Monday, April 17, 2017

म . टा . वृत्तसेवा , अकोले -लग्न समारंभ, सुपारी, साखरपुडा यासाठी वर्‍हाडी मंडळींना मानपान देऊन आमंत्रण दिले जाते. सध्या लग्नसराई असल्यामुळे वधू - वर पक्षाकडील मंडळी वर्‍हाडींना नेण्यासाठी आलिशान गाड्या कराव्या लागतात. पूर्वी बैलगाडीने वर्‍हाडी मंडळी लग्नकार्यासाठी जात असत. त्यानंतर आधुनिक वाहने बाजारात उपलब्ध झाल्याने बैलगाडी हद्दपार होत आहेत.

पूर्वी जवळपासच्या खेड्यांमध्ये लग्नसमारंभ असेल, तर वर्‍हाडींना बैलगाडीतून नेले जात असे. आता मात्र वेळ वाचावा आणि वर्‍हाडींना रुबाबदार वाहनातून न्यावे, म्हणून ट्रक, टेम्पो, आयशर, बस आदी विविध प्रकारची वाहने उपयोगात आणली जात आहेत. परिणामी आजच्या आधुनिक युगात बैलगाडीतून वर्‍हाड जाणे, जवळपास हद्दपार झाले आहे. ट्रक, टेम्पो यांनाही क्वचित मागणी असते. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्यासुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. सुरक्षेसाठी एसटीचा वापर होत असला, तरी लग्न समारंभासाठी आलिशान गाड्यांनाच पसंती दिली जात आहे. त्यामुळे वर्‍हाडी मंडळींना आलिशान गाड्यांमध्ये मानपान देऊन गाडीत बसविले जाते. आलिशान गाड्या वर्‍हाडींसाठी केल्या, तर त्यामुळे मान, रुबाब आणि समाजात प्रतिष्ठा निर्माण होते. वर्‍हाडी मंडळींना खूष करण्यासाठी अशा प्रकारचे लग्नकार्य करणार्‍यांना नाकीनऊ येत आहे. जवळपास लग्न असेल, तर दुचाकीचा जास्त वापर होतो. तेव्हा आलिशान गाड्यांचा खर्च वाचतो. बहुतेक लोकांकडे दुचाकी, चारचाकी वाहने असल्यामुळे ते स्वखर्चानेच येत असतात. एकूण काय, तर आजच्या आधुनिक युगात बैलगाडीतून वर्‍हाड जाणे, जवळपास हद्दपार झाले आहे.

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...