Thursday, April 20, 2017

रानमेव्यातून कमाई, पर्यटकांवर मोहिनीही!

रानमेव्यातून कमाई, पर्यटकांवर मोहिनीही!
    म. टा . वृत्तसेवा  डोंगरची काळी मैना बाजारात आली
डोंगरदऱ्यात दडलेला करवंदे, कैऱ्या, आवळे तसेच जांभळांचा रानमेवा गोळा करून आदिवासी मुलांकडून त्याची विक्री होत आहे. डोंगरची मैना काळी मैना दहा   रूपयांना आठवा अशी हाक कानी पडताच हा रान  मेवा खरेदी करण्यासाठी शौकिनांची गर्दी होते.अकोले तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागात उन्हाळ्यात रोजगारासाठी भटकंती सुरू असते. आदिवासी वाडय़ा-पाडय़ातील लहान मुले सुट्टीत खेळण्याचा आनंद लुटण्याऐवजी काटेरी झुडपांमध्ये दडलेले करवंदांचा खजिना धुंडाळण्यात वेळ घालतात. सकाळी सातलाच हातात छोटय़ा टोपल्या घेऊन करवंदे, जांभळे, कैऱ्या, गाळवे वगैरे गोळा करून रस्त्यावर फिरून मोठय़ा आवाजात ओरडून ही मुले या मेव्याची विक्री करतात. अशा प्रकारे दिवसभरात शंभर रूपये कमाई करतात.
राजूर, भंडारदरा, कोतूळ, समशेरपूर, वारुंघुशी आदी भागात सध्या हे चित्र पाहावयास मिळते. संतोष झडे, हौसाबाई , सोमा. पोर्णिमा , भिवा , रखमा परते या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलांनी या विक्रीतून होत असलेल्या फायद्याचा विनियोग आम्ही शिक्षण, कपडे, गणवेश, वह्य़ा-पुस्तके, घरखर्चासाठी करीत असल्याचे सांगितले. पर्यटकांचा या मुलांना चांगला प्रतिसाद मिळतो. मुलांचे धीट बोलणे व दोन-तीन रूपयांत आठवाभर रानमेवा हे शब्द पर्यटकांना मोहिनी घालतात. सुट्टीतल्या आनंदापेक्षा जीवनाला नवा आकार-उकार देण्याचे हे प्रात्यक्षिक जास्त महत्त्वाचे व मोलाचे, तसेच अनुकरणीय असल्याची प्रतिक्रिया चौकस पर्यटक आवर्जून व्यक्त करतात. उन्हातान्हात आदिवासी मुलांची चरितार्थासाठी चाललेली ही पायपीट बरीच काही शिकवणारी असल्याची भावनाही काहीजण बोलून दाखवितात.. तर वृद्ध महिलाही सकाळी ६ वाजल्यापासून करवंदे गोल करण्यासाठी काटेरी जाळीत घुसून  करवंदे गोळा  करतात. भंडारदरा येथील सुमनबाई यशवंत खाडे या महिलेनी आपली  व्यथा मांडताना सांगितले  रोजगार नाही त्यामुळे करवंदे गोळा करून कसेही दिवसभरात  दीडशे रुपये मिळतात त्यातच आपला प्रपंच चालतो . दरवषी पंधरा ते तीन आठवडे सिझन सापडतो त्यात तीन साडे तीन हजार रुपये मिळतात . तर सोमनाथ पथवे या इयत्ता ७  विधार्थ्याने आपण करवंदे विकून शालेय साहित्य घेतो व घरच्यानाही पैसे देऊन प्रपंचाला हाथभार  सांगितले सोबत फोटो करवंदे विकताना सुमनबाई खाडे  या वृद्ध आदिवासी महिला

Monday, April 17, 2017

म . टा . वृत्तसेवा , अकोले -अकोले तालुक्यात शालेय पोषण आहारात सातत्य नसल्यानी जिल्हापरिषद व माध्यमिक शाळांचे धान्य संपले आहे तर आठ महिने उलटून गेले तरी अद्याप भाजीपाला ,ग्यास व स्वयपाक करणाऱ्या महिलांना व कर्मचारी वर्गाला पैसे न मिळाल्यानी शाळा अडचणीत सापडल्या आहेत . यासंदर्भात मुख्याध्यापक संघांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार वजा विनती केली आहे .  सध्या मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत . येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात जूनपासून तरी शालेय पोषण आहाराचे योग्य नियोजन करावे असे पालक वर्गातून मागणी जोर धरू लागली आहे . आदिवासी व अतिदुर्गम भागातील मुला मुलीनी शिक्षणाच्या  प्रवाहात  यावीत म्हणून शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरु केली . मात्र त्यात अनेक अडचणी येत असून प्रभावीपणे हि योजना चालवली जात नसल्याचे चित्र आहे . सध्या येणारे धान्य ,कडधान्य काही प्रमाणत खराब असून मिरची पावडर तर गेली अनेक महिन्यापासून खराब येत आहे मात्र बोलायचे कुणाला आपण बोललो तर आपणच वाईट यामुळे शिक्षक गप्प आहेत त्यात अधिकारी तपासणीला आल्यावर कडक शेरे देणार २ किलो धान्य  कमी आले तर वसुली ठरलेली त्यामुळे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ,मात्र  काही जागृत मुख्याधापक पुढे आले असून त्यांनी शालेय पोषण अधीक्षक यांना याबाबत कळविले आहे . दररोज छोटी शाळा असली तरी १५ ते २० किलो भात शिजवावा लागतो खाजगी स्वयपाक करणारा असेल तर त्याला किलोमागे कमीतकमी २० रुपयेम्हणजे दिवसाला एका वेळी २०० रुपये मजुरी मिळते द् . मात्र ३० रुपये मजुरीने शाळांमध्ये काम करणाऱ्या महिला बचत गटाच्या महिलांना मजुरी मिळते तीही नियमित नाही अलीकडे तर ८ महिन्याची मजुरी शासनाने दिलीच नाही . त्यमुळे मुख्याध्यापक , शिक्षक यांनी वर्गणी काढून पैसे द्यावे लागतात  हि माणसे स्वयपाक करण्यास टाळाटाळ करतात . ग्यास चे तसेच आत्ता ९ टाक्या मिळतात त्य्हि ग्रामीण भागात वेळेवर नाही . कधीकधी जादा पैसे देऊन टाकी घ्यावी लागते . तर लाकडे हि मिळत नाही मिळाले तर ८ रुपये किलो त्याचा वहातुक खर्च वेगळाच ,भाजीपाला मध्यंतरी महाग झाला होता त्यवेळी शिक्षक मंडळींची एकच धावपळ उडाली होती .तरिदेखिल जे अनुदान आहे तेव्हडेच त्यातच भागवा असा शिक्षण खात्याचा फतवा . आज शिक्षक ज्ञान दानाचे काम करण्या पेक्षा भाजीपाला ,ग्यास ,लाकडे ,शोधण्यासाठी धडपडताना दिसत आहे . यासंदर्भात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी शालेय पोषण आहार योजना त्रयस्थ यंत्रणेकडे द्यावी ,येणारे धान्य विशेषता मिरची पावडर खराब असून ८ महिन्यापासून अनुदान नसल्यामुळे आम्ही वर्गणी काढून खर्च भगवतो ,उशिरा पैसे मिळत असल्यानी स्वयपाक करणारे लोक काम करण्यास टाळाटाळ करतात . यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे . यासंदर्भात जिल्हापरिषद व माध्यमिक शिक्षकांचे हेच मत आहे कोट-.डॉ . अजित नवले (माकप )- तालुक्यातील शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिलांना ३० रुपये रोज असून त्यात वाढ करून त्यांना नियमित पगार मिळावा अन्यथा या प्रश्नात लक्ष्य घालून आम्हाला शिक्षण विभागाला व सरकारला जाब विचारावा लागेल याची नोंद घ्यावी
म . टा . वृत्तसेवा , अकोले -लग्न समारंभ, सुपारी, साखरपुडा यासाठी वर्‍हाडी मंडळींना मानपान देऊन आमंत्रण दिले जाते. सध्या लग्नसराई असल्यामुळे वधू - वर पक्षाकडील मंडळी वर्‍हाडींना नेण्यासाठी आलिशान गाड्या कराव्या लागतात. पूर्वी बैलगाडीने वर्‍हाडी मंडळी लग्नकार्यासाठी जात असत. त्यानंतर आधुनिक वाहने बाजारात उपलब्ध झाल्याने बैलगाडी हद्दपार होत आहेत.

पूर्वी जवळपासच्या खेड्यांमध्ये लग्नसमारंभ असेल, तर वर्‍हाडींना बैलगाडीतून नेले जात असे. आता मात्र वेळ वाचावा आणि वर्‍हाडींना रुबाबदार वाहनातून न्यावे, म्हणून ट्रक, टेम्पो, आयशर, बस आदी विविध प्रकारची वाहने उपयोगात आणली जात आहेत. परिणामी आजच्या आधुनिक युगात बैलगाडीतून वर्‍हाड जाणे, जवळपास हद्दपार झाले आहे. ट्रक, टेम्पो यांनाही क्वचित मागणी असते. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्यासुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. सुरक्षेसाठी एसटीचा वापर होत असला, तरी लग्न समारंभासाठी आलिशान गाड्यांनाच पसंती दिली जात आहे. त्यामुळे वर्‍हाडी मंडळींना आलिशान गाड्यांमध्ये मानपान देऊन गाडीत बसविले जाते. आलिशान गाड्या वर्‍हाडींसाठी केल्या, तर त्यामुळे मान, रुबाब आणि समाजात प्रतिष्ठा निर्माण होते. वर्‍हाडी मंडळींना खूष करण्यासाठी अशा प्रकारचे लग्नकार्य करणार्‍यांना नाकीनऊ येत आहे. जवळपास लग्न असेल, तर दुचाकीचा जास्त वापर होतो. तेव्हा आलिशान गाड्यांचा खर्च वाचतो. बहुतेक लोकांकडे दुचाकी, चारचाकी वाहने असल्यामुळे ते स्वखर्चानेच येत असतात. एकूण काय, तर आजच्या आधुनिक युगात बैलगाडीतून वर्‍हाड जाणे, जवळपास हद्दपार झाले आहे.

राजूर येथील देशमुख वाडी येथे नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी आज तेथील ग्रामस्थांनी राजूर ग्रामपंचायत ला टाळे ठोकले

राजूर , ता . १७ : राजूर येथील देशमुख वाडी येथे नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी आज तेथील  ग्रामस्थांनी राजूर ग्रामपंचायत ला टाळे ठोकले .राजूर
येथे आदिवासी वस्ती असलेल्या देशमुख वाडी स महिन्यातुन् एकदा किवां दोनदा पाणी येते तसेच भरमसाठ पाणी पट्टी आकारून देखील येथील नागरिकांना
पाण्यासाठी वणवण फिरण्याची पाळी  येत असल्याने तसेच ऐन उन्हाळ्यात विहिरीचे अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने आज तेथील नागरिकांनी व महिलांनी १२ एप्रिलला निवेदन देऊन  ठरल्या प्रमाणे ग्रामपंचायत राजूर कार्यालयास टाळे ठोकले .  टाळे  ठोकण्यापूर्वी उपसरपंच गोकुळ कानकाटे व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी . टी . लावरे यांनी तीन दिवसात पाणी देतो व तोपर्यंत प्रभाग निहाय ट्यांकर ने पाणी देऊ मात्र ग्रामसेवक 
नेताजी भाबड उपस्थित नसल्याने काहीसे तणाव पूर्ण वातवरण तयार झाले होते . सरपंच व ग्रामसेवक दोन्ही उपस्थित नसल्याने नागरिकांच्या रोषास उपसरपंच
गोकुळ कानकाटे यांना सामोरे जावे लागले . आंदोलन कर्त्यांनी उपसरपंच गोकुळ कानकाटे यांच्या कडे लेखी आश्वासन ची मागणी करताच त्यांनी त्यास नकार
दिल्याने सामाजिक कार्यकर्ते विनय सावंत व त्यांच्या मध्ये शाब्दिक बाचाबाची झाली . यावेळी राजूर गटातील जि . प . सदस्या सुनीताताई भांगरे यांनी टाळे ठोकण्याचा
निर्णय घेत विविध घोषणांनी राजूर ग्रामपंचायत चा निषेद नोंदवला . यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि गेली ४० वर्ष राजूर मधील नागरिकांना त्यांच्या मुलभूत  सुख सुविधान
पासून वंचित ठेवण्यात आले असून आज हि पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे . वारंवार निवेदन देवूनही हि राजूर ग्रामपंचायत गांभीर्य पूर्वक घेत नाही उपसरपंच
निवेदन न घेता राजकारणाच्या भाषा बोलतात तर पेसा अंतगत आलेला पाणी योजनेचा निधी इतरत्र वळविला जात असून ग्रामपंचायत सदस्य च ठेकेदारी करीत आहे . त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहे . दोन दिवसात देशमुख वाडी सह राजूर च्या नागरिकांना पाणी दिले नाही तर टिकुरे
मोर्चा काढण्यात येईल . दारूचे हफ्ते घेता मंग पाण्याचे काय असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला . राजूर च्या ग्रामसेवकास दप्तर्र लिखाण येत नसून तो आदिवासी
नागरिकांना अरे रवि करतो त्यामुळे त्याची बदली झाली पाहिजे . व मागील १० वर्ष चे लेखापरीक्षण झाले पाहिजे . यावेळी विनय सावंत म्हणाले कि ४० वर्ष
राज्य केले कोणाचा विकास केला , तुम्हाला साधे लोकांना पाणी देता येत नाही तुम्ही कसले राज्यकर्ते .दारू बरोबर आता पाणी सुद्धा विकणे सुरु झाले आहे . भाबड नावाचा
माणूस राजूर वर राज्य करू पाहत आहे . सर्व खोटे नाटे जिरवण्यासाठी भाबड नावाचा ग्रामसेवक हाताशी धरला आहे . एक हाती सत्ता ठेऊन हुकुमशाही पद्धतीने सध्या
कारभार सुरु आहे . दर वर्षी ८ लाख रुपये येतात त्याचा हिशोब कोण देयील अशा प्रश्न त्यांनी उपस्थित केला . यावेळी जि . प . सदस्य किरण लहामटे म्हाणाले
कि एक वर्षापूर्वी दिलेल्या अश्वशाना चे काय . २४ तास पाणी देणारे आज कोठे आहे . मासिक मिटिंग वेळेवर होत नाही , समित्या स्थापन झाल्या नाही आधी प्रश्न
उपस्थित करून प्रकल्प कार्यालयात तून पाण्याच्या नावाखाली किती बिले काढली असे ते म्हणाले .यावेळी  बहुसंख्य देशमुख वाडी , राजूर ग्रामस्थ ,उपस्थित होते , संतोष मृतड्क , काशिनाथ भडांगे , रामदास पवार , पंचायत समिती सदस्य दत्तात्रय देशमुख ग्रामपंचायत सदस्य , अतुल देशमुख , सौ .कुसुम  रावते, सौ . पुष्पा लहामटे , सौ वनिता देशमुख , सौ . विमल भडांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या  चौकट ---पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी . टी . लावरे यांनी दोन ते तीन दिवसात नळपाणीपुरवठा सुरळीत होईल तसेच तोपर्यंत प्रभाग निहाय टँकर ने पाणी वाटप करण्यात येईल देशमुख वाडीला तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणा राबवली जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तीन तासाने थम्बविण्यात आले आहे सोबत फोटो -rju १७प १,२,३ ४,५,६



mahsul















बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...