Monday, April 17, 2017

राजूर येथील देशमुख वाडी येथे नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी आज तेथील ग्रामस्थांनी राजूर ग्रामपंचायत ला टाळे ठोकले

राजूर , ता . १७ : राजूर येथील देशमुख वाडी येथे नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी आज तेथील  ग्रामस्थांनी राजूर ग्रामपंचायत ला टाळे ठोकले .राजूर
येथे आदिवासी वस्ती असलेल्या देशमुख वाडी स महिन्यातुन् एकदा किवां दोनदा पाणी येते तसेच भरमसाठ पाणी पट्टी आकारून देखील येथील नागरिकांना
पाण्यासाठी वणवण फिरण्याची पाळी  येत असल्याने तसेच ऐन उन्हाळ्यात विहिरीचे अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने आज तेथील नागरिकांनी व महिलांनी १२ एप्रिलला निवेदन देऊन  ठरल्या प्रमाणे ग्रामपंचायत राजूर कार्यालयास टाळे ठोकले .  टाळे  ठोकण्यापूर्वी उपसरपंच गोकुळ कानकाटे व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी . टी . लावरे यांनी तीन दिवसात पाणी देतो व तोपर्यंत प्रभाग निहाय ट्यांकर ने पाणी देऊ मात्र ग्रामसेवक 
नेताजी भाबड उपस्थित नसल्याने काहीसे तणाव पूर्ण वातवरण तयार झाले होते . सरपंच व ग्रामसेवक दोन्ही उपस्थित नसल्याने नागरिकांच्या रोषास उपसरपंच
गोकुळ कानकाटे यांना सामोरे जावे लागले . आंदोलन कर्त्यांनी उपसरपंच गोकुळ कानकाटे यांच्या कडे लेखी आश्वासन ची मागणी करताच त्यांनी त्यास नकार
दिल्याने सामाजिक कार्यकर्ते विनय सावंत व त्यांच्या मध्ये शाब्दिक बाचाबाची झाली . यावेळी राजूर गटातील जि . प . सदस्या सुनीताताई भांगरे यांनी टाळे ठोकण्याचा
निर्णय घेत विविध घोषणांनी राजूर ग्रामपंचायत चा निषेद नोंदवला . यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि गेली ४० वर्ष राजूर मधील नागरिकांना त्यांच्या मुलभूत  सुख सुविधान
पासून वंचित ठेवण्यात आले असून आज हि पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे . वारंवार निवेदन देवूनही हि राजूर ग्रामपंचायत गांभीर्य पूर्वक घेत नाही उपसरपंच
निवेदन न घेता राजकारणाच्या भाषा बोलतात तर पेसा अंतगत आलेला पाणी योजनेचा निधी इतरत्र वळविला जात असून ग्रामपंचायत सदस्य च ठेकेदारी करीत आहे . त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहे . दोन दिवसात देशमुख वाडी सह राजूर च्या नागरिकांना पाणी दिले नाही तर टिकुरे
मोर्चा काढण्यात येईल . दारूचे हफ्ते घेता मंग पाण्याचे काय असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला . राजूर च्या ग्रामसेवकास दप्तर्र लिखाण येत नसून तो आदिवासी
नागरिकांना अरे रवि करतो त्यामुळे त्याची बदली झाली पाहिजे . व मागील १० वर्ष चे लेखापरीक्षण झाले पाहिजे . यावेळी विनय सावंत म्हणाले कि ४० वर्ष
राज्य केले कोणाचा विकास केला , तुम्हाला साधे लोकांना पाणी देता येत नाही तुम्ही कसले राज्यकर्ते .दारू बरोबर आता पाणी सुद्धा विकणे सुरु झाले आहे . भाबड नावाचा
माणूस राजूर वर राज्य करू पाहत आहे . सर्व खोटे नाटे जिरवण्यासाठी भाबड नावाचा ग्रामसेवक हाताशी धरला आहे . एक हाती सत्ता ठेऊन हुकुमशाही पद्धतीने सध्या
कारभार सुरु आहे . दर वर्षी ८ लाख रुपये येतात त्याचा हिशोब कोण देयील अशा प्रश्न त्यांनी उपस्थित केला . यावेळी जि . प . सदस्य किरण लहामटे म्हाणाले
कि एक वर्षापूर्वी दिलेल्या अश्वशाना चे काय . २४ तास पाणी देणारे आज कोठे आहे . मासिक मिटिंग वेळेवर होत नाही , समित्या स्थापन झाल्या नाही आधी प्रश्न
उपस्थित करून प्रकल्प कार्यालयात तून पाण्याच्या नावाखाली किती बिले काढली असे ते म्हणाले .यावेळी  बहुसंख्य देशमुख वाडी , राजूर ग्रामस्थ ,उपस्थित होते , संतोष मृतड्क , काशिनाथ भडांगे , रामदास पवार , पंचायत समिती सदस्य दत्तात्रय देशमुख ग्रामपंचायत सदस्य , अतुल देशमुख , सौ .कुसुम  रावते, सौ . पुष्पा लहामटे , सौ वनिता देशमुख , सौ . विमल भडांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या  चौकट ---पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी . टी . लावरे यांनी दोन ते तीन दिवसात नळपाणीपुरवठा सुरळीत होईल तसेच तोपर्यंत प्रभाग निहाय टँकर ने पाणी वाटप करण्यात येईल देशमुख वाडीला तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणा राबवली जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तीन तासाने थम्बविण्यात आले आहे सोबत फोटो -rju १७प १,२,३ ४,५,६



No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...