म
. टा . वृत्तसेवा , अकोले-डोक्यावर कर्जाचा डोंगर ,१०० माणसांचा समूह सोबत
घेऊन ढवळपुरीकर यांची तिसरी पिढी लोककला संस्कृतीचे जतन करण्यासाठी
गावोगावी भटकंती करताना दिसत आहे . आदिवासी भागातील चैत्र महिना सुरु
झल्याने यात्रा सुरु झाल्या असून मवेशी येथील यात्रेनिमित्त किरणकुमार
चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा तमाशा आला असताना त्यांच्याशी तमाशाच्या
प्रवासाबाबत चर्चा केली असता.
लोक कलाकारांना
वयाच्या ६० नंतर सरकारने पेन्शन द्यावी , वाढत्या वयात कलाकार
तामाश्याच्या फडात काम करू शकत नाही . तसेच अन्य कोणत्याही ठिकाणी त्यांना कामाची
संधी हि उपलब्ध होऊ शकत नाही . सरकार सध्या लोक कलाकारांना
महिन्याला १५०० रुपये देण्यात येतात परंतु
त्यामध्ये त्यांचा वाढत्या वयाच्या दवाखान्याचा खर्च सुद्धा भागत नसल्याने
त्यामध्ये सरकारने वाढ करावी अश्या आशयाची आर्त मागणी प्रसिद्ध तमाशागिर कै .
चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे चिरंजीव किरण ढवळपुरीकर यांनी
प्रतिनिधीशी बोलताना केली . आपल्या आयुष्याच्या अनेक घडामोडी सांगताना ते पुढे म्हणाले कि
सध्या टीव्ही मुले तमाश्या कडे लोक पाहिल्यासारखे फिरकत नाही . त्यामुळे सध्या हा
व्यवसाय आर्थिक अडचणीत आला असून मोठ्या आर्थिक अडचणीच्या
विळख्यात हा व्यवसाय सापडला आहे . १०० ते १२५ लोक साधारण संपूर्ण फडात काम करतात
सर्वंच्या समस्या सोडवणे गरचे असते त्यात अल्प प्रमाणात मिळणारी बिदागी ह्या मुले
खर्चाला मोठ्या प्रमाणत फाटा देवा लागतो . नेहमी वेगवेगळ्या
ठिकाणी कार्यक्रम असल्याने हा मोठा ताफा सांभाळून न्यावा लागतो . पूर्वी इतके लोक
ह्या कार्यक्रमास मोठ्या प्रदिसाद देताना दिसून येत नाही . फड
चालू असताना दररोजचा १ लाख रुपये साधारण खर्च लागतो . पहिल्या सारखे लोक आता तमाशा च्या कार्यक्रमला सहकार्य करत नसून ज्या
गावात कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पोलीस परवानगी पासून ते अन्य सर्वच परवाने तमाशा मालकाने
पहावे लागते . ह्या बाबत आम्ही सरकारला विनंती करणार आहे कि ज्या मुळे ह्या परवानग्या चा त्रास कमी होऊन आम्हला आर्थिक झळ सोसावी
लागणार नाही . काही गावात कार्यक्रम करताना गावातील २ राजकीय गटांचा त्रास सहन
करावा लागतो . कधी कधी गाव पुढारी यांच्या भांडणाचा परिणाम कलाकार यांच्या
कामगिरीवर होतो त्यामुळे सरकारने आम्हला काही ठिकाणी
पोलीस बंदोवस्त द्यावा . आपल्या पुढील पिढी बाबत बोलताना ते म्हणाले कि आत्ताची
पिढी ह्या व्यवसायात येण्यास तयार नाही , माझी २ मुले उच्च
शिक्षण घेत असून आमच्या ह्या व्यवसायात ते आत्ता येण्यास तयार नाही . आपल्या तिसरया पिढीचा प्रतिनिधी म्हणून मी सध्या हे काम पाहतो आहे , माझे
आजोबा देविदास धुमाळ रांधेकर हे पहिले ताम्श्या गिर , त्या
नंतर माहे वडील चंद्रकांत ढवळपुरीकर , व सध्या मी हे काम
पाहतो आहे माझ्या नन्तर माझा चुलत भाऊ पुढील
काळात हे काम करणार आहे . अनेक पुरस्कारणी आज पर्यंत
गौरविले गेले असून ह्या पुढे हि लोक कलेची जोपासना करून समाज प्रबोधन करण्याच्या
मानस आहे , तमाशा हा बहुभाषिक होणे गरजेचे आहे तसेच या मध्ये
नवीन कलाकार येणे अपेक्षित आहे . सध्या तमाशा चा लौकिक बदलत असून लोककले पेक्षा विडंबना जास्त पसंद करताना दिसून येतात . पुढील काळात चंगल्या प्रकरे काम करण्याचा मानस त्यांनी बोलून दाख्ब्वला .
No comments:
Post a Comment