Thursday, April 13, 2017

येडूआई यात्रेत हजारो बकऱ्या व कोंबड्यांची आहुती देत लाखो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा संपन्न प्रशासन व्यवस्था मात्र ढिसाळ

महत्वाची बातमी - येडूआई यात्रेत हजारो बकऱ्या व कोंबड्यांची आहुती देत लाखो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा संपन्न प्रशासन व्यवस्था मात्र ढिसाळ

 

म . टा . वृत्तसेवा , अकोले - : महाराष्ट्रातील आदिवासी भिल्ल समाजाची कुलदेवता व पंढरी असलेल्या " येडूबाई देवी  " च्या जत्रेत लाखो भिल्ल समाज बांधव व भाविकांनी दर्शन घेतले तर नवसपूर्ती म्हणून कोंबड्या व हजारो बकरांची आहुती देण्यात आली . यावेळी देवीचा जयजयकार करत  अंगावर असूड मारत , कापूर जाळत , लोटांगण घेत भिल्ल समाजाने गडावर जाऊन एकच जल्लोष केला .महाराष्ट्रातील भिल्ल समाजाचा हा एकमेव उत्सव असून एकमेकांचे सुख दुखं ,सवांद ,लग्न कार्य ,न्यायनिवाडा यासाठी भिल्ल बांधव आपला मुक्काम वाढवतात यात्रेचे  वैशिष्टे म्हणजे एकमेकांना जगायला बळ  व उर्जा मिळते अखिल भिल्ल समाजाचे आराध्यदैवत असल्याने वर्षभरात इथल्या जत्रेला हजेरी लावली नाही असा भिल्ल बांधव विरळच अकोले येथील अगस्ती आश्रमात भरणाऱ्या यात्रे ला होणाऱ्या  गर्दी इतकीच गर्दी इथे पाहायला मिळते एरवी शांत , निवांत अंधाराच्या कुशीत पहुडलेले मुळा खोरे यात्रेच्या  निमित्ताने चार सहा दिवस सारखे जागते राहते .महाराष्ट्र व बाहेरील राज्यातून लोक इथे येतात १० एप्रिल ते १३ एप्रिल या चार दिवसात दोन लाखापेक्षा अधिक भिल्ल समाज व भाविकांनी देवीचे दर्शन घेतले
अकोले तालुक्यातील पिपंळ दरीच्या येडूबाई गडाचा परिसर ,महाराष्ट्र भरातून हजारोच्या संख्येनी जमलेले भिल्ल बांधव त्यांच्या  शेतांमध्ये पडलेल्या राहुट्या  जागा मिळावी म्हणून ३ दिवस अगोदरच आलेले त्यांचे सर्व कुटुंब व जत्रेत नवस पुरती साठी गडाच्या खाली असलेल्या " वाघाई व गाडीवान "या देवतासमान असणाऱ्या मंदिरासमोर दिड  हजारपेक्षा अधिक मुलांनीमार्फत  (मुस्लिम समाजाचे लोक )बकारांची देण्यात आलेली आहुती ,निघालेली पारंपारिक वाद्य डफ , हलगीच्या निनादात व तालावर म्हटली जाणारी पारंपारिक देवीची महती सागणारे खड्या आवाजात म्हटली जाणारी पारंपारिक" गवने "हजारोच्या संख्येने निघालेल्या काठ्या , व त्यासोबत देवीचा गडावर चालवलेला नैवैध्य , त्याच वेळी ४० एकरपरिसरात तीन दगडावर पेटवलेल्या चुली व त्यावर शिजणारे मटन  हे दृश्य म्हणजे भिल्ल समाजाची येडूबाई विषयी असलेली श्रद्धा व त्याला अहुतीची असणारी काळी किनार असे दृश्य पाहायला मिळाले . अकोल्यापासून ३२ किलोमीटर वर असणारे पिपंऴदरी गाव तिथे गडावर येडूबाई चे १८५० पासूनचे सर्वे नंबर ५८ मध्ये मंदिर आहे . या मंदिराची दर चैत्र पोर्णिमे च्या दुसर्या दिवशी येथे जत्रा  व यात्रा भरते तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवास पहाटे  ४ वाजता मांडे कुटुंबियांच्या  हस्ते देवीला अभिषेक करून होते. सकाळी ८ वाजेपर्यंत हा कार्यक्रम झाल्यानंतर ८. ३० ला मुकुट ,चोळी , पातळ व अलंकार मांडव डहाळ्या व पारंपारिक वाद्याच्या गजरात गडावर जाऊन देवीला पोशाख नेसविला जातो . दुपारी २ वाजता गोंधळ व देवीच्या आरती व गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर दुपारी ४ वाजता  देवीची काठी निघते त्याला देवीचा छबिना म्हणतात या काठीची मिरवणूक पिंपऴ दरी गावातून निघते यावेळी वाद्य वाजवून काठी नाचवली जाते तर नवसपूर्ती साठी अंगावर असूड  मारणे , गडापर्यंत लोटांगण घालणे , देवीचे अंगात येउन गडावर हाई।  हाई करीत गडावर  धावत  जाने आदी परंपरा भिल्ल समाज जपतो तर मुलाचा नवस असेल तर यावेळी नवसपूर्ती करण्यात येते तीन दिवस भिल्ल  समाज देवीच्या ओव्या व गीते म्हणतात त्यामुळे भक्तिमय वातावरण तयार होते . सायंकाळी ५ वाजता छबिना च्या काठ्या मंदिराच्या कळसाला लागल्यावर मुख्य कार्यक्रमाला सुरवात होते  कोंबड्या बोकड घेऊन भक्त व नवसपूर्ती वाले वाघाई  व गाडीवान या दिशेने जाऊन तिथे   नवसपूर्ती फेडण्यासाठी सुमारे दोन हजार बोकडांची व कोंबड्यांची आहुती दिली गेली . यावेळी बकराच्या ओरडण्याचा आवाज आसमंतात गेला हे पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते . त्यानंतर भिल्ल समाजाच्या चुली पेटल्या व यावेळी तमाश्या कलावंतानी हजेरी लाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले . या येडूबाई मंदिराच्या बाबत भिल्ल समाज व ग्रामस्थ यांच्यात मतभेद आहे . गडावर शासनाने पायऱ्या  ,वीज द्यावी हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावे अशी मागणी दिलीप बर्डे व सुभाष पवार यांचे मत आहे मात्र शासन याबाबीकडे दुर्लक्ष्य करीत आहे गडाची जागा वनक्षेत्रात येत असून ती मंदिराल देऊन कायमस्वरूपी तिचा विकास व्हावा असेही भिल्ल समाजाचे पुढारी म्हणतात  . देवस्थानचे विश्वस्थ रामदास पंधे बाबा यांनी मंदिर उभारणीसाठी व सोयी सुविधांसाठी सरकार व समाज यांनी मदत करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे . तर सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला खरात ,रंजना गावंडे , सखुबाई जाधव यांनी हजार बकरे व कोंबड्यांचा बळी देण्याऐवजी हा नवस फेडताना बकरे सोडून त्याचा लिलाव करून ती रक्कम देवस्थान विकास व भिल्ल समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिल्यास हत्या होणार नाही . व सामाजिक काम होईल . मात्र भिल्ल समाजाचे दिलीप  बर्डे चंदू बर्डे यांनी हि प्रथा बंद होणार नाही आम्ही देवीला बळी देत नाही भिल्ल समाज वाघाई व गाडीवानला बोकड देऊन जल्लोष करतात . देवीला भाजी भाकरीचा नैवद्य  दिला जातो याबाबत कुणीही अडचण अणु  नये व आमच्या धार्मिक भावना बिघडू नये असे भिल्ल समाजाचे म्हणणे आहे . चौकट - आदिवासी भिल्ल समाजाच्या या कुलदेवतेच्या यात्रेला राज्यातून मोठी गर्दी होत असते मात्र आदिवासी विकास , वन  विभाग व जिल्हा प्रशासन याबाबीकडे गांभीर्याने पाहत नसल्याने या ठीकानी यात्राचे नियोजन बिघडते  , तसेच भाविकांची सोयी सुविधा वीज , पाण्याची व्यवस्था याबाबतही धावपळ उडते शिवाय या यात्रेत ग्यास भडका झाल्याने चार जण जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात कोट - कैलास शेळके ---दरवर्षी येडू आईची यात्रा भरते लाखो भाविक येथे येत असतात मंदिर व्यवस्थापन व वन पर्यटन मधून सुंदर मंदिर व परिसर असून यात्रेत  मात्र प्रशासनाचा वचक व अंकुश नसल्याने अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे . तर सरकार दरबारी हे देवस्थान साठी निधी मिल्ने आवश्यक आहे ह . भ . प . बाळा महाराज रंधे (मुख्य ट्रस्टी , येडू आई मंदिर )-सालाबादप्रमाणे या वर्षी मोठ्या संख्येनी भाविक यात्रेसाठी आले होते मात्र अधिक लोक व त्यात एका बाजूला डोंगर व दुसऱ्या बाजूला मुळा नदी असल्याने जागा अपुरी पडते पुढील वर्षी येडूआई मंदिर असलेल्या डोंगरावर सपाटीकरण करून त्या ठिकाणी यात्रा भरविण्याचा विचार आहे , सध्या पायऱ्या व मंदिरावर शेड असून या देवस्थानला की दर्जा प्राप्त झाल्यास अधिक निधी मिळून मंदिराचे काम रास्ता , व वाहनतळ इत्यादी सुविधा करता येईल याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठविला असून मंजुरी मिळणे आवश्यक आहे मंदिर ट्रस्ट  व भिल्ल समाज यामध्ये कोणतेही वाद नसून समन्वयाने  काम चालू आहे , चौकट ---दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी येतात मात्र पोलीस बळ अपुरे असून एका बाजूला डोंगर व दुसऱ्या बाजूला मुळा नदी वाहत असते त्यात अरुंद रस्ता व लाखो भाविक वाहनतळ नसल्याने एकच गर्दी होते अचानक डोंगरावरून दगड कोसळला तर तो मोठी हानीही घडवू शकतो त्यामुळे घटना होण्या अगोदर जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधिकारी व संबंधित खात्याने बसून याबाबत निर्णय घेणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे . तर या यात्रेत मोठ्या प्रमाणात दारूचा प्रभाव असून त्यावरही पायबंद घालणे आवश्यक आहे .   सोबत फोटो - 
5 Attachments










No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...