Friday, July 7, 2017

राजूर , ता . २::भंडारदरा परिसरात पाऊस , वारा , व धुके असल्याने  वातावरणात मोठा गारवा होता आज भंडारदरा धरणात सकाळी ६ वाजता ३५३०दशलक्ष घनफूट पाणी साठा होता तर २४ तासात आवक ३३८दशलक्ष घनफूट इतकी होती तर सायंकाळी ६ वाजता आवक.... दशलक्ष घनफूट व साठा ..... दशलक्ष घनफूट इतका होता त्यामुळे धरण ३५ टक्के  भरले होते . वाकी मधून १०२२ क्युसेसने पाणी वाहत होते त्यामुळे कोद्नीचा वीजप्रकल्प सुरु होता तर निळवंडे धरणात सकाळी ६ वाजता ७९९दशलक्ष घनफूट तर आवक ११६ दशलक्ष घनफूट सायंकाळी ..... दशलक्ष घनफूट साठा असून कोथळा लघु पाटबंधारे प्रकल्प भरण्याच्या मार्गावर असून रात्री उशिरापर्यंत हा प्रकल्प भरेल तर पिंपळगाव खांड जलाशयातून तीन हजारापेक्षा अधिक विसर्ग सुरु असल्याची माहिती जलसंपदाचे खर्डे यांनी दिली आहे
काल  झालेला पाऊस  तालुक्यातील पश्चिम भागात वादळ व पाऊस असल्याने परिसरातील वीज व दूरध्वनी सेवा पूर्णपणे कोलमडली होती वीज कर्मचारी यांनी वादळात येउन वीज तारा जोडल्या मात्र अकोले दूरध्वनी अधिकारी नॉट रिचेबल होते . त्यामुळे परिसरात गेली दोन दिवसापासून नेट व मोबाईल सेवा बंद होती .
पाऊस - वाकी ७८/५५६,भंडारदरा ६५/६७५ ,पांजरे ७७/७४९,रतनवाडी ११७/१११७घाटघर ८२/१०१४ कोतुळ ९/२११निळवंडे १३/२०९ आढळा २/८० तर भंडारदरा जलाशयात सकाळी ६ वाजता ३५३० दशलक्ष घनफूट निळवंडे ७९९ दशलक्ष घनफूट मुळा ५४१६ दशलक्ष घनफूट तर आढळा १४७ दशलक्ष घनफूट इतका साठा होता २४ तासात भंडारदरा धरणात ३३८ दशलक्ष घनफूटएकूण २३३८ दशलक्ष घनफूट पाणी आले तर निळवंडे ११६ दशलक्ष घनफूट एकूण २५९ दशलक्ष घनफूट पाणी आले तर मुळा मध्ये ३३३ दशलक्ष घनफूट पाणी आवक झाले मुळा नदीतून ६५५२ क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे   कोळटेंम्भा येथील नाणी फॉल , नेकलेस फॉल , सुरु झाले असून आज रविवार सुट्टी असल्याने हजरो निसर्गप्रेमी व पर्यटक गर्दी करताना व सेल्फी काढताना दिसत होते
..आता लावणीची तयारी

आता पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी शेतक-याची लगबग सेकंद काटयापेक्षाही अधिक आहे. लावणीचे बेत सुरू झाले आहेत. हाकारे-कुका-यांची गजबज वाढली आहे. ही लावणी म्हणजे काही फडातला कार्यक्रम नव्हे तर हा मातीतला भुकेचा कार्यक्रम आहे. वर्षभरातील रोजी-रोटीचा प्रश्न सुटावा म्हणून पावसाळी हंगामातील हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असतो. हे लावणीचे दिवस म्हणजे मातीतली जत्राच असते. मातीबरोबर स्वत:ला सामावून घ्यावे आणि प्रत्येक आव्याबरोबर धान्याच्या राशीची स्वप्ने पाहवीत, असेच जणू..

गेल्या दोन  आठवडय़ांपूर्वी पेरलेला तरवा आता डोलू लागला आहे. या तरव्याची योग्य प्रकारे लावणी व्हावी. या रोपांची योग्यती निगा आणि काळजी घेतली जावी. यासाठी शेतक-याचे नियोजन सुरू झाले आहे. पावसाच्या धारेबरोबर भरडी शेती व पावसाने उसंत घेताच पाणथळ शेतीत रोप लावणी करण्याचे त्याचे मनसुबे आहेत. तयार झालेल्या रोपांची पेंढी बांधावीत. अशा पेंढया चिखल केलेल्या वाफ्यात घेऊन जावे. तेथे पारंपरिक पद्धतीने दोन अथवा तीन काडय़ांचा ‘आवा’ लावावा. आवा म्हणजे दोन अथवा तीन काडय़ांचा एकत्र पुंजका करून लावण्याची पद्धत..हि कामे काही शेतकऱ्यांनी सुरु केली आहेत
 सोबत फोटो rju २प ५भंडारदरा परिसरात पाऊस असल्याने  धबधबे ओढे नाले दुथडी भरून वाहत आहे .akl २p ६भाताची अवनी करताना आदिवासी शेतकरी akl २६p ७ घाटघर परिसरात पाउस पडत असल्याने हिरवेगार शिवार झाले आहे
6 Attachments

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...