Tuesday, March 6, 2018

इंदूबाईने शिंदूबाई सपकाळांचा आदर्शावर पाऊल ठेवत त्या जिरायती शेतीचे रुपडे बागायती मध्ये बदलले आहे

म . टा . वृत्तसेवा , संगमनेर --ग्रामीण भागात आजही सामाजिक बंधनात असलेली महिला आपण बघतो मात्र अशाच सर्व सामाजिक बंधनाला झूगारून पंचविस वर्षापूर्वी नवऱ्याने (पती) साथ सोडलेली असताना जिद्दीने उभी राहीलेल्या इंदूबाईची कहाणी  काहीशी वेगळीच आहे ... ह्या आजी चक्क नऊवारी घालून भन्नाट मोटारसायकल चालवतात आणि पुरुषाला लाजवील असे कामही करतात त्यांनी आपली शेतीवाडी , हाॅटेल व्यवसाय सक्षमपणे उभा केला आहे....  या भन्नाट आजी हम  किसीसे कम नही ... या उक्तीप्रमाणे आपल्या कुटुंबाचा विकास करून समाजात प्रतिष्ठा व सन्मान मिळवून आदर्श निर्माण करीत आहे .
इंदुबाई ढेंबरे या  संगमनेर तालुक्यातील साकुर पासून १ किलोमीटर  बिरेवाडी वस्तीवर राहतात . वयाच्या ६५ व्या  वर्षात त्या हॉटेल व भाजीपाला व्यवसाय करतात दोन मुली झाल्यानंतर २५ वर्षांपूर्वी नवऱ्याने सोडल्याने इंदूबाईने शिंदूबाई सपकाळांचा आदर्शावर पाऊल ठेवत त्या  जिरायती शेतीचे रुपडे बागायती मध्ये बदलले आहे . तर परिसरातील अनाथ महिलांनाही त्यांचा आधार असल्याचे ग्रामस्थ सांगतात . वयाच्या सत्तरीकडे जातानाही त्यांच्यातील आत्मविश्वास व काम करण्याची जिद्द अनेक गोष्टी सांगून जातात . नऊवारी साडी नेसून त्या मोटरसायकलवर शेतीमाल आणून विकत असत २० वर्षे भाजीपाल्याची शेती केली

_ आज आपण ग्रामीण भागातील  आजीने कुणाचीही साथ नसताना जिद्दीने आपले कुटूंब सांभाळले आहे ह्या आजीने सामाजिक बंधने झुगारली आणी पुरूष प्रधान संस्कृती मोडीत काढलीय... इंदूबाई ढेंबरे वय अवघे ६५ वर्षे... हि आजी गेल्या पंचविस वर्षापासून ग्रामीण भागात कुतूहलाचा विषय ठरलीय... त्याला कारणही तसेच आहे हि आजी काही दिवसापूर्वी दररोज आपल्या मोटरसायकलहून सकाळी भाजीपाला घेऊन जाताना दिसायची... हे चित्र ग्रामीण भागासाठी नविन होते कारण चुल आणी मुल या पलीकडे न दिसणारी नऊवारी घातलेली एखादी आजी भन्नाट गाडी चालवेल अशी कल्पनाही कोणी केली नसेल... मात्र हि केवळ मजा म्हणून केलेली गोष्ट नव्हती तर यामागे आहे कुणाच्याही आधाराविना इंदूबाईच्या सक्षमपणे उभी रहाण्याची कहाणी...


 
 तीस वर्षापूर्वी दोन मुली लहान असताना पतीने  इंदूबाईची साथ सोडली मात्र त्यांनी खचून न जाता आपल्या लहानग्या मुलींना घेवून वडीलांचे घर गाठले ... त्यांच्यावर ओझे न बनता इंदूबाईने शेतीत कष्ट करायला सुरूवात केली .. मुलगा नसल्याने शेतीमाल शहरात न्यायचा कसा असा प्रश्न त्यांना पडला यावर मात करत त्या चक्क मोटरसायकल चालवायला शिकल्या...कित्येक वर्षे त्यांनी दररोज पन्नास साठ किमी प्रवास करत आपला शेतीमाल शहरात विकला... त्यावर आज मोठी बोलेरो गाडी घेतलीय आणी एक छोटेसे हाॅटेलही सुरू केले आहे .. इंदूआजी स्वतः सगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतात... तंदुर भट्टीवर छान रोट्या बनवतात..इंदू आजीच्या हातचं व्हेज नाॅनव्हेज जेवण खाण्यासाठी खवय्यांचीही मोठी रीघ लागलेली असते.. या कामात त्यांची लहान मुलगी आणी नातही त्यांना मदत करते...आपल्या आईने मोठ्या कष्टाने आम्हाला वाढवल्याचं सांगताना मुलीलाही गहिवरून आलं ....नांगरापासून ते मोटारसायकलवरील त्यांचा प्रवास अनेक महिलांना सबला  होण्याचे धारिष्ट्य दाखवून देत आहे . इंदुबाई शेतीचे काम झाल्यानंतर छोटेखानी हॉटेल चालवतात त्यात त्या शाकाहारी मांसाहरी  सुग्रास जेवण बनवतात त्याचा स्वाद घेण्यासाठी संगमनेरचं नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील खवय्ये इथे येतात प्रचंड मेहनतीने मातीतून सोने उगविण्याची शिवधनुष्य या आजीने उचलले असून त्यांच्या हिमतीला दाद देण्यासारखेच आहे 
 कोट -- इंदूबाई ढेंबरे ----- पतीपासून विभक्त झाल्यानंतर दोन मुलींना सांभाळत मी माझा आजपर्यंतचा प्रवास करून समर्थ पणे उभी आहे नांगर चालविण्यापासून मोटरसायकलवर दूध घालणे काम करणे असे कार्य माझे चालू आहे पहाटे ४ वाजल्यापासून नांगरणे , मोटार चालविणे , मोटरसायकलवर जाऊन भाजीपाला विकते , लोकांनी नावे ठेवली लोक काय म्हणतील यापेक्षा माझे काम कसे चांगले होईल याला मी   महत्व  देते , स्वतःच्या हिमतीवर जगा कायम अबला न राहता स्वतःच्या हिमतीवर सबला व्हा हिमतीवर उभ्या राहा ,शेती करा, हॉटेल व्यवसाय , मशीन काम करा , तुम्ही काही तरी कमवून दाखवा आपले कुणी मालक होण्यापेक्षा आपणच मालक बनून काम करा आलेल्या संकटाना न घाबरता त्याला जशाच तसे उत्तर देऊन आपले अस्तित्व सिद्ध करा असे इंदुबाई यांनी महिलांना संदेश दिला आहे .

  कोट - सुनिता भागवत ( इंदुआजीची मुलगी)- आईने आम्हाला बापाची आठवण येऊ दिली नाही रात्रभर काम करून आमचे शिक्षण कपडे लत्ता देऊन आम्हाला आमच्या पायावर उभे केले आहे . आमच्या मुलीलाही ती जीव लावून त्यांनाही आमच्यासारखे प्रेम देते आमच्या आईचा आम्हाला अभिमान आहे


 कोट- सुभाष भडांगे गावकरी --- आज ग्रामीण भागातील अनेक महिला सामाजिक बंधनात जगताहेत मात्र हि इंदूआजी अशा  सर्व महिलांना नवी उमेद देणारी आहे

 ह्या आजीने जशी सामाजिक आणी कोंटूबिक बंधने झुगारत उभे राहण्याचे धाडस केले तसा इतर महिलांनीही प्रयत्न केला तर त्यांनाही कुणाच्याही आधाराची गरज पडणार नाही... सोबत फोटो -




No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...