Sunday, April 2, 2017

कृष्णावंती विश्राम ग्रह बांधले या विश्राम गृहासाठी

म. टा. वृत्त सेवा ,अकोले  -एकेकाळी मंत्री , राज्यपाल , अधिकारी , पुढारी यांचा ज्या वास्तूत राबता असायचा तीच" कृष्ण्वंती "आता शेवटच्या घटका मोजताना दिसत आहे . जलसंपदाविभागाला मात्र आपल्याला काय त्याचे या  भूमिकेतून  पाहावे लागते हे दुर्दव्य म्हणावे लागेल . घाटघर- भंडारदरा  जल विधुतप्रकल्पाचे काम सुरु असताना तत्कालीन कार्यकारी अभियंता हि . ता. मेंढी गिरी यांनी भंडारदरा जलाशायाच्या अगदी समोर जागा  शोधून सुंदर असे   कृष्णावंती विश्राम ग्रह बांधले या विश्राम गृहासाठी कुशल कारागिरी बोलावून उत्कृष्ट अशी वास्तू उभारण्यात आली मात्र गेली ५ वर्षापासून या विश्राम ग्रहाची दुर्दशा पहावयास मिळत असून कचरा , दुर्गंधी , पडझड , सभोवती काटेरी जाळ्या, झुडपे वाढले असून जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी इकडे फिरकताना दिसत नाही लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या वा स्तूला ग्रहण लागले असून फार काळ हि वास्तू पडून राहिली व तिची दुरुस्ती झाली नाही तर ज लसंपदा विभागाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .घाटघर जल विधुत प्रकल्पाने हि वास्तू पाटबंधारे विभाग नगर यांचेकडे हस्तांतरित केली असून निधी नसल्याने या वास्तूकडेअधिकारी व कर्मचारी साधे ढूकुनही पहात नाही  याबाबत संबधित स्थानिक  अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही . विश्राम गृहातील सोफे , फर्निचर , पंखे , खिडक्यांची तावदाने , दरवाजे खराब झाले असून काही वस्तू गायबहीझाल्या आहेत , पाटबंधारे विभाग भंडारदरा यांचेकडे कुशल व अकुशल असे सुमारे शंभर कर्मचारी असताना या वास्तूचे देखभालीकडे दुर्लक्ष्य आहे  . महाराष्ट्र राज्य पर्यटनविकास महामंडळ यांनी हि वास्तू मागितली होती .त्यामुळे विविध  ठिकाणाहून येणाऱ्या पर्यटकांची सोय होणार होती . व सरकारला महसूलही मिळणार होता  मात्र जलसंपदा विभागाच्या सचिवानी या बाबत नकार दिला असल्याचे वृत्त आहे .कृष्णवंती  विश्रामग्रह हे  महाराष्ट्रातील सर्व विभागाच्या सचिवांचे आवडते ठिकाण तर मंत्री हि या ठिकाणी  राहण्यासाठी पसंती द्यायचे  विविध  लेखक , कवी ,न्यायधीश , चित्रपट निर्माते , गायक ,कुसुमाग्रज , राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , भाजपचे राष्ट्रीय नेते लालकृष्ण आडवाणी, तत्कालीन मुखमंत्री मनोहर जोशी , विलासराव देशमुख उपमुख्यमंत्री अजित पवार , आर . आर पाटील , पदमसिह पाटील , मधुकर पिचड , दिलीप वळसे , सत्तधारी शिवसेना भाजपचे जेष्ठ नेते आदी या विश्राम ग्रहावर येऊन गेले येथील सुग्रास जेवण व विश्राम ग्रहाचा परिसर पाहून सर्वच जन खुश होत असे येथील स्वयंपाकी बापू आनंद त्यामुळे सर्वांचा परिचित झाला होता .   ज्या विश्रामग्रह ने सर्वांची सेवा केली त्याची दुरवस्था होऊनही याकडे कुणाचेही लक्ष्य नाही हे आश्चर्य म्हणावे लागेल . सध्या या वास्तूत उंदीर , मांजर , कुत्रे , मुंगळे ,साप यांचा वावर असून लाखो रुपये खर्च करून उभारलेली वास्तूअसेच दुर्लक्ष्य राहिले तर काळाच्या पडद्याआड जाईल हे निश्चित .
कोट -किरण देशमुख (कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग , नगर )कृष्णवंती विश्रामग्रह हे आमच्या विभागाकडे वर्ग केले असले तरी त्याची दुरुस्ती व नुतनीकर णकरण्यास निधी उपलब्ध नसल्याने दुरुस्ती किवा नुतनीकर ण करणे अवघड आहे . मात्र याबाबत आम्ही लवकरच शासनाकडे व जलसंपदा  विभागाकडे प्रस्ताव पाठविणार आहोत .
अशोक भांगरे -(भाजपचे जेष्ठ नेते )कृष्णवंती विश्राम ग्रह हे भंडारदरा परिसराचे भूषण होते त्याचे नुतनीकर ण  होऊन हि वास्तू पुन्हा पूर्ववत व्हावी यासाठी जलसंपदा मंत्री यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावू अथवा प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांचेकडे वर्ग करण्यासाठी पाठपुरावा करू . बी . डी , जगताप (व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ )-तत्कालीन जलसंपदा सचिव मालिनी शंकर या भंडारदरा येथे आल्या असताना कृष्णवंती बाबत चर्चा झाली मात्र पर्यटन महामंडळाला देण्यापेक्षा आपला विभागच त्याचे नुतनीकर ण करून का वापरत नाही . असे मत व्यक्त झाले त्यामुळे हा प्रस्ताव बारगळला . तसे झाले असते तर पर्यटकांची सोय व म्हसुल हि मिळाला असता . सोबत - कृष्णवंती विश्रामग्रह याची झालेली दुरवस्था . छाया शांताराम काळे .
Attachments area

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...