Saturday, June 20, 2020

संजय शुक्ला गॅंग हद्दपार होईल परंतु त्यांना साथ करणाऱ्या खाकी वर्दीतील महाभागांचे काय ?कर्तव्य दक्ष अधिकारी नितीन पाटील यांचे सर्व स्थरातून अभिनंदन



अहमदनगर , ता . १९:तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व दारूबंदीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजूर गावात परप्रांतीय मजूर म्हणून आलेले व मजुरी करण्यापेक्षा दारूबंदी असताना अवैध्य रित्या दारू , गांजा व्यवसाय करून गावाला तसेच सामाजिक कार्यकर्ते याना वेठीस धरून प्रसंगी पोलिसांवरही हात उचलणाऱ्या संजय शुक्ला गॅंगला राजूर पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी नितीन पाटील यांनी तालुक्यात संघटितपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या संजय अदालतनाथ  शुक्ला, (३०)राहुल अदालतनाथ शुक्ला (२५)विनय अदालतनाथ शुक्ला (२३)मूळचे उत्तरप्रदेश सर्व राजूर यांचेवर हद्दपारीची कारवाई व्हावी म्हणून जिल्हा पोलिसांकडे प्रस्ताव पाठविला होता त्याचा सर्व तपासणी अहवाल घेऊन या तिघांच्या टोळीला २ वर्षासाठी नगर जिल्ह्यासह बाजूच्या तीन जिल्ह्यासह हद्दपार करण्यात आल्याची माहिती सपोनि नितीन पाटील यांनी दिली आहे .त्यामुळे राजूर परिसरात समाधान व्यक्त होत आहे . दारू बंदीचे कार्यकर्ते हेरम्ब कुलकर्णी यांनी हा निर्णय म्हणजे ऐत्यासिक असून इतर अवैद्य विक्रेत्यांना त्यामुळे चपराक बसली असल्याचे ते म्हणाले .
राजूर येथे गेली ४० वर्षांपूर्वी  अदालतनाथ शुक्ला आपल्या पत्नीसह उत्तरप्रदेश मधून आला . प्रथम पेढे विक्री नंतर , सीताफळ , आंबे ,जांभळे  होळीचे कडे गाठी विक्री करून गुजराण करीत असे मात्र त्याने मुले मोठी झाल्यावर प्रथम गांजा , नंतर दारू विक्री सुरु केली त्याचा मोठा मुलगा संजय याने राजूर परिसरात राजरोस अवैध्य व्यवसाय सुरु केले . पोलिसांना हाताशी धरून चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यांना आवाज केला तर केसेस करील अशी दमबाजी देऊन आपल्या गँगची दहशत निर्माण केली होती . त्याच्या नदी सहसा कुणी जात नसल्याने त्याने मोठ्या प्रमाणात दारू विक्री करून पैसे मिळविले त्यासाठी पोलीस खात्याचेही सहकार्य मिळाल्याने त्याने नंतर दारू उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनाही छापा टाकायला आल्यावर महिलांना पुढे करून मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याचे पोलीस रेकॉर्ड आहे . राजूर येथे दारू बंदी असतानाही तो सार्वजनिक ठिकाणी दारू विक्रीचा व्यवसाय करीत होता तर काही पोलीस कर्मचारीही त्याच्या या कामात सहभागी असल्याचे समोर आले आहे . त्यातली काहींची बदली झाली तर अजूनही छुपे रुस्तुम तिथेच आहे . राजूर येथील ३०० महिला व ग्रामस्थांनी वेळोवेळी लेखीअर्ज देऊनही कारवाई होत नव्हती मात्र पाटील सारखे देव अधिकारी आल्याने शुक्ला गॅंगच्या मुसक्या आवळल्या
दिनांक १८/०३/२०१९ रोजी पोलीस निरीक्षक, राजुर पोलीस स्टेशन यांनी राजुर तसेच अकोल
तालुक्यातील संघटीतपणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारी टोळीविरुद्द हद्दपारीचा कारवाई व्हावी याकरीता प्रस्तावातील
इसम नामे टोळीप्रमुख १) संजय अदालतनाथ शुक्ला बय ३० रा.राजुर ता. राजुर जिल्हा अहमदनगर, टोळीसदस्य अ.नं
२) राहुल अदालतनाथ शुक्ला वय २५ वर्ष रा.राजुर ता. राजुर जिल्हा अहमदनगर, टोळीसदस्य अनं ३) विनय
अदालतनाथ शुक्ला वय २३ वर्ष रा. राजुर ता राजुर जिल्हा अहमदनगर यांचे विरुद्ध २ वर्षाकरीता हद्दपार करणे
बाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आले होते.
सदर प्रस्तावावर मा, अखिलेश कुमार सह, हृद्दपार प्राधिकरण तथा, पोलीस अधिक्षक सौ. अहमदनगर
यांनी सदर हद्दपार टोळीविरुष्द राजुर गाव तसेच अकोले परिसरात संघटीतप्ण मारामारी करुन दुखापत करणे,
गैरकायदयाची मंडळी जमवून दहशत निर्माण करणे, सरकारी नोकरीस मारहाण करुन सरकारी कामात अडथळा
आणणे, जातीवाचक शिवीगाळ  करुन दमबाजी करणे, अवैधरित्या संगनमताने दारु कब्जा बाळगुन बिक्री करणे चो री
करणे. शिवीगाळ करणे सार्वजनिक ठिकाणी  गैरवर्तणूक  करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहे. सदर
संघटीतपणे गुन्हे कारणारी टोळीतील इसमें नाम टोळीप्रमुख १) संजय अदालतनाथ शुक्ला  वय ३० रा.राजुर ता.
राजूर ९ गुन्हे , टोळीसदस्य  २) राहुल अदलतनाथ शुक्ला वय २५ वर्ष रा.राजुर ९ गुन्हे
  ३) विनय अदालनाथ शक्ला यव २३ वर्ष रा राजूर४ गुन्हे  यांना
अहमदनगर,जिल्हा पोलीस अधीक्षकांनी
दिनांक १८/०६/२०२० रोजी हद्पारीचा अंतिम कारवाई करून हद्द पारीचा आदेश परित केला आहे. (संजय शुक्ल यास दिड  वर्षे नगर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर , इगतपुरी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून ,विनायक शुक्ला यास दिड तर राहुल शुक्ला यास २ वर्षे तीन जिल्ह्यातून हद्दपार केले आहे .  चौकट---राजूर पोलीस स्टेशनला यापूर्वी कार्यरत असलेल्या एका अधिकार्याने  संजय शुक्ला
गॅंग ला हाथाशी धरून आपल्या आर्थिक प्रकरणात आड येणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनसोबत भांडणे करण्यास सांगून त्यंच्यावर केसेस दाखल करून त्याचे तोंड बंद करण्याचा प्लान आखून आपलेही कल्याण व तू दारू विक्री करून तुझेही कल्याण असे उद्योग केल्याने या संजय शुक्ला बंधूचा आत्मविश्वास वाढल्याने त्यांनी सिन्नर सारख्या ठिकाणाहून बनावट दारू आणून गरीब आदिवासी , मजूर यांना विकून त्यातून लाखो रुपये कमविले त्यात खाकी वर्दीतील महाभागही होते . एका खाकी वर्दीतील व्यक्तीने तर भांडवल देण्यापासून या शुक्लाची मदत केली . तर त्याच्याविरोधात काही घटना घडणार असतील किवा दारू उत्पादन शुल्कची रेड पडणार असेल तर  तर त्याला फोन द्वारे कळवून त्याला सावध केले जायचे तर त्याबदल्यात त्यांचे  हातही ओले होत असे हि अपप्रवृत्ती बळावली त्याला राजकीय हस्तक्षेप व पोलीसही तितकेच जबाबदार असून यापूर्वीच्या वर्दीतील व्यक्तींची चौकशी होणे आवश्यक असल्याचे सामाजिक संस्थांचे मत आहे .संजय शुक्लाच्या  बनावट दारू विक्रीमुळे काही उमद्या व कर्तुत्ववान तरुणानाही आपले प्राण गमवावे लागले तर काही तरुण आजही मरणाच्या दारात रेंगाळत आहेत अनेक महिलांचे कुकू पुसून त्यांना वैधव्य आणणाऱ्या या संजय गॅंगला केवळ हद्दपार करून नव्हे तर त्याला साथ देणाऱ्या खाकी वर्दीतील गॅंगलाही शसन झाले पाहिजे केवळ आपले आर्थिक हितसंबध जपन्या साठी व काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून शुक्ला कुटुंबियाचा वापर केला जात होता व त्या माध्यमातून आपले कल्याण कसे होईल असेही इथिल पोलीस यंत्रणेला वाटत होते त्यामुळे प्रामाणिक व्यक्तीवर व सामाजिक कार्यकर्त्यांवर , पत्रकारावर खोटे गुन्हे नोंदवून शुक्ला सारख्या अप प्रवृत्ती व विष वल्ली वाढविण्याचे महापाप करणारे ते खाकी वर्दीतील महाभागांना शिक्षा होईल का नाही तर शुक्ला सारख्या अनेक गॅंग अकोले तालुक्यातव राजूर परिसरात  तयार झाल्या तर  आश्चर्य वाटण्याचे कारण नाही . नितीन पाटील सारखे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी आल्यामुळेच त्यच्यावर हद्दपारी होऊ शकली परंतु या प्रामाणिक अधिकाऱ्यालाही अडचणीत आणण्यासाठी ५० किलोमिटरवरून आपल्या हस्तका मार्फत प्रयत्न करणारा तो अधिकारी कोण याचेही उत्तर जनतेला मिळणे आवश्यक आहे . असे प्रकार सुरु राहिले तर प्रामाणिक लोक , अधिकारी , पत्रकार पुढे येणार नाहीत व त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असे वाटते ....       photo राहुल शुक्ला AKL १९P ६

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...