Tuesday, March 6, 2018

. किरण यमाजी लहामटे (भाजप )शिक्षण बीएएमएस , जन्मतारीख

राजूर, ता . ५ : डॉ . किरण यमाजी लहामटे (भाजप )शिक्षण बीएएमएस , जन्मतारीख   - तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नव निर्माण सेना , अध्यक्ष सह्याद्री क्रांती दल , सदस्य जिल्हा परिषद राजूर गट - कै . सखाराम लहामटे (आजोबा ) यमाजी सखाराम लहामटे (जिल्हा परिषद सदस्य , पंचायतसमिती उपसभापती ,उपाध्यक्ष  आदिवासी प्रकल्प समिती , सदस्य , आदिवासी उन्नती सेवा मंडळ , अध्यक्ष आदिवासी सहकारी संस्था )
अकोले तालुक्यात आरोग्यसेवेचा सामाजिक भावनेतून मी  वैधकीय पदवी घेऊन राजूर येथे रुग्णालय सुरु केलेमात्र तालुक्यातील आरोग्य , रस्ते , रोजगार  याबाबत दिसून आलेली उदासीनता पाहून आपण  सह्याद्री क्रांती दलाची स्थापना केली . तर वडील यमाजी सखाराम लहामटे शिक्षक पदाची नोकरी सोडून राजकारणात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायतसमिती निवडणूक लढवून जिल्हा परिषद सदस्य झाले व पंचायतसमितीचे उपसभापती पद मिळाले पदाच्या माध्यमातून अंबित , अप्पर अंबित होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते मात्र नेतृत्वाने सगळे कामे एकाच वेळी करायचे नसतात असा त्यांना सल्ला दिला . त्यामुळे माझ्या मनात राष्ट्रवादी नेत्याबद्दल राग होताच त्यातच मी एका सभेत माजी मंत्री पिचड यांच्या उपस्थितीत केवळ नारळ फोडून विकास कामे होत नाही हात दुखवण्यापेक्षा तर प्रत्यक्ष कृतीवर भर द्या असे ठणकावून सांगितले . त्याचा पिचड याना राग आला त्यांनी वडिलांना मुलाला समजून सांगा असे सांगितले  तर वडिलांना  जिल्हा परिषद समाजकल्याण पद हि नाकारले व पंचायतसमितीचे  सभापती पद देण्याचे कबुल करूनही ते दिले नाही व उपसभापतीपद हि काही काळ च त्यांच्याकदे ठेवून त्यांचा राजीनामा मागितला त्या दिवसापासून वडिलांनीही स्वाभिमान दुखविल्याने राष्ट्रवादीशी सोडचिट्ठी घेऊन घरी बसण्याचा निर्णय घेतला   त्याच वर्षी आपण मनसे ची स्थापना केली व गावागावात मनसे च्या शाखा सुरु करून राजकारणात पूर्णवेळ उतरलो . विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मधुकर तळपाडे याना साथ केली . वैभव पिचड निवडून आल्यानंतर राजकारणात प्रामाणिक माणसाचे काम नाही अशी मनाशी खूणगाठ बांधून पुढील वैधकीय शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेलो मात्र राजूर जिल्हा परिषद गटाची जागा  रिकामी झाली . त्यावेळी वडिलांनी मला जिल्हा परिषद लढविण्यास सांगितले मात्र धनशक्तीच्या विरोधात लढणे अवघड होते त्यात मी शिवसेनेला विधानसभेत  मदत करूनही   मोठ्या मनानें मला भाजपचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे यांनी भाजपमध्ये येण्यास सांगून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी करण्यास सांगितले त्यावेळी काशिनाथ दादा साबळे , किरण माळवे , श्रीनिवास एलमामे व असंख्य कार्यकर्ते यांनी आग्रह केल्याने मी राजूर गटात जिल्हा परिषद निवडणूक लढवली व सर्वांच्या मदतीने भाजप पक्षातर्फे निवडूनही आलो . या संधीचा फायदा घेऊन रस्ते , गटारी , वीज , शिक्षण या प्रश्नावर आवाज उठवून निधी आणून काम केले त्यानंतर सातेवाडी गटातूनही मोठ्या मताधिक्याने दुसऱ्यांदा निवडून आलो . तर राजूर ग्रामपंचायतमध्येही राजूर विकास आघाडीची स्थापना करून ५ सदस्य निवडून आणले . एक गाव एक गणपती सामुदायिक विवाह या माध्यमातून सामाजिक काम उभे केले . भाजपचे सरकार केंद्रात व राज्यात आल्याने अकोले तालुक्यातील टोलारखिंड , पिंपरकणे पूल , रस्ते , पाणी योजना यासाठी निधी मिळविण्यासाठी आपली धडपड आहे पठारभाग आजही विकासापासून वंचित आहे तेथे सोयी सुविधा करून आश्रमशाळेच्या दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी आपला भर आहे नामांकित शाळेच्या नावाखाली राष्ट्रवादीचे मंडळी आपले भले करून आदिवासींच्या मुलांना दुय्य्म वागणूक देत आहे यावर अंकुश ठेवणे आवश्यक आहे , खेतवाडी येथे ७० लाख रुपये आरोग्य केंद्रास निधी आणला असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून वागदरी व चिंचवणे येथे रस्ते मंजूर केले पेठ्याची वाडी येथे रास्ता , हायमॅक्स देण्यात आले आहेत . २०१९ च्या निवडणुकीत आमचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे याना विधानसभेची उमेदवारी मिळाली तर मी त्यांचा प्रचार करेल मात्र मला उमेदवारी मिळाली तर त्यांचे आशीर्वाद असणे हि अपेक्षा आहे . माझे विरोधक पिचड पितापुत्र असून जे त्यांच्याविरोधात लढेल त्यांना पपाठिंबा देईल मात्र आदिवासींचे हक्क बिगर आदिवासींना व आपल्या कुटुंबातील व्यक्तींना देऊन आदिवासींवर अन्याय  होत असेल तर पिचडांविरोधात रस्त्यावर उतरून लढा देऊ जिल्हा सहकारी बँकेतील नोकरी घोटाळा , तालुक्यातील बसस्थानकात झालेला गोंधळ याची निःपक्षपातीपणे चौकशी होण्याची मागणी आपण करणार आहोत .तर जिल्हा विभाजन होऊन राजूर तालुका व्हावा हि माफक अपेक्षा सोबत फोटो

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...