Friday, June 12, 2020

अकोले तालुक्यातील समशेरपूर शिवारात खडकाळ माळरानावर कमी पाण्यात सीताफळाची दर्जेदार शेती तयार करून, तोंडली व सहा गायी पाळून त्याद्वारे वर्षाकाठी साडेतीन लाख रुपये

अकोले , ता . १४:अकोले तालुक्यातील समशेरपूर शिवारात खडकाळ माळरानावर कमी पाण्यात सीताफळाची दर्जेदार शेती तयार करून, तोंडली व सहा गायी पाळून त्याद्वारे वर्षाकाठी साडेतीन लाख  रुपये मिळवून  तालुक्यात एक आदर्श शेतकरी  म्हणून युसूफ पिरमहंमद शेख  पत्नी शाहीन युसूफ शेख यांनी नावलौकिक मिळविला आहे . रोज सकाळी ७ ते रात्री उशिरापर्यंत हे कुटुंब काळ्या मातीत  राबून सीताफळाच्या विविध जातीचा अभ्यास करून सीताफळाची नर्सरीही उभारीत आहे .
युसुफ पीरमोहम्मद शेख आणि पत्नी शाहीन युसुफ शेख ही शेतकरी जोडी समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील अत्यंत कमी क्षेत्रावर (3.5 एकर) ,आपली उपजीविका यशस्वीपणे चालवत आहे युसुफ हे उच्चशिक्षित असून एम ए बी एड शिक्षण घेतलेले आहे आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सण 1997 मध्ये कल्याण जवळ एका खाजगी विनाअनुदानित शाळेत सहा महिने  शिक्षकाची नोकरी केली त्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आई-वडील यांच्यासाठी परत गावी जाण्याचा निर्णय घेतला गावी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने त्यावर गुजराण करणे खूप कठीण जायचे दरम्यानच्या काळात बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या माध्यमाने आणि युरोपियन युनियन यांच्या अर्थसहाय्याने समशेरपुर आणि परिसरात ग्रामीण विकास प्रकल्प राबवण्यात येत होता दरम्यानच्या काळात युसूफ यांची भेट प्रकल्प समन्वयक श्री अनिल बोराडे व प्रक्षेत्र अधिकारी नारायण जाधव प्रदीप खोशे जितीन साठे यांच्याशी झाली युसूफ यांना त्यांनी फळबाग लागवडीचा सल्ला दिला पाणी कमी असल्याने कमी पाण्यावर येणारे कोरडवाहू फळपीक सिताफळ लागवडी चा त्यांनी सल्ला दिला त्यासाठी युसुफ यांनी  तयारी दाखवली उन्हाळ्यामध्ये 13  x 13 फूट अंतरावर व दोन xदोन फूट आकाराचे खड्डे खणून तयार ठेवले . त्यामध्ये शेणखत ,पालापाचोळा ,बोनमील ,सुपरफॉस्फेट इत्यादी खते प्रत्येकी एक किलो याप्रमाणे भरून मे महिन्याच्या अखेरीस पावसाळ्यापूर्वी खड्डे भरून तयार ठेवले .त्यामध्ये बाळानगर वानांचे सीताफळ रोपे या खड्डामध्ये लागवड केली. सुमारे एक एकर लागवड करताना 260 रोपे लागवड करण्यात आली .त्यांची योग्य निगा आणि संगोपन केल्यानंतर चौथ्या वर्षापासून फळधारणा सुरू झाली. विशेष म्हणजे सीताफळाची बाग त्यांनी सेंद्रिय पद्धतीने जोपासलेली आहे. दरवर्षी शेणखत आणि गांडूळ खत ,निंबोळी पेंड इत्यादी खतांचा वापर ते सीताफळ बागेत करतात .विशेष बाब म्हणजे लोकरी मावा व पिठ्या ढेकूण या किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात छाटणी केलेल्या झाडांना बुंध्याजवळ ग्रीस च्या पट्ट्या ते दरवर्षी लावतात .त्यामुळे किडींचे संक्रमण झाडावर होत नाही. आणि झाडे निरोगी राहण्यास मदत होते .दर तीन वर्षांनी बागेची एकदा खरड छाटणी ते करतात  .दरवर्षी  फेब्रुवारी-मार्चमध्ये  हलकी छाटणी करतात.  त्याचा उपयोग  फलधारणा चांगली होण्यास  व फळांचा दर्जा  उत्तम राहण्यास  होते .दरवर्षी आंबिया आणि मृग बहार पासून त्यांना सीताफळे विक्रीस मिळतात .सरासरी त्यांना दोन्ही बहार मिळून सरासरी 250 कॅरेट विक्रीस मिळतात .एका कॅरेटमध्ये अठरा किलो सिताफळ बसते .त्यानुसार प्रति वर्ष सरासरी  4500 किलो एवढे उत्पन्न त्यांना दरवर्षी मिळते .ही सीताफळे ते प्रतवारी करून मुंबई , नासिक ,सुरत येथील बाजारपेठेत विकतात .दरवर्षी खर्च वजा जाता त्यांना दोन ते अडीच लाख रूपये निव्वळ सीताफळ बागेतून मिळतात .सीताफळ बागेच्या बांधावर गावठी कोकणी शेवगा 30 ते 40 झाडे तयार केले आहेत. आठवडे बाजारात हातविक्री करून त्यापासून वर्षाकाठी पंधरा ते वीस हजार रुपये त्यांना मिळतात. दुग्ध व्यवसाय शेतीला जोड म्हणून त्यांनी सुरू केला आहे .सहा गाईंचे सरासरी प्रतिदिन 35 ते 40 लिटर दूध विक्री होते. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळावा म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन बी एम सी ची स्थापना केली. या मध्ये दररोज दीड हजार लिटर दूध संकलित करून थंड केले जाते . पुढे ते विक्रीस मोठया शीतकरण केंद्रावर दिले जाते .  या प्रक्रियेपासून त्यांना दररोज साडेसातशे ते आठशे रुपये मिळतात .शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना युसुफ यांनी तोंडली पिकाची लागवड 20 गुंठे क्षेत्रावर केली आहे . दहा x दहा फूट अंतर ठेवून दोनशे तीस झाडे त्यांनी लागवड केली आहेत. त्यापासून त्यांना गत हंगामात 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले .युसुफ यांचे शेतीतील प्रयोग इतर तरुण शेतकऱ्यांना कायम प्रेरणादायी राहिलेत. त्यांचे शेती आणि शेतीवर आधारित प्रयोग पाहण्यासाठी बायफ चे अध्यक्ष गिरीश सोहनी यांनी गेल्यावर्षी त्यांचे बीएमसी आणि सीताफळ बागेला भेट दिली होती.परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतीपूरक उद्योग कसा फायदेशीर   हे पटवून सांगतात  - ते म्हणतात सिताफळांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असून बर्‍याच पोटदुखीच्या विकारामध्ये या फळांचा उपयोग केल्यास निश्चितच फरक पडतो. सिताफळाच्या झाडांची पाने, साल, मुळ, बिया सर्वाचाच उपयोग अनेक कारणांसाठी होत असल्याने सिताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात करणे फायदेशीर आहे.फळांचा उपयोग रक्तशुद्धीसाठी (टॉंनिक) म्हणून तसेच खोकला, सर्दी, पोटाचे विकार, पित्त, हगवण व क्षय रोगांस प्रतिबंधक म्हणून होतो. सिताफळापासून तयार केलेले सिताफळसव या औषधाचे सेवन वर्षभर नियमित केल्यास क्षयरोग व हगवणींचा विकार असलेल्या व्यक्तीस हमखास फरक पडतो. सिताफळाच्या झाडाच्या मुळांचा उपयोग शौचास त्रास किंवा व्यवस्थित होत नसल्यास केला जातो, तर पानांचा उपयोग मधुमेहाचा विकार असलेल्या व्यक्तिस साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी गुणकारी आहे.जमीन व हवामान- सिताफळ हे गाळाच्या जमिनीत, पाण्याचा निचरा होणार्‍या जमिनीत किंवा लाल मुरमाड, हलक्या, खडकाळ, डोंगरकाठच्या जमिनीत, दगड गोटे असलेल्या जमिनीत देखील येते खते शक्यतो नैसर्गिक द्यावीत. खतांची जास्त मात्रा सिताफळाच्या झाडास लागत नसून झाडांच्या वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी ३ ते ४ घमेली शेणखत किंवा कंपोस्ट खत सिताफळाच्या प्रत्येक झाडास द्यावे. झाडाचे वय जसजसे वाढेल तसतसे खताचे प्रमाण वाढवावे. कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम प्रत्येक झाडास वापरणे उत्तम.सोबत अग्रो१ १४प१,२,३ 



























No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...