Friday, July 7, 2017

भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील घाटघर रतनगड येथे मुसळधार पाऊस कोसळत असून अतिवृष्टी झाली आहे रविवार सकाळ सहा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार घाटघरला ३६० मिमी तर रतनवाडीला ३१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.. मुळा नदीतून दुपारी ३ वाजता ५६२०० क्युसेकने पाणी वाहत होते तर फोफसंडी , पाचनई या भागात दरडी कोसळल्याने रस्ते बंद झाले असून २५गावांचा संपर्क तुटला आहे . . तर मुळा नदीचे पाणी आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने बांध   बंदिस्तच मोठे नुकसान झाले आहे . फोफसंडी गावाजवळ दर्दी कोसळल्याने एस टी वाहतूक थाम्बली आहे ग्रामस्थ व प्रवासी दर्दी काढण्याची वाट पाहत आहे सार्वजनिक बांधकाम  परिषद यांनी दोन  जेसीबी लावून रस्ता साफ करण्याचे काम सुरू आहे खडकी पुलावर कुरकूंडी नदीला पूर आल्याने पुलावर ५ फूट पाणी असल्याने रस्ता बंद आहे .

हरिश्चंद्रगड गड परिसरात मुसळधार आषाढ सरी कोसळत असून मुळे नदीला मोठा पूर आला आहे. भंडारदरा धरणात गेल्या २४ तासात एक टी एम सी म्हणजे १ हजार दशलक्षघनफुट विक्रमी पाण्याची वाढ झाली आहे.कळसुबाई परिसरातही जोरदार पाऊस सुरू असून आदिवासी शेतकरी व जनावरे घरातच असून त्यांना बाहेर पडत येणे अशक्य झाले आहे . आज जोरदार पावसामुळे शेंडीचा  शकला नाही समशेरपूर , आढळा परिसरातही जोरदार पाऊस झाला तर बद गी बेलापूर , ब्राह्मणवाडा परिसरातही सकाळपासून पाऊस सुरू होता त्यामुळे बद गी बेलापूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे देवठाण भोजापूर धरणात तसेच सांगवी पाडोशी , टिटवी धरणातही पाणी आले आहे . कोतुळ पूल पाण्यात गेल्याने १५ गावांचा संपर्क तुटला आहे तर वर असल्याने झाडेही उन्मळून पडले आहे .

तालुक्यातील मुळा, भंडार दरा  पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून जोरदार पाऊस  सुरु झाला असून मुळा नदीला पूर आला आहे४०८२० क्युसेस णे पाणी वाहत असून मुळा नदीला मोठा पूर आला आहे . तर घाटघर येथे अतिवृष्टी झाली असून ३६० मिलीमीटर पाऊस म्हणजे साडेचौदा इंच पाऊस झाल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे . घाटघरला एकूण पाऊस १२८० मिलीमीटर झाल्याने मागच्या वर्षीचा आकडा पार केला आहे गतवर्षी एकूण पाऊस ११४७  मिलीमीटर इतका होता तर रतनवाडी ३१५ मिलीमीटर झाला असून म्हणजे साडेबारा इंच पाऊस पडल्याने भंडारदरा जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे एकूण ११४७ मिलीमीटर पाऊस असून गतवर्षी ९७० मिलीमीटर पाऊस झाला होता त्यामुळे या परिसरात उशिरा पाऊस झाला असला तरी गतवर्षीचे उचांक मोडीत काढला आहे . सह्याद्रीच्या कडे कपारीतून पाण्याचे मोठ मोठे धबधबे वाहू लागल्याने कुम्शेत्कडे जाणारे रस्ते बंद झाली आहेत तर कोतुल्च्या पुलावर दहा फुटापेक्षा अधिक पाणी आल्याने पूल बंद झाल्याने १५ गावांचा संपर्क तुटला आहे पिम्पाल्गावा खंड धरणही जलमय झाले आहे . त्यामुळे मुळा पाणलोट क्षेत्र्तील सर्वच धरणे भरले आहेत . तालुक्यतील अतिदुर्गम भाग असलेल्या पाचनई ,कुमशेत ,घाटघर परिसरात अतिवृष्टी  झाल्याने शेतकऱ्यांनाघराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे . फोफ संडी येथे आदिवासी शेतकरी गावात बांधलेल्या समाजमंदिरात एकत्र झाले आहे . शिरपुंजे , परिसरात  पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे शेड नेटउध्वस्त झाले आहे गंगाराम धिंदळे , गोमा धिंद ळे आदी शेतकऱ्यांची स्टोबेरीसाठी घेतलेली मेहनत वाया गेली आहे . पाऊस अधिक असल्याने पर्यटक आपल्या गावी परतू लागले आहे . मच्छिमारांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे जोरदार वृष्टी होत असल्याने पर्यटक मिळेल त्या वाहनांनी मुक्कामाच्या ठिकाणी पोहचले आहेत  आपल्या रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात पाऊस  भंडारदरा १२१ मिमी. घाटघर ३६० मिमी. रतनवाडी ३१५मिमि. पांजरे १६२ मिमी. वाकी१४२ मिमी . निळवंडे ४४मिमि. आढळा१५मिमि. अकोले ८३मिमि. कोतूळ ३३मिमि. राजूर १०२मिमि. पाऊस झाला तर भंडारदरा जलाशयात ३३६८ दशलक्ष घनफूट पाणी साठा असून ९४३ दशलक्ष घनफूट म्हणजे एक टीएमसी पाणी धरणात आल्याने घाटघर परिसरात अतिवृष्टी झाली आहे धरणातून ७९१ क्युसेक णे पाणी सोडण्यात आले असून धरणावरील दोन्ही वीजप्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु आहेत कृष्णवंती व प्रवरा व मुळा नदीला पूर आला आहे . निळवंडे ८३४ दशलक्ष घनफूट तर आढळा १३८दशलक्ष  घनफूट पाणीसाठा आहे . कोट - किरण देशमुख -मुळा , भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून मुळा नदीतून सुमारे ४५ हजार क्युसेकने पाणी वाहत आहे तर घाटघर ला साडेचौदा इंच पाऊस झाला असून भंडारदरा धरणात एक टीएमसी पाण्याची आवक झाली आहे पाऊस उशिरा झाला असला तरी सर्व उचांक मोडीत काढले आहेत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे ७ लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे मुळा धरणातही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु आहे . सोबत फोटो भंडारदरा पाणलोट क्षेत्रात  अतिवृष्टी , भातखाचरे भरले , वाहतूक बंद

सकाळ पासून पावसाचा जोर वाढला आहे. तालुक्यात पहाटे पासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु असून भंडारदरा धरण सायंकाळपर्यंत ४० टक्के भरण्याची शक्यता आहे. निळवंडे धरणाचा पाणी साठा ८५० दशलक्षघनफुट इतका झाला आहे. रंधा धबधबा अवतीर्ण झाला असून चितळवेढा येथील धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी   गर्दी केली आहे . सोबत फोटोrju १०प १,२,३ रंधा फॉल , चितळवेढा फोल व मुळा नदीला आलेला पूर

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...