Sunday, April 2, 2017

शहापूर-घाटघर रस्त्याचे २००१

म . टा. वृत्तसेवा ,अकोले- ठाणे व अहमदनगर जिल्ह्याला जोडणार्‍या शहापूर-घाटघर रस्त्याचे २००१ मध्ये सर्वेक्ष्ण होऊन ही गेली १५ वर्षे हा रास्ता रखडला आहे . लालफीत च्या कारभारात अडकलेल्या या रस्त्याचे पुन :सर्व्हेसाठी  तसेच शासनस्तरावरील विविध परवानग्यासाठी२०१६-१७या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे . त्यामुळे या कामाला वेग येणार आहे व अकोले मुंबई अंतरी कमी होणार आहे . या रस्त्यासाठी जमीन संपादन व सर्वेषणाचेकाम लवकरच हाती घेण्यात येणार आहे . मुबई- नाशिक महामार्गावरुण घोटी - भंडारदरा मार्गे जाणार्‍या रस्त्याऐवजी  हा रास्ता अस्तित्वात आल्यासनगर जिल्ह्यात जाण्यासाठि ४४ किलोमीटर अंतर कमी होणार आहे शिवाय वेळेचीही बचत होणार आहे .अकोले, राजुर ,भंडारदरा , घाट घर कोकण कड्यावरून चोंढे घाटातून  शहापूर तालुक्यातील डोळखांब ,तळवाडे, मेट, व हिंगळून गावांच्या हद्दीतून जाणारा हा रस्ता थेट मूबईकडे जाणार आहे .आमदार किसन कथोरे, प्रकाश भोईऱयांनी २०१३ च्या विधिमंडळ अधिवेशनात या रस्त्याची मागणी धरली होती आमदार पांडुरंग बरोरा व सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी याबाबत पाठ पुरावा केला असून आघाडी सरकारच्या काळात  माजी मंत्री मधुकर पिचड , आमदार वैभव पिचड यांनी पाठ पुरावा केला होता तर युतीचे सरकार आल्यानंतर भाजपचे अशोक भांगरे जालिंदर वाक्चौरे , सीताराम भांगरे डॉक्टर किरण यांनीही या कामाला पाठबळ दिल्याचे समजते. ठाणे जिल्ह्यातील शहापूरव नगर जिल्ह्यातील अकोले हे दोन्ही तालुके आदिवासी उपयोजनेत येत असल्यामुळे आदिवासी विकास खात्याकडून या रस्त्यासाठी निधीची मागणी करण्यात येत होती . या घाटमार्ग रस्त्यामुळे दोन्ही तालुके जोडली जाणार असून कसारा व माळंशेजघाटात होणारी व्हातुकीची कोंडी या रस्त्यामुळे व पर्यायी मार्गामुळे दूर होणार आहे . तर ठाणे व नगर या दोन्ही जिल्ह्याचे दळ्ंन वळण, व्यापार व्यवसायच्या देवाण घेवाणीने एकत्र येऊ शकणार आहे . रस्ता न झाल्याने शहापूरचा डोळखांब परिसर तसेच नगरचा अकोले तालुका विकासापासून वंचित राहिला आहे . मात्र या मार्गामुळे शहापूर चे चोंढे धरण , २५० मेगा वोट चा वीज प्रकल्प त्याला लागूनच तालुक्यातील घाटघ्रर , भंडारदरा , रंधा,रतन वाडी , कळसूबाई ,शिखरामुळे पर्यट्न विकासाला संधी मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराला संधी मिळणार आहे . आदिवासी तरुण आज ही  रोजगारासाठी नारायणगाव , नाशिक , जुन्नर , ठाणे या भगत जातात मात्र हा रस्ता झाला तर भविषात रोजगाराच्या संधी इथे उपलब्ध होणार आहेत कोट - आमदारा किसन कथोरे- ठाणे व नगर जिल्ह्याला जोडणारा शहापूर चोढे - घाटघर हा रस्ता मार्गी लागला असून सर्वेक्षणासाठी ५० लाख रुपयाची तरतूद अर्थ संकल्पात करण्यात आली आहे . या रस्त्यामुळे गेली १५ वर्षापूर्वीची मागणी सरकारने पूर्ण केली आहे या कामासाठी सततचा पाठपुरावा कामी आला       अशोक भांगरे (भाजपचे जेष्ठ नेते )चोढे - घाट घर रस्ता होण्यासाठी गेली अनेक वर्षे या भागातील जनतेची मागणी होती  तत्कालीन कार्यकारी अभियंता हि. ता. मेंढीगिरी यांनीही सरकार दरबारी पाठपुरावा केला होता . ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे व नगरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या कामात मदत केली .भंडारदरा घाटघर येथील पर्यट्न वाढून रोजगार निर्मिती होईल .दिनेश महाजन (कार्यकारी अभियंता , बांधकाम विभाग २-ठाणे )- शासनाने चोंढे - घाट्घर रस्त्याचे पुन:सर्वेक्ष्ण करण्यासाठी ५० लाख रुपयाची तरतूद केली असून विविध परवानगी व सर्वेक्षन कामास पाऊस संपल्यानंतर वेगाने प्रारंभ होईल .  हा रस्ता होण्यासाठी सर्वच स्थरातून प्रयत्न  होत असून आमचा विभाग हि  याबाबत मागे नाही.   
धोंडीबा सोंगाळ(चोंढे - घाट घर कृती समिति अध्यक्ष )गेली १५ वर्षे रस्ता होण्यासाठी आंदोलन केली मात्र भाजप सरकारने या रस्त्याच्या कामाला  सुरुवात केली . हे आमच्या आदिवासी समाजाचे भाग्य आहे. 
Attachments area

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...