Sunday, March 18, 2018

जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने

जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने ‘जीवदया व स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या ’वतीने  लहान मुले आणि त्यांच्या पालकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिकेत चांडोले , विवेक जगदाळे यांनी विध्यार्थ्यांना , शाळेला , मंदिरांना जिवद्या  संस्थेने अल्प किमतीत दिलेल्या घरट्यांची मोफत वाटप केली . प्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अनिकेत चांडोले म्हणाले
चिमण्यांना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, तसेच अंगावरील परजीवींपासून मुक्तता मिळवण्यासाठी पाण्याची आणि धुळीचीही अंघोळ गरजेची असते. आता चिमण्यांना प्यायला आणि आंघोळीलाही पाणी मिळत नाही. शिवाय डांबरी रस्ते आणि काँक्रिटीकरणात चिमण्यांसाठी मातीही राहिली नाही,’ असे सांगून अनिकेत चांडोले म्हणाले,‘‘चिमण्या एरवी जरी धान्य, फळे, फुलातील मध खात असल्या तरी आपल्या पिलांना त्या प्रथिनांसाठी अळ्या व कीटक भरवतात. परंतु आम्ही चिमणीच्या १० घरटय़ांचा अभ्यास केल्यावर असे दिसून आले, की चिमण्या स्वत: जे पोळी-भाताचे खरकटे खातात तेच पिलांना देत आहेत.  मंदिर परिसरात आम्ही ५ घरटी बसवून त्यात साखर फुटाणे ठेवली आहेत मंदिरांच्या परिसरातील चिमण्या साखरफुटाणे खातात. या खाण्यातून पिलांना ग्लूकोज मिळाले तरी प्रथिने मिळत नाहीत व त्यांच्या पंखांची पुरेशी वाढ होत नाही.प्रसंगी प्राचार्या सौ . मंजुषा काळे म्हणाल्या ठराविक दिवसांचे झाल्यावर एका दिवसात उडायला शिकणारे चिमणीचे पिलू चार दिवस जमिनीवरच रेंगाळते आणि मांजर, कावळे, शिकारी पक्षी यांच्या ते भक्ष्यस्थानी पडण्याची शक्यता वाढते. पर्यावरणपूरक विकास, झुडपे व देशी झाडे लावणे, सेंद्रिय शेतीकडे वळणे हे यावरील उपाय असू शकतील.’’ चिमण्यांच्या घटत्या संख्येचा विचार करून राजूर  गावात राहणार्‍या अनिकेत चांडोले या तरुणाने  एक कल्पक प्रयोग केला आहे. त्याने 'ना नफा-ना तोटा' या तत्त्वावर पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून अवघ्या ११० रुपयांत उपलब्ध होईल असे चिमण्यांचे घरटे तयार केले आहे. सुत्रसंचलन किरण भागवत व आभार कुमारी कांचन माळवे यांनी मानले  या उपक्रमात शाळेतील १०० विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला आहे सोबत फोटो RJU १९प २,३

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...