांचे ८० वर्षाचे पती याच वस्ती गृहात राहुन मुलीच्या शिक्षणा साठी लक्ष देतात यात बऱ्याच निराधार मुलीही आहेत. या संस्थेत शिकलेल्या अऩेक मुली पोलीस तलाठी ग्रामसेवक आणि , शेतकरी , आदर्श गृहिणी , शिक्षक , डाँक्टरही झाल्या आहेत. आजही या संस्थेत ३५ विद्यार्थीनी शिक्षण घेताय. 

 कोट -   सुनंदा डोंगरे ( विद्यार्थीनी )---
 विद्यार्थीनीआकाशी कलरचा ड्रेस--- माझ्या आईऩे वडीलांना सुपारी देवुन मारले मला नातेवाईनेही नाकारल  त्यानंतर मला सुनंदा आई भेटली तिने मला लेकीसारखे सांभाळले , मला कापड लत्ता , शिक्षण , माझा आजार    मला आई वडिलांची आठवण येऊ दिली नाही

सुनंदाताईंच्या या कार्याची दखल घेऊन स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी घेऊन त्यांना जिल्हा परिषदेवर निवडून देऊन त्या जिल्हापरीषद सदस्याही झाल्या होत्या त्या नंतर आता दोन वर्षा पासुन त्या गावातील पहील्या महीला सरपंच म्हणुन काम बघताय. गावातील  मुलींच्या शिक्षणा पुरतच मार्यादीत काम न ठेवता सुनंदा ताईंनी गावातील पाणलोट क्षेत्र विकाचही भरघोस काम केलय. त्य़ाच बरोबरीने सुनंदाताई ह्या उत्तम शेतीही करतात. ताईंच्या या कार्याची दखल अऩेक संस्था आणि शासन दरबारी  दखल ही घेतली गेली असु न त्याना सावित्रीबाई फुले , कृषी रत्न , वीरांगना , जिजामाता कृषी भूषण महिला , अहिल्याबाई होळकर , राणी , लक्ष्मीबाई , शिक्षण तज्ञ् जे . पी . नाईक पुरस्कार पुरस्काराने सन्मानाती ही करण्यात आले आहे. 
२ वर्षाची सीमा म्हतारबा कोठवळ अनाथ मुलगी संगमनेर , ,  ७ वर्षाची शितल नामदेव वाळुंज पारनेर ,९ वर्षाची प्रियांका लक्ष्मण पवार , भिगवण , स्नेहल लक्ष्मण पवार पूजा राहटे  (औरंगाबाद)आरती रवी बंडरगल (कर्नाटक )पूजा डोंगरे (पारनेर )तर नामदेव रामा भागवत यांचे ५ अनाथ मुले , वेड्या महिलेसोबतच मुलींना पायल व पूजा राजेंद्र तुपे याना सांभाळून त्यांना शिक्षण दिले तर दारिद्र्याने पीडित ५ कुटुंबाना आपल्या शेतावर रोजगार देऊन त्यांची मुलेही शिक्षणाच्या प्रवाहात आणली आहेत , , सातारा सांगली , औरंगाबाद , पुणे जिल्ह्यातील मुलींसोबतच मध्यप्रदेश , कर्नाटक या राज्यातूनही काही मुलींना आसरा देऊन त्यांचे पालन पोषण व शिक्षण देऊन त्यांच्या पायावर त्यांना उभे करण्याचे काम या मातेने केले आहे .

हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधनानंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया!

 हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधना नंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया!  पतीच्या निधनानंतरही शोभाताई डगमगल्या नाहीत. कष्ट, आत्मविश्...