Tuesday, May 19, 2026
मजुषा वाढदिवस
सहजीवनाची शिल्पकार
प्रेमाचा झरा
त्यागाची मूर्ती
ममतेची सावली
कर्तृत्ववान अर्धांगिनी
संघर्षातील दीपस्तंभ
आयुष्याची सोनेरी साथ,जीवनाची प्रेरणा
आनंदाची सावली
सुखदुःखाची सोबती
प्रेमाची मूर्ती
आज माझ्या,अर्धांगिनी, जीवनसाथीचा, सौ. मंजुषा काळे हिचा वाढदिवस…
२० मे १९७१ रोजी जन्मलेली मंजुषा माझ्या आयुष्यात १० मे १९९२ रोजी आली आणि आयुष्यालाच नवी दिशा मिळाली.
पुण्यासारख्या शहरात बालपण गेलेल्या या मुलीने राजूरसारख्या खेड्यात संसाराची सुरुवात केली. बी.ए. पूर्ण झाल्यानंतर लग्न झाले, पण शिक्षणाची जिद्द मात्र कायम ठेवली. संसाराचा गाडा हाकताना डोक्यावर हंडे घेऊन पाणी भरणे असो, किराणा साहित्याचे पॅकिंग असो किंवा घरातील प्रत्येक जबाबदारी हसत स्वीकारणे असो… कोणत्याही कामाची तिने कधी लाज बाळगली नाही.
प्रपंचाला हातभार लावत तिने बी.एड., एम.ए., एम.एड. आणि व्यवस्थापन पदविका पूर्ण केली. आज ती राजूर येथील स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची यशस्वी प्राचार्या म्हणून कार्यरत आहे.
स्वप्नील आणि ऋषीकेश या दोन मुलांवर उत्तम संस्कार करत तिने आईपणही तितक्याच समर्थपणे जपले. गेली ३४ वर्षे संसार करताना अनेक चढ-उतार आले, पण तिच्या जिद्दीने, संयमाने आणि कष्टाने प्रत्येक संकटावर मात केली.
आज अनेक पुरस्कारांनी सन्मानित होत असतानाही तिची पावले अजूनही गोरगरीब मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धावत आहेत. वयाचे अर्धशतक पार करूनही तिची उर्मी, कामावरील निष्ठा आणि समाजासाठीची तळमळ आजही तितकीच प्रेरणादायी आहे.माझ्या भाऊ बहिणी,भाचे नातेवाईक यांना एकत्र ठेवून त्यांची काळजी घेऊन त्यांच्या मनात घर करणारी.....
माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे उभी राहिलेल्या माझ्या सहचारिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुझे आयुष्य निरोगी, आनंदी आणि यशस्वी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंजुषा! 💐
Subscribe to:
Post Comments (Atom)
मजुषा वाढदिवस
सहजीवनाची शिल्पकार प्रेमाचा झरा त्यागाची मूर्ती ममतेची सावली कर्तृत्ववान अर्धांगिनी संघर्षातील दीपस्तंभ आयुष्याची सोनेरी साथ,जीवनाची प्रेरणा...
-
लेख म . टा . वृत्तसेवा , संगमनेर-- सहकार चळवळ ही ग्रामीण विकासाचा कणा आहे.महाराष्ट्र व एकूण देशात ग्रामीण भागात जे परिवर्तन आणि प्...
-
अकोले - भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसर एका बाजूला डोंगरची रांग , दुसऱ्या बाजूने खोलवर दरीतून वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा नदी डोंगराच्या पोट...




No comments:
Post a Comment