Tuesday, March 6, 2018

aadivasi vidharthi

 म . टा . वृत्तसेवा ,अकोले- अकोले तालुक्यातील आदिवासी भागात एस टी  बस वेळेत नसल्याने खेड्यापाड्यातील शालेय विध्यार्थ्यांना आपला प्रवास मोटरसायकल व जीपवर करावा लागतो . सध्या राजूर , अकोले , कोतुळ , समशेरपूर येथे परीक्षाकेंद्र असून परीक्षा केंद्रावर रोज वेळेत पोहचण्यासाठी खाजगी जीप अथवा मोटरसायकलवर विधार्थी जा ये करतात त्यात एका गावातून १५ ते २० विधार्थी असल्याने व जीप मध्ये जागा न होत असल्यामुळे जीपच्या टपावर  बसूनही  जीवघेणा प्रवास करावा लागण्याची वेळ या विधार्थ्यांवर अली आहे . या भागात मिनी बस सुरु कराव्यात या साठी अकोले आगर व्यवस्थापकांना वेळोवेळी अर्ज व निवेदन देऊनही याबाबत अधिकारी गप्प आहेत तर आहे त्या एस टी बशी नादुरुस्त असल्याने विधार्थी बसच्या भरवशावर न राहता खाजगी जीप करून कॉलेजला येतात त्यामुळे आदिवासी भागात रोज खाजगी जीप विधार्थी व प्रवासी वाहतूक करताना दिसतात .विधार्थी प्रवास करीत असल्याने पोलिसही याकडे दुर्लक्ष्य करतात मात्र एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण असा प्रश्नी उपस्थित झाला आहे .
चौकट - विध्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी जीप वेळेवर मिळत नसल्याने नाविलाजास्तव विधार्थी खाजगी जीपने प्रवास करतात तर पालकांनाही माहित असून वेळेवर बस नसल्याने ते याबाबत बोल्ट नाहीत तर विधार्थी आपल्या पालकांकडे मोटारसायकलची मागणी करून मोटरसायकलवर तीन ते चार विधार्थी एकच वेळेस प्रवास करतात त्यामुळे शिक्षणासाठी काही पण .... असा सूर विधार्थी  आळवतात  यावरून हे चित्र समोर आले आहे .
अकोले तालुक्यात ५ केंद्रावर सुमारे ३९८६ विधार्थी १२ वी च्या परीक्षेसाठी बसले असल्याची माहिती  गट शिक्षण अधिकारी अरविंद कुमावत यांनी दिली आहे , कॉपीमुक्त वातावरणात सर्वच परिक्षेकेन्द्रावर परीक्षा सुरु असून केंद्रावर बंदोबस्तही ठेवण्यात आला असल्याचे म्हणाले .
अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील विधार्थी राजूर , अकोले , कोतुळ  या ठिकाणी परीक्षेसाठी आले असून  शिक्षकही त्यांच्यासोबत  परीक्षा देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करीत आहे . पहिल्या दिवशी आज इंग्रजी पेपरसाठी प्रत्येक केंद्रावर विधार्थी १५ मिनिट अगोदरच हॉल मध्ये जाऊन प्रश्न पत्रिकेचे वाचन करताना दिसले  अकोले  कॉलेज येथे १७७२ विधार्थी , केळी रुम्हणवाडी आश्रमशाळा ४५७ विधार्थी सर्वोदय विधा मंदिर राजूर ८५८ विधार्थी तर कोतुळेश्वर विधालय कोतुळ येथे ५९० विधार्थी तर नव्यानेच देण्यात आलेल्या राजूर येथील महाविधालयात  स्वयंअर्थ ज्युनियर कॉलेज केंद्रावर ३०९ विधार्थी असे ३९८६ विधार्थी परीक्षा देत आहे . चौकट --  नव्याने देण्यात आलेल्या केंद्र बाबत वशिलेबाजी झाल्याचा आरोप -- नव्यानेच राजूर येथे एका च संस्थेला दुसरे केंद्र देऊन  अधिकारी वर्गाने वशिलेबाजी करून अगोदर अर्ज असताना व कॉलेजला १० वर्षे झालेल्या एका कॉलेजला ५५०० रुपये प्रस्ताव फी भरूनही केंद्र देण्यात न आल्याने आदिवासी भागातील ,पालक  विधार्थी व संस्थाचालक यांनी  नाराजी व्यक्त करून शिक्षण मंत्री यांचेकडे तक्रार केली आहे तर शेंडी भंडारदरा येथील विध्यार्थ्यांना २० किलोमीटर राजूरला येऊन परीक्षा द्यावी लागत असल्या ने या केंद्रालाही मंजुरी देणे आवश्यक असताना केवळ वशिलेबाजी व निकष न पळताही नवीन केंद्र कसे देण्यात आले याबाबत जोरदार चर्चा आहे . सोबत फोटो rju २३p ३ ,४आज पहिल्याच दिवशी राजूर येथून अर्ध किलोमीटरवर पायी , मोटरसायकलवर जाऊन विध्यार्थ्यानी परीक्षा दिली


No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...