Sunday, April 2, 2017

भंडारदरा विश्रामगृहाच्या डागडुजी कामाला सुरुवात झाली आहे . मात्र तात्पुरती मलम पट्टी करण्यापेक्षा कायस्वरूपी वास्तूची निर्मिती व्हावी अशी मागणी जोर

राजूर , ता . २:भंडारदरा येथील पाटबंधारे विभागाचे विश्राम ग्रह मोडकळीस आले असून उत्तर नगर जिल्ह्याला जीवन दायी ठरलेल्या भंडारदरा धरणाची व विश्राम ग्रहाची एकच अवस्था झाली आहे . कृष्णवंती विश्राम गृह व भंडारदरा धरणावरील क्लास वन विश्राम गृह आत्ता क्लास नसलेले ठरू लागले आहे खाजगीकरणातून हे विश्राम गृह दिल्यास चांगले होईल अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटू लागली आहे .राज्य ,जिल्हा , स्थानिक पुढाऱ्यांचे पाहुणे आणि कार्यकर्त्यांचे आश्रयस्थान ठरलेली जलसंपदा विभागाची विश्रामगृहे नोंदणीकृत होणार आहेत. त्यांच्या नोंदी कार्यालयीन रजिस्टरला घेऊन त्यांची डागडुजी करण्यात यावी आणि तेथे राहणाऱ्यांकडून भाडे वसूल करावे, असा आदेश सरकारने दिला आहे.त्या प्रमाणे भंडारदरा विश्रामगृहाच्या डागडुजी  कामाला    सुरुवात झाली आहे . मात्र तात्पुरती मलम पट्टी करण्यापेक्षा कायस्वरूपी वास्तूची निर्मिती व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे . याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचेकडे प्रस्ताव देण्यात आल्याचे समजते

जलसंपदा विभागामार्फत (पूर्वीचे इरिगेशन डिपार्टमेंट) धरणांची अगर बंधाऱ्यांची कामे सुरू असताना तेथे भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांची तात्पुरती सोय व्हावी, यासाठी विश्रामगृहे बांधली गेली. सरकारी जागेत, सरकारी खर्चाने या इमारती उभ्या राहिल्या. मात्र, त्यांची कार्यालयीन रजिस्टरमध्ये नोंद नाही. त्यामुळे त्यांची दुरुस्ती-देखभालीची थेट जबाबदारी त्या कार्यालय प्रमुखावर येत नव्हती. पूर्वी बांधलेल्या अनेक विश्रामगृहांची अवस्था बिकट आहे. त्यातील काही विश्रामगृहे मोक्याच्या जागी आहेत. पर्यटनस्थळांच्या जवळ असलेली ही विश्रामगृहे योग्य पद्धतीने चालविली तर सरकारला उत्पन्नही मिळू शकते. मात्र, हा विषय सतत दुर्लक्षित राहिला. शहरातील विश्रामगृहात काही नियम पाळले जातात. मात्र, ग्रामीण भागातील विश्रामगृहे त्या भागातील अधिकारी व पुढारी यांच्या ताब्यात असल्यासारखे चित्र आहे. त्यातील एक सूट कायमस्वरूपी मंत्र्यांच्या नावाने राखून ठेवलेला असतो. पुढाऱ्यांचे कार्यकर्ते आणि पाहुणे यांचाच तेथे वावर असतो.पाटबंधारे विभागाने हि विश्राम गृह  दुर्लक्षित ठेवली आहेत तालुका ,जिल्हा ,राज्यस्तरीय अधिकारी  अल्प दारात या विश्राम ग्रहांचाफायदा   घेतात परिणामी सामान्य व पर्यटन  प्रेमी लोकांना हे विश्राम ग्रह उपलब्ध होत नाही . पाटबंधारे विभागाचे काही कर्मचारी वरीष्ठ अधिकर्य्नच्य संमतीने आपला व्यवसाय करीत आहे .तुम्हाला  हे शासकीय विश्राम गृह मिळून देतो असे सांगून पर्यटकांची लुट करीत असल्याच्या तक्रारी बाहेर आल्या आहेत यापरिसरातील पाटबंधारे ,वनखाते व घाटघर येथील वीज प्रकल्पाचे विश्राम ग्रह योग्य भाडे तत्वावर दिल्यास शासनास लाखो   रुपयाचा महसूल मिळेल

आता मात्र, जलंसंपदा  विभागाने आपल्या या मालमत्तेकडे लक्ष द्यायचे ठरविले आहे. राज्यातील सर्व विभागांनी आपल्या हद्दीतील विश्रामगृहातील  कार्यालयीन रजिष्टरला नोंद घ्यावी, त्यांची डागजुडी करावी, त्यासाठी उपलब्ध अनुदानातून निधी उपलब्ध करून द्यावा, तेथे राहण्यासाठी आरक्षण पद्धतीचे काटेकोर अवलंब करून बांधकाम खात्याच्या विश्रामगृहाप्रमाणेच येथे राहणाऱ्यांकडून भाडे आकारावे असा आदेश देण्यात आला आहे.मात्र शासनाचा आदेश असूनही कृष्णवंती विश्राम गृहावर राहणारे कर्मचारी दुपारी दोन नंतर गायब होतात त्यांच्यावर कुणाचाही अंकुश दिसत नसल्याचे चित्र समोर आले आहे . तत्कालीन कार्यकारी अभियंता व सेवानिवृत्त जलसंपदा सचिव हि . ता . मेंढी गिरी यांनी कृष्णवांती विश्राम गृह थ्री स्टार बनविले होते परंतु घाटघर भंडारदरा वीज प्रकल्प विभागाकडून हे विश्राम गृह पाटबंधारे विभागाकडे वर्ग केल्यानंतर या वास्तुची रया गेली आहे . हे विश्राम गृहा बाहेरील झाडे , हिरवळ ,आतील बैठक व्यवस्था मोडकळीस आली आहे . तर सर्व दूर घाणीचे साम्राज्य पसरले आहे . पाला पाचोळा ढीगभर सर्वत्र पसरला असून बागेतील झाडे जाळून गेली आहेत . विजेची उपकरणे ,दूरध्वनी बंद असून विश्राम गृहात उभट वास येत असल्याचे चित्र आहे . यापेक्षा वेगळी स्थिती क्लास वन विश्राम गृहाची नाही .तर सेकंड क्लास व पारिजात हे विश्राम गृह अडगळीत पडले असून त्यांचे गोडाऊन झाली आहेत .कोट - दिलीप भांगरे (माजी पंचायतसमिती सदस्य)- सरकारी अधिकारी निधीचे कारण पुढे करून या सुंदर वस्तूचे जतन करण्यास कमी पडत आहे . केवळ निधी नाही म्हणून या वास्तू धूळ खात पडून देणे कितपत योग्य आहे . .पालकमंत्री यांचे याभागात कायम दौरे असतात मात्र एकही अधिकारी  त्य च्या कानावर हि गोष्ट घालीत नाही . त्यामुळे विश्राम ग्रहांना ग्रहण लागले असूनकायस्वरूपी  वास्तू  व्हावी म्हणून जलसंपदा विभागाकडे मागणी केली असून शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे .कोट - जी . जी . थोरात (उप अभियंता , जलसंपदा विभाग , अकोले )- पावसाळ्यापूर्वी क्लास वन बंगल्याची डागडुजी करण्याचे काम सुरु केले आहे . संपूर्ण छत पडल्याने त्यावर पत्रे टाकून दुरुस्ती करीत आहोत याबाबत जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहे . (सोबत विश्राम गृहाचे फोटो पाठवीत आहे )rju २p १ , २

संलग्‍नके क्षेत्र

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...