Sunday, April 2, 2017

घाटघर परिसरात पानघार

अकोले : घाटघर परिसरात पानघार .  , दलदल ससाणा , देव ससाणा  असा वेग वेगळ्या नावाने ओळखला जाणारा शिकारी पक्षी आढळला असून दिवाळीच्या सुट्टीत पक्षी प्रेमी व अभ्यासक या भागात आले असताना त्यांनी निरीक्षण करून या शिकारी पक्षांचा शोध लावला आहे हे ससाणा पक्षी दोन प्रकारचे असून एक दलदल ससाणा व दुसरा देव ससाणा आहे .हा पक्षी शक्यतो समुद्री भागात आढळतो   याबाबत सकाळशी बोलताना किशोर जोशी म्हणाले  ससाणा दोन प्रजातीचा असून एक जात सतत स्थलांतरीत असते तर दुसरी एकाच ठिकाणी वास्तव्यास असते . हि जात आफ्रिका देशाता अ धिक असून व भारताच्या पश्चिमेकडील समुद्रावर आढळतो . तपकिरी पिवळसर रंगाच्या या ससाण्याचा आकार १७ ते २१ इंच असतो तर वजन ४०० ते ८०० इंच असते त्याच्या पंखाचा आवाका व आकार ४५ ते ५१ इंच असते . भारदस्त असा हा पक्षी असून अनुकुचीदार आकड यासारखी चोच व पिवळसर भेदक  डोळे असतात हा पक्षी समुद्रावर झेप घेताच पाण्यातील पक्षी भयभीत होतात व पण पक्ष्यांची पळापळ होते . उडणाऱ्या पक्षांची शिकार करण्यात हा पक्षी पटाईत  असतो त्यामुळेच त्याला शिकारी पक्षी म्हटले जाते . सरडा , बेडूक , मासे . छोटे पक्षी हे त्याचे प्रमुख अन्न आहे . हिमालयातही तो समुद्रसपाटीपासून सु. २,५०० मी. उंचीपर्यंत आढळतो. नेपाळ, बांगला देश, पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार या देशांतही हा पक्षी आढळतो  चोच आकडीसारखी आणि काळी असते. नर व मादी दलदल ससाणा पक्ष्यात फारसा फरक नसतो . मादीचा रंग गडद तपकिरी असतो . तर वजन हि अधिक असते . प्रजनन काळा अगोदर पाणथळ जागेत हा पक्षी झाडा झुडपात हपक्षी आपले घरटे बनवतो . गवतापासून बनविलेल्या घरट्यात किमान तीन ते आठ अंडे हि मादी घालते . ३० ते ३५ दिवस अंडी उबवील्या नंतर हि  बाहेर येतात व महिनाभरात उडण्यास सक्षम होतात . काही वर्षापूर्वी या पक्ष्याची संख्या फार कमी होते त्याचे कारण विविध रसायने , शिकार , प्रदूषण प्रजननाच्या वेळी होणारा उपद्रव या मुले संख्या घटली होती मात्र अलीकडेही संख्या वाढली असून तिचे संवर्धन होणे आवश्यक आहे .  अभयारण्य व घाटघर परिसरात हा दलदल ससाणा वास्तव्यास असून वनविभागाने त्याची काळजी घेणे आवश्यक आहे . असेही पक्षी मित्र किशोर जोशी म्हणाले . फोटो rju १९p ३,४ घाटघर परिसरात दलदल ससाणा पक्षी मित्रांना आढळून आला त्याचे छायाचित्र किशोर जोशी यांनीच टिपले आहे .

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...