Sunday, April 2, 2017

प्रति, १) प्रा. बाळासाहेब मेहेत्रे २) शांताराम काळे

दि. ३ नोव्हेंबर २०१५

प्रति,
१) प्रा. बाळासाहेब मेहेत्रे
२) शांताराम काळे

स. न.

आज दि. ३ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी १०.३० वाजता सकाळच्या नगर कार्यालयात
तुम्ही दोघांसह मी स्वतः, घनश्याम घाणेकर, दीपक देशमुख, संजय चिकटे,
विठ्ठल लांडगे व सुहास देशपांडे अशी सर्वांची बैठक झाली. तीमध्ये
शांताराम काळे यांनी राजूर डेटलाईनने काम करावयाचे व प्रा. बाळासाहेब
मेहेत्रे यांनी अगस्तीनगर डेटलाईनने काम करावयाचे असे ठरले आहे. एक
जानेवारी २०१६ पासून मेहेत्रे यांची डेटलाईन अकोले करण्यात येईल, असाही
निर्णय या बैठकीत झाला आहे.

त्यामुळे तुम्हा दोघांच्या कामांमध्ये संवाद व सुसूत्रता राहावी यासाठी
तुम्ही दोघांना आजपासून खालीलप्रमाणे क्षेत्र विभागून देण्यात येत असून,
त्यानुसार चांगले व सकस वार्तांकन तसेच व्यवसाय व वितरणवृद्धी करावी.

१) प्रा. बाळासाहेब मेहेत्रे - अकोले तालुक्याचा पूर्व भाग. त्यामध्ये
निळवंडेपासून कळसपर्यंतचा परिसर. आढळा, कोतुळ, फोफसंडी, ब्राम्हणवाडा व
त्याअनुषंगाने येणारा परिसर.
२) शांताराम काळे - अकोले तालुक्याचा पश्चिम भाग. त्यामध्ये भंडारदरा,
कळसुबाई, हरिश्चंद्रगड व त्याअनुषांगाने येणारा परिसर.

आपला,

अँड. बाळ ज. बोठे पाटील,
निवासी संपादक,
नगर

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...