Monday, June 8, 2020

अकोले , ता. ९ :अकोले तालुका निसर्गसंपन्न असून तालुक्यात कळसुबाई -हरिश्चंद्र गड अभयारण्य १७ हजार ५०० हेक्टरवर विस्तारले आहे . या अभयारण्यात वनविभाग व मालकी १०  हजार हेक्टर क्षेत्रात हिरडा , बेहडा , करवंद ,असे विविध जंगली मालाची झाडे असून त्यात  बाळ हिरड्याचे प्रमाण अधिक आहे . हा हिरडा आयुर्वेदिक असून मार्च ते मे या कालावधीत झाडाला हे फळ येते एका झाडाला परिपक्व झाल्यानंतर  तीस ते पस्तीस किलो हिरडा मिळतो . त्याचा किमान भाव १००-१२० रुपये किलोने मिळतो . मे अखेरीला सर्व हिरडा तयार होऊन त्याची खरेदी  आदिवासी विकास  महामंडळामार्फत केली जाते  त्यातून जंगलात राहणाऱ्या आदिवासीना किमान ५ हजार ते पन्नास हजार पर्यंत उत्पन्न मिळते त्यातून त्याचे चार महिने पावसाळ्यातील आर्थिक प्रश्न सुटल्याने ते खुश असतात पावसाळ्यात भातपीक, नगदी पीक घेऊन त्याचा वर्षभराचा प्रपंच सुख समाधान चालतो मात्र २०१४ पासून हि हिरडा  खरेदी महामंडळाने बंद केली होती ती पुन्हा २०१९ पासून सुरु झाली असली तरी यावर्षी महामंडळाने कोरोनाचे संकट कारण देत हा हिरडा खरेदी न केल्याने आदिवासी आर्थिक संकटात सापडला आहे . तर व्यापारी त्याचा माल  घेतात मात्र आज्ञानाचा गैरफायदा घेऊन काट्यात मारतात , वजन पाच किलो साडेपाच तर दहा किलोचे १२ किलो वजन बनवून आणतात त्यामुळे . १० किलो माल ८च किलो भरतो . मुकाट्याने आदिवासी आपला माळ विकून हातात जे मिळतील त्यावर समाधान मानत घरी जातो . आदिवासी विकास महामंडळ पूर्वी सोसायटी मार्फत हिरडा खरेदी करत असे राजूर , कोतुळ , समशेरपूर , शेंडी येथे केंद्र असायची आदिवासी आपला माल विक्री करून त्याला जागेवर पैसे मिळत असे मात्र यावर्षी खरेदी न झाल्याने व्यापारी तो माळ कमी भावात घेऊन गेले तर काहींचा माल  अद्याप घरातच पडून आहे . काहींचा अवकाळी पाऊसाने खराब झाला आहे . केंद्र सरकारची प्रधानमंत्री वन धन विकास योजना - जंगलात राहणाऱ्या आदिवासी साठी प्रधानमंत्री वनधन  विकास केंद्र  योजना राज्य सरकारने मान्य  करून६ मे २०२० रोजी त्याचा अध्यादेश काढण्यात आला मात्र ट्रायफेड कडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेले प्रस्ताव प्रलंबित असल्याने आदिवासी   जंगली माल तसाच पडून असून त्यामुळे आदिवासी समाजाची मोठी ससेहोलपट पाहायला मिळत आहे . जिल्हाधिकारी यांनी खरेदीस परवानगी दिली असली तरी जोपर्यंत निधी उपलब्ध होत नाही तो पर्यंत जंगली माल  खरेदी करणे अशक्य असल्याचे आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर पाटील यांनी सांगितले आहे . जंगलात निर्माण  होणाऱ्या गौण वनोउपजावर आदिवासींचे परंपरागत ज्ञानाचा ,कौशल्याचा तसेच त्यासोबत आधुनिक माहिती  तंत्रज्ञानाचा उपयोग करुन गौण वनोउपजावर प्रक्रिया करणे व त्याचे मुल्यसंवर्धन करुन त्याची विक्री करणे, त्यामुळे आदीवासीचे जीवनमानउंचावणे  हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे कें द्र शासनाच्या जनजाती कार्य  मंत्रालयाचे अधि सूचना क्रमांक-१९/७/२०१९आजीविका दि . .२६. ०२.२०१९ अन्व्ये प्रधानमंत्री वनधन विकास  कें द्र ही योजना कें द्र शासनानेकार्यान्वित  केली अहे. त्याऄनुषंगाने, राज्यातील स्वयंसहायता गट ज्यामध्ये अनुसूचित जमातीचे किमान ७० टक्के सभासद आहेत त्यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात प्राप्त होणाऱ्या गौण वनोपजाचे   इतर बाबीवर मूल्यवर्धन करून त्याची विक्री करण्यासंदर्भातील  प्रधानमंत्री वनधन विकास  ही योजना राज्यामध्ये राबववण्यास मान्यता  देण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीची एकाधिकार खरेदी केंद्र योजना  बंद करण्यात  अली आहे या योजनेसाठी खरेदी परवानगी साठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी ,खासदार , आमदार ,उपप्रादेशिक व्यवस्थापक या कमिटीचे सदस्य असून खरेदीसाठी प्रस्ताव तयार करून त्यास जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन तो प्रस्ताव शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ व्यवस्थपकीय संचालक नाशिक यांचेकडे पाठवून त्यांनी राज्याचे मुख्य सचिव यांचेकडे पाठवून राज्य शासनामार्फत  भारतीय जनजाती सहकारी विपणन विकास संघ मर्यादित (ट्रायफेड )नवी दिल्ली येथे मंजुरीसाठी पाठविलेअसून त्यात नगर जिल्ह्याचा प्रस्ताव असून ९ वेळा पाठपुरावा करूनही अद्याप मंजुरी नसल्याने नगर जिल्ह्यात खरेदी करणे अशक्य झाल्याचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर पाटील म्हणाले.मात्र त्याची हि सरकारी भाषा असल्याचे सामाजिक कार्यकर्त्याचे मत आहे.  _  हिरडा बहुउपयोगी --- हिरडा
हिरडा म्हणजे हरीतकीही अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. सुरवारी हिरडा, बाळ हिरडा, रंगारी हिरडा असे याचे मुख्य प्रकार आहेत. नास्ती यस्य गृहे माता तस्य माता हरीतकीम्हणजे ज्याच्या घरी आई नाही त्याची काळजी हिरडा घेतो. इतके हिरड्याचे महत्त्व आयुर्वेदात वर्णन केलेले आहे.
भूक , लागणे, अन्न न पचणे, यावर बाळहिरडे खावेत. मलपृष्ठ भागावर हिरड्याचे चूर्ण रोज रात्री कोमट पाण्याबरोबर घ्यावे. मूळव्याधीच्या आजारात संडासाला खडा होणे, कुंथावे लागणे, यावर हिरडा घ्यावे. अम्लपित्तावर हिरडा चूर्ण तुपाबरोबर घ्यावे. खोकला, दमा, कफ, यावर हिरडा चूर्ण आणि पिंपळी चूर्ण मधातून चाटून खावे.
हिरडा हा डोळ्यांना फार उपयुक्त आहे. डोळे येणे, डोळ्यांना लाली, सूज, डोळ्यांना आग, डोळ्यांना पाणी येणे, या डोळ्यांच्या विविध विकारांवर सुरवारी हिरड्याच्या क्वाथाने डोळे धुवावेत. हिरडा, बेहेडा, आवळा, यापासून त्रिफळा चूर्ण तयार करतात. रोज रात्री १ चमचा त्रिफळा, १ चमचा मध, २ चमचे तूप, असे सेवन केल्यास डोळ्यांचे तेज वाढते. चष्म्याचा नंबर कमी होतो. मध आणि तूप मात्र सम प्रमाणात असू नये. हरीतकी हे रसायन आहे. रोज हिरडा चूर्ण सेवन केल्याने शरीर निरोगी रहाते. बुद्धी तरतरीत रहाते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. घाम जास्त येत असल्यास आंघोळीच्या वेळी अंगाला हिरडा चूर्ण लावावे. लहान मुलांना काही वेळा संडासाला होत नाही, कुंथावे लागते. अशा वेळी हिरडा पाण्यात उगाळून चाटवावा. दमा, उचकी लागणे यावर हिरडा, सुंठ गरम पाण्यातून घ्यावी. अजीर्ण, भूक न लागणे यावर सुरवारी हिरडा आणि सुंठ गरम पाण्यातून घ्यावी. काविळीवर हिरड्याचा चांगला उपयोग होतो. असा हा हिरडा अनेक व्याधींवर गुणकारी आहे.
हिरडा प्रक्रिया केंद्र उभारून रोजगार निर्मिती -- अकोले तालुक्यात जंगली माल मोठ्या प्रमाणात असून या जंगलीमालावर सेमी प्रोसेस केली व ग्राइंडिंग करून माळ तयार केला तर दरवर्षी २० ते ३० कोटीची उलाढाल होऊन हजारो उपेक्षित गरीब आदिवासी माणसांना रोजगार उपलब्ध होऊन या भागातील स्थलांतर थाम्बले राज्यातील सर्वच आदिवासी भागात हि परिस्थिती असून बायफ सारख्या संस्थांनी पुढाकार घेतल्यास व सरकारने सकारात्मक भूमिका बजावली तर आदिवासी बचत गटाच्या माध्यमातून महिला युवक व जेष्ठ नागरिकांना स्वयं रोजर्गार तयार होऊन आदिवासींची उपासमार , कुपोषण होणार नाही . वनविभागाने हिरडा , बेहडा , करवंद जांभूळ , मोह , करंज , मध यांचे संवर्धन केल्यास  तसेच बाळ हिरड्याचे केमिकल , पावडर काढून कच्चा माल  तयार केल्यास शहरातील माणूस गावाकडे वाळल्याशिवाय राहणार नाही हे तितकेच खरे , राजकीय व्यक्तींनी आपण गोरगरीब जनतेचा आधार कसे बनू त्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून कार्य केलयास  ---  तालुक्यातील जंगलातील आदिवासी उपासी व रोजगार र्विना राहणार नाही हे तितकेच खरे ...मात्र अकोले तालुक्यात मी मी तू तू हि भाषा सुरु असून आदिवासीचा विकास हेच ध्येय ठेवून जागृतीची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे    फोटो


No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...