Friday, July 7, 2017

म.टा.वृत्तसेवा,आपल्या धन्याच्या , सुख दुःखात वाटेकरी होत शेतीतून सोने उगविनाऱ्य  शंकर ने खूप कष्ट उपसले मात्र त्याने धन्याची मध्येच साथ सोडली काळजाला धक्का देणारी घटना बिरेवाडीत घडली . शंकर नावाच्या बैलाच्या निधनाने बिरेवाडी परिसरातील शेतकऱ्यांवर दुःखाचे सावट कोसळले. आज मानवजातीचे दशक्रिया व अंत्यविधी बघितले. प्राणी माञावर दया करा व वृक्षसंवर्धन करा असा संदेश शंकर नावाच्या बैलाच्या दशक्रिया विधीतुन दिसुन  आला. आज शंकर या जगातुन सोडून गेल्याने काय परीस्थिती निर्माण होते अशी घटना बिरेवाडीत घडली . संगमनेर तालुक्यातील साकुर जवळील बिरेवाडीतील धोंडीभाउ खंडु ढेंबरे व त्यांची मुले दिगंबर व दत्तात्रय यांनी बैल पाळला होता . व त्याचे नाव शंकर हे ठेवल्याने त्याला शंकर नावानेच हाक मारत होते. शंकर व ढेंबरे कुटुंबियांची चांगलीच घट्ट मैञी जमली होती. जवळपास  15 वर्षे शंकरचा सांभाळ केला . शंकरला या 15 वर्षात कधीही मालकाचा पाठिवर चाबकाचा मार माहित नव्हता . शंकर इतका शांत होता की जवळ गेल्यावर कधीही कोणाला मारले नाही . पण आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचेही चालेना नियतीपुढे मृत्यु अटळ असल्याने रविवार दि  25 जुन 2017 रोजी अचानक शंकरची प्राणज्योत मावळल्याने एकच धक्का ढेंबरे कुटुंबियांना बसला . पण शंकर सर्वाचा आवडता झाला होता . शंकरचा दशक्रिया विधी मंगळवार दि   4 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त शंकरचा दशक्रिया विधी बिरेवाडीतील ग्रामस्थ महिला तरूण यांच्या उपस्थितीत पार पडला . शंकरच्या नावाने पिंडदान पाडुन विशेष म्हणजे शंकरच्या पिंडेला काकस्पर्श झाल्याने एकच चर्चा झाली. तसेच एकादश असल्याने फराळाचा प्रसाद करण्यात आला होता. दशक्रिया विधी विधीवत रूढीपरंपरेनुसार बिरेवाडीतील महादेव मंदिराजवळ पार पडला . पण शंकरच्या दशक्रिया विधीतुन प्राण्यांचे व वृक्षाचे संगोपन हा उपदेश दिसुन आला . शंकरच्या निधनाने परीवारावर दुःख कोसळले होते . शंकर जगाला सोडून जरी गेला पण तर त्याची आठवण आंब्याचे झाड लावून त्या झाडाचे नाव शंकर ठेवले . व त्या झाडाचे संगोपन करून शंकर ची आठवण स्मरणात राहील असे धोंडीभाउ ढेंबरे यांनी सांगितले.
Attachments area

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...