Friday, March 9, 2018

सध्या आदिवासी मुलामुलींनी आश्रमशाळेत प्रवेश घ्यावा यासाठी शासकीय

म . टा . वृत्तसेवा ,अकोले-सध्या आदिवासी मुलामुलींनी आश्रमशाळेत प्रवेश घ्यावा यासाठी शासकीय  आश्रमशाळेतील शिक्षक स्वतः गावोगावी जाऊन कीर्तनातून प्रबोधन करून आश्रमशाळेच्या गुणवत्तेबरोबरच असणाऱ्या भौतिक  सुविधा , विध्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग होणारे पैसे व शासन करीत असलेल्या योजनांचा पाढा वाचून आदिवासी समाजाचे प्रबोधन करीत आहे . संगमनेर तालुक्यातील सावरचोळ येथील आश्रमशाळेचे परिसरात  शिक्षक तसेच मुतखेल आश्रमशाळेचे शिक्षक डॉ . पंकज दुर्गुडे यांनी कीर्तनाचा कार्यक्रमातुन जण प्रबोधन करून  आदिवासी विध्यार्थ्यांच्या पालकांना आपलेसे केले आहे यावेळी बोलताना डॉ पंकज दुर्गुडे म्हणाले मी शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक असून  शिक्षकाचे खरे काम समाज प्रबोधन आहे . शिक्षकाच्या वाटा चुकल्या तर समाजाच्या वाटाही चुकल्याशिवाय राहणार नाही  यासाठी शिक्षक ताळ्यावर असायला हवा म्हणून लोक नाव ठेवत असले तरी चालेल म्हणून मी धोतर नेसून ज्ञानोबा रायाना  गुरु मानून हि साधना करून तुमच्यापर्यंत पोहचतो  सावरचोळ आश्रमशाळा देवळात भरत होती ती शाळा आज भव्य इमारती त भरते आहे . अशी इमारत आदिवासी भागात कुठेच नाही त्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य  मुख्याध्यापक झरेकर यांचे प्रयत्न व आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे यांचे मार्गदर्शन त्यामुळे १०० विधार्थी आज ३५० झाले . मी आदिवासी विकास प्रकल्पाचा पैकी म्हणून हे सांगतो कि आदिवासी विकास विभागाने रंजल्या , गांजल्या , कष्टकरी , उपेक्षित आदिवासी समाजाच्या मुलामुलींसाठी आश्रमशाळा सुरु करून त्यातून गुणवन्त , ज्ञानवंत विधार्थी तयार करून आदर्श भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे . प्रल्पाने मागील वर्षी डीबीटी  योजना आणली म्हणजे तुमचा लाभ तुमच्या बँक खात्यात त्या माध्यमातून प्रत्येक आदिवासी विध्यार्थ्याला त्याच्या वयोमानानुसार इयत्तेनुसार ७५०० , ८५०० ,९५००  रुपये अनुदान  दार महिन्याला त्याच्या खात्यात वर्ग केले जाते . त्याचे कारण त्याने शिक्षण घ्यावे , वस्तू घ्याव्या व चांगल्या मनाने शिकावे याच्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे . या मागे भौतिक सुविधांची अडचण होती तीही दूर झाली आहे प्रत्येक शाळा सुंदर इमारतीने सजली आहे . प्रश्न गुणवत्तेचा होता त्याबाबत प्रकल्पाधिकारी संतोष ठुबे साहेब यांनी प्राथमिक शिक्षणासाठी एक प्रकल्प सुरु केला प्रकल्पाचे नाव आहे "सारेगम "त्या प्रकल्पांतर्गत १ते ५ वर्गासाठी आनंददायी , रचनावाद  मुलांना शिक्षणातून आनंद खेळातून शिक्षण अशी बहुउद्देशीय योजना आणून अप्रगत विधार्थी प्रगत करण्याचे शिक्षण आश्रमशाळेत सुरु आहे  सुंदर शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यातून मुले शाळेत रमायला लागली , ज्यांना लिहिता येत नव्हते ते लिहायला व ज्याला लिहिता येत होते ते वाचायला जे वाचत होते ते भाषण करायला  लागले प्रगती आहे महाराज . त्यासाठी आदिवासी आश्रमशाळेत प्रगती झाली असून आदिवासी मुलांना आश्रमशाळेत पाठवा असे आव्हान केले  मुख्यध्यापक एन . एल झरेकर यांनी प्रास्तविक व आभार मानले सोबत फोटो rju २६प ४

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...