Friday, June 12, 2020

आदिवासी तरुण शेतकरी शांताराम बारामते याने शेतीत विविध प्रयोग करून सेंद्रिय शेतीचे पॅटर्न राबविला






शांताराम कोंडीबा बारामते धामनवण ,तालुका-अकोले , जिल्हा- अहमदनगर
 अकोले ता . २७:राजूर सोडले कि अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम कुमशेत,आंबीत कडे जाणा-या रस्त्याला १५ किमी वर धामनवन गाव लागते. या गावाच्या अगोदर रस्त्याच्या कडेला शेतीचे वेगवेगळे प्रयोग आपले लक्ष नेहमी वेधून घेतात. यामध्ये ठिबकवर मिरची लागवड, उन्हाळी भुईमुग,मधुमक्षिका पालनाच्या पेट्या, शेततळे, फणस,आंबा व मिरीचे डोलणारे झाडे, पावसाळ्यात चारसूत्री लागवडीचा सुंदर भाताचा प्लॉट, गांडूळखत निर्मिती व राबणारे एक आदिवासी जोडपे. असे अनेक उद्बोधक प्रयोग केले आहेत शांताराम कोंडीबा बारामते या आदिवासी युवकाने.
       खरे तर खूप अबोल असा हा शांताराम.पण नवीन काही गोष्ट कळली कि तो ते करणारच.घरची परिस्थिती खूप बेताची. वृद्ध आई व हा स्वता ,बायको व त्याची मुले.सोबतीला शेती मशागत करणारे डांगी जनावरे,कुटुंबाला हातभार लावणाऱ्या १०-१५ शेळ्या. काहीतरी करण्याची जिद्द.हीच त्याची मिळकत .आजपर्यंत अनेक मान्यवरांनी त्याच्या शेताला भेटी दिल्या आहेत. नुकताच मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने त्याला उत्कृष्ट शेतकरी म्हणून पुरस्कार देखील दिलेला आहे.

अकोले तालुक्यातील दुर्गम अशा धामनवन गावात शांताराम कोंडीबा बारामते या तरुण
शेतकर्‍याचा जन्म झाला. परिस्थिती गरिबीची असल्याकारणाने त्याला फार शिक्षण घेता आले
नाही. परंतु ज्ञान घेण्याची जिज्ञासा त्याला आदिवासी भागातही स्वस्त बसू देत नव्हती. लवकरच
वडिलांचे कृपाछत्र हरवल्यामुळे तरुणपणी त्याच्यावर कुटुंबाची पालन पोषण करण्याची जबाबदारी
येऊन पडली. केवळ शेती हेच ऐकमेव उदरनिर्वाहाचे साधन असल्याने आता शेतीशिवाय पर्याय
नाही हे तो ओळखून होता. अशा बिकट प्रसंगी आपण घेत असलेल्या भात पिकाचे उत्पादन
वाढविल्याशिवाय आपली आर्थिक प्रगति होणार नाही हे तो ओळखून होता. त्यासाठी आपल्याला
आपल्या नेहमी वापरत असलेल्या तंत्रज्ञानात बदल करावा लागेल हे त्याच्या लक्षात आले.
त्याचबरोबर केवळ शेती वर अवलंबून राहून आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार नाही. हे लक्षात
आल्यानंतर त्याने मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर आपल्या तंत्रात बदल केले.
शेतकर्‍याने राबविलेले नावीन्य पूर्ण प्रयोग:
 धामनवन गावात प्रथमच भात पिकामध्ये चारसूत्री तंत्राचा वापर करण्यात आला. आजØ
त्याने हा प्रयोग केल्यामुळे पूर्ण गाव १०० टक्के चारसूत्री पद्धतीने भात लागवड करत
आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात सरासरी ३० टक्के वाढ झाली आहे.
 गावराण बियाणे संवर्धन करण्याबरोबर संकरीत बियाणे वापर देखील त्यांनी केला आहे.Ø
त्यामुळे त्यांच्याकडून इतर शेतकरी सतत नवीन बियाणे, उपचार पद्धती यांचीऊ माहिती
घेत असतात.
 स्वतच्या शेतावर रासायनिक खते व औषधे यांचा वापर मर्यादित राहावा म्हणून गांडूळØ
खत निर्मिती ,दशपर्णी अर्क निर्मिती,बायोडायनामिक खत निर्मिती यांचा वापर मोठ्या
प्रमाणावर करून इतर शेतकर्‍यांना प्रेरणा दिली आहे.
 गावामध्ये परिवर्तन सेंद्रिय भात उत्पादक गटाची आत्मा अंतर्गत नोंदणी करून २५Ø
शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी संघटित केले आहे.
 आदिवासी भागात प्रथमच भात पिका मध्ये राब पद्धतीला पर्याय देण्याचे काम या युवाØ
शेतकर्‍याने केले आहे. राब करून नेसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान करण्यापेक्षा गादीवाफे

तयार करून त्यावर भात रोपवाटिका तयार केली. आज गावात इतर १३० शेतकरी आता
रोपवाटिका वापरत आहे.
 भात रोपास सुरवातीला पाणी कमी पडते त्यावेळी पाणी कमी पडू नये यासाठी त्यानेØ
तुषार सिंचन व्यवस्था उभी केली. त्यामुळे वेळेत भात रोपे तयार करता येतात व नुकसान
होत नाही.
 पूरक व्यवसाय मुख्य शेती व्यवसाय करताना आवश्यक असल्याने या तरुण शेतकर्‍यानेØ
शेळीपालनाचे काम उभे केले. आज या शेतकर्‍याकडे १५ शेळी आहेत.
 हा परिसर जंगलाने व्यापलेला असल्याने येथील तरुण आदिवासी शेतकर्‍यांना मधुमक्षिकाØ
पालन करून अतिरिक्त आर्थिक स्रोत निर्माण करता येऊ शकतात. या बाबीचा विचार
करून यांनी पुणे येथील खादी ग्र्मोद्योग केंद्रामध्ये मधुमक्षिका पालन प्रशिक्षण पूर्ण केले
असून आज त्याकडे १० पेट्या लावलेल्या आहेत. दरवर्षी १५० किलो मध संकलन केले
जाते.
 कृषि विभागाच्या आत्मा सहभागातून श्री. शांताराम कोंडीबा बारामते यांनी अकोलेØ
तालुक्यात प्रथमच मिरी या मसाले लागवडीचा प्रयोग केला असून आपल्या शेतकरी
गटामार्फत ६ शेतकर्‍यांना यात सहभागी करून घेतले आहे.
 सन २०१९-२० मध्ये अकोले तालुक्यातील कृषि विभागाचे मासिक चर्चा सत्राच्या निमित्तानेØ
सर्व उपविभागीय कृषि अधिकारी व सर्व तालुका कृषि अधिकारी, महात्मा फुले कृषि
विद्यापीठ येथील तज्ञ यांनी त्यांच्या उपक्रमास भेट दिली.
 अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव  पिचड त्याचबरोबर सध्याचे आमदारØ
डॉ.किरण लहामटे यांनी देखील या शेतकर्‍याच्या कामास भेट दिली आहे व असे काम
इतरही शेतकर्‍यांनी करावे असे ते म्हणाले सोबत फोटो agro १ २७p १---२,३,४,५  
7 Attachments

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...