Sunday, April 2, 2017

निळवंडे धरणाचे आदर्श पुनर्वसन

  राजूर (वार्ताहर ) निळवंडे धरणाचे आदर्श पुनर्वसन या योजनेखाली निळवंडे धरण्याच्या मागील बाजूस पिंपरकणे येथे ३० कोटी ७० लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम निधीअभावी मागील आठ वर्षांपासून बंद आहे. १९ फेब्रुवारी २००८ मध्ये राज्याचे तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन होऊन कामास सुरुवात झाली होती. या आठ वर्षांत केवळ १२ पिलर उभे करण्यात आले आहेत; मात्र, रखडलेल्या पुलाच्या कामामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून बोटीतून प्रवास करावा लागत आहे. १५ गावांच्या दळणवळणाच्या दृष्टीने सोयीच्या असलेल्या या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.जिल्हा परिषद सदस्य डॉ . किरण  लहामटे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून निळवंडे पुलासाठी निधी देऊन हे काम तातडीने  मागणी करताना स्थानिक आमदार या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य करीत असल्याचा  आरोप केला आहे 
जवळपास १५ गावांचे दळणवळण पुलाच्या रखडलेल्या कामामुळे बंद पडून आदिवासी जनतेला व प्रकल्पग्रस्तांना जीव मुठीत घेऊन होडीने प्रवास करावा लागत आहे. त्या परिसरातील १५ गावांनी आपले व्यवहार बंद करून नाशिक जिल्ह्यातील घोटी व अकोले येथे व्यवहार सुरू केल्याने राजूर बाजारपेठ बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या पुलाच्या भूमिपूजनानंतर निळवंडे धरण पूर्ण होण्यापूर्वी हा पूल करण्यात येईल, असे आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मात्र, या पुलाचे काम रखडले त्यातच आता धरणाचे काम पूर्ण होऊन त्यात पाणी साठविण्यात आल्याने राजूर गावाशी असणारा १५ गावांचा संपर्क तुटला आहे. हा संपर्क सुरळीत राहावा यासाठी हा पूर होणे आवश्यक आहे.
समुद्र अगर खाडीतून जाणारे पूल असले तरी थेट धरणाच्या जलाशयातून जाणाऱ्या एकमेव व पहिल्याच ५६० मीटर लांबीच्या या पुलाची नदी तलांकापासूनची जास्तीतजास्त उंची ६२.४५ मीटर आहे. पुलास १४० मीटर लांबीचे चार गाळे असतील, पुलाची रुंदी दहा मीटर आहे. साडेसात मीटर रुंदीच्या पुलास एका बाजूने अडीच मीटर रुंदीचा खास पादचारी मार्ग ठेवण्यात येणार आहे. पुलाच्या बांधकामाचा प्रकार बॉक्स गर्डर ईन ब्यालंस फ्या नटीलिव्हर टाईप प्री टेस्ड कॉक्रिट या स्वरूपाचा आहे. धरणाच्या पाण्यावरून जाणारा हा अर्धा किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा पूल तालुक्यात येणाऱ्या हजारो पर्यटकांचे खास आकर्षण ठरणार आहे. धरण जलाशयात बुडीत होणाऱ्या रस्त्यामुळे पिंपरकणे, टिटवी, बाभूळ वंडी, शेलविहिरे, लाडगाव, देवगाव, आंबे वंगण, पिंपळगाव नाकविंदे, दिगंबर, शेरन खेल, पागीरवाडी, खिरविरे, एकदरा, डोंगरवाडी, ठाकरवाडी आदी आदिवासी गावांचा राजूर मुख्य बाजारपेठेशी खंडित होणारा संपर्क या पुलामुळे सुरू राहू शकणार आहे. या भागातील वीस हजार लोकांचा त्यामुळे लाभ होणार आहे. धरण जलाशयावर होणारा राज्यातील हा पहिलाच पूल त्यामुळे साहजिकच पर्यटकांचे खास आकर्षण व येथील भूमिपुत्रांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत; सध्या या पुलाचे केवळ १२ मोठे पिलर उभे असून निधीअभावी काम बंद आहे. त्यामुळे १५ गावातील, ग्रामस्थांना शालेय विद्यार्थ्यांना होडीने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीतीही प्रकल्पग्रस्त तसेच ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत असून या पुलाचे काम जलद गतीने होणे आवश्यक आहे. शिताराम भांगरे (तालुका अध्यक्ष भाजप )- आधी पुनर्वसन  धरण हि वल्गना करणाऱ्या आघाडी सरकारने व त्यांच्या लोक प्रतिनिधींनी जाणीवपूर्वक हा पूल रखड विल असून लवकरच हा निधी आणून पुलाचे काम सुरु करू
2 Attachments

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...