दुर्मिळ गोरक्ष चिंच अनेक व्याधिवरील नैसर्गिक दवाखाना

गोरक्ष चिंच 
दुर्मिळ वृक्ष क्र.5
 अनेक व्याधिवरील नैसर्गिक दवाखाना म्हणजे "दुर्मिळ गोरक्ष चिंच"
 अत्यंत दुर्मिळ आणि तितकाच औषधि, शोधून शोधून थकताल पण सहज सापडणार नाही असा हा वृक्ष.अत्यंत विशाल रूप,असंख्य फांद्याचा विस्तिर्ण डोलारा,जसा आडवा वाढतो तसिच उंचीही गाठतो. पूर्ण वाढलेल्या वृक्षाच्या खोडाचा परिघ किमान 50 फुटाच्या पुढे असतो.या वरुनच त्याच्या विशालतेचा अंदाज येतो. 
         अँडान्सोनिया डीजीटाटा हे शास्रीय नाव असुन बोँबँकेसी या वंशातील हा वृक्ष आहे. मुळचा आफ्रिकेचा असुन जगाच्या पाठीवर थोड्याफार देशात कमी प्रमाणात आढळतो.पानगळी असुन उन्हाळ्यातील 3 ते 4 महिन्यात मोठ्या प्रमाणात पानगळ होवुन केवळ वृक्षाच्या फांद्याच राहतात.आणी याच काळात नाराळाच्या आकाराचे फळेही लगडतात.फळात गरासह ठणक अश्या 10 ते 12 बिया असतात. ठणकपणामुळे जहजपणे रोपे तयार करणे शक्य होत नाही. जून महिन्यात फुले आणि पाने येतात.आणी हा वृक्ष पुन्हा हिरवा गर्द होवुन जातो. 
     या वृक्षाचे जवळपास सर्वच भाग हे औषधि अाहेत. ज्वरनाशक,पित्तप्रकोप,वांती, आमांश,अतिसार,भोवळ,आव, अजीर्ण, यावर फळातील गरापासुन तयार केलेले शितपेय उपयुक्त. उष्णता (शोष) कमी करण्यासाठी माणसे खोडांचे तुकडे चघळुन खातात. तापासाठी सालिचा काढा उपयुक्त.या वृक्षाचे पंचागी भाग अनंत व्याधिवर उपयुक्त आहेत. असा हा वृक्ष अनेक व्याधिवरील नैसर्गिक दवाखान्याचा जणू. 
       नावावरुन या वृक्षांचे धार्मिक महत्व असणार याचा अंदाज येतोच. या वृक्षाखाली अडबंगनाथांनी तप केले असे सांगतात. म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे नाथ सांप्रदायाचे अदिपिठ असुन नवनाथ,अडबंगनाथांची तपोभूमी आहे.या गावची ओळख तेथे असलेल्या प्राचीन आणि विशाल गोरक्ष चिंचेमुळे होते. या वृक्षांभोवती बहुतेक ठीकाणी नवनाथाचे मंदिर अाहे. 
    लाकुड वजनानाने हलके असुन मासे मारीसाठी लाकडापासुन होड्या तयार केल्या जातात. 
हरियाली संस्थेने अहमदनगर शहरात दुर्मिळ वृक्षांचे सर्वेक्षण केले असुन या मध्ये या वृक्षाची नोंद आहे. 
मी 3 वर्षापुर्वी या वृक्षांचे रोपे तयार केले होते. नगर शहरात काही सुरक्षित ठीकाणी या रोपांची लागवड करुन संगोपनही करण्यात येत आहे. 
अहमदनगर मध्ये हा वृक्ष येथे भेटेल -1) सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसर, पावन गणपती मंदिरासमोर, औरंगाबाद रोड, 
2) गुणेशास्री आयुर्वेद काँलेज, गुणेशास्री समाधिजवळ, टिळक रोड, 
3) दीपक हीरालाल चौधरी याचे निवास,1डी, हंटर रोड, गुरुद्वारा च्या मागे,जाँगिंग पार्क जवळ, भिंगार कैम्प, 
4) अवतार मेहरबाबा समधी स्थळाजवळ,मेहराबाद,दौड़ रोड, अरणगाव, 

विशेष विनंती🙏🏻
वृक्षास कुठल्याही प्रकारची इजा पोहचणार नाही याची काळजी घ्यावी तसेच डाँक्टर्सच्या सल्ल्याशिवाय औषधासाठी कोणीही परस्पर उपयोग करु नये. 
धन्यवाद! 
                                      सुरेश खामकर 
                         अध्यक्ष-हरियाली संस्था, अहमदनगर

Comments

Popular posts from this blog

सोनेरी झुबके लेवुन दुर्मिळ "बहावा"बहरला

Image

नगरमघ्ये राज्याचे दुर्मिळ "फूल मानचिन्ह तामण"बहरले

Image