राजूर , ता . ७: -तालुक्यातील मुळा ,प्रवरा परिसरात पाऊसाने उघडीप दिल्याने शेतीची
कामे धरू लागली आहे गाळ तुडविणे , आवणी इत्यादी कामात आदिवासी शेतकरी
सकाळपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत कामात गुंतले आहेत घरातील सर्वच माणसे
शेतावर असल्याने गावं मध्ये शुकशुकाट आहे वृद्ध माणसे सोडली तर गावात कुणीच
वावरताना दिसत नाही इरजूक पद्धत आजही आदिवासी भागात असल्याने एकमेकांना
शेतीकामाला मदत करताना शेतकरी दिसत आहे . तर मुंबई येथून चाकरमानी गावाकडे
आली आहेत . अकोले तालुक्यातील मोठी दोन व चार लघुपाटबंधारे सोडली तर
उर्वरित धरणे भरली आहेत खाचरे काठोकाठ भरल्याने शेतकरी आवणीच्या कमला
लागला आहे . घाटघर , रतनवाडी , बारी . पेन्डशेत , पाचनई , शिरपुंजे येथील
आवणीचवे कामे अंतिम टप्प्यात असून महिला शेतकरी मोठ्या संख्येने शेतीच्या
कामावर विसम्बुन असल्याने सकाळी ७ वाजताच शेताच्या बांधावर महिला दिसतात
अंगावर घोंगडी घेऊन शेतकरी कामाला जुंपतात पारंपरिक गाणे म्हणत ४० माणसांचे
गट एकाच वेळी दोरीत उभे राहून आवणीला सुरुवात करतात तर दप्तरी , २४८,
१००१, इंद्रायणी , इत्यादी जातीचे भात लावणीचे काम शेतकरी सेंद्रिय
पद्धतीने करतात . तर काही ठिकाणी नागली , वरई हि पिकेही घेतली जातात - सोबत
फोटो - अवनी करताना महिला rju ७प १
Friday, July 7, 2017
Subscribe to:
Post Comments (Atom)
चिंचोडी ग्रामसेवक मेडिकल रजेवर असतानाही चेकवर सह्या करून पैसे काढले
अकोले,ता.२३:ग्रामस्थानी बोलावलेल्या ग्रामसभेकडे पाठ फिरवून ग्रामविकास अधिकारी याने कार्यलयात जाऊन सरपंच यांचे सांगण्यावरून चक्क केल्या जुन्य...
-
लेख म . टा . वृत्तसेवा , संगमनेर-- सहकार चळवळ ही ग्रामीण विकासाचा कणा आहे.महाराष्ट्र व एकूण देशात ग्रामीण भागात जे परिवर्तन आणि प्...
-
अकोले - भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसर एका बाजूला डोंगरची रांग , दुसऱ्या बाजूने खोलवर दरीतून वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा नदी डोंगराच्या पोट...
No comments:
Post a Comment