Saturday, April 15, 2017

"भव्य घोरपडा आई पालखी व पदयात्रा" जागर आदिवासी देवी देवतांचा...!

राजूर , ता . १६:आदिवासी मित्र मंडळ, गंभीरवाडी, कामगार मित्र मंडळ गंभीरवाडी व आदिवासी विचार मंच (महाराष्ट्र राज्य) आयोजित,

पंचक्रोशीत प्रथमच...

"भव्य घोरपडा आई पालखी व पदयात्रा"

जागर आदिवासी देवी देवतांचा...!

दि. १४ व १ ५एप्रिल २०१७ रोजी आयोजित करून १०० किलोमीटर भर उन्हात पायी चालत आदिवासी महिलांनी पालखी पायी आणून रंधाफॉल येथील घोरपड देवीच्या मंदिरात येऊन जल्लोष केला मग यंत्राला सुरुवात झाली .

गंभीरवाडी, ता. इगतपुरी, जि. नाशिक ते रंधा (घोरपडा आई मंदिर), ता. अकोले, जि. अहमदनगर येथे पदार्पण होताच रंधा येथील आदिवासी समाज व भाविकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले पुढील वर्षी मोठ्या संख्येने महिला यात सहभागी होणार असल्याचे सविता भांगरे यांनी सांगितले कवी तुकाराम धांडे यांनी या पालखीसाठी व पदयात्रा बाबत मार्गदर्शन केले , कोट - सुमनताई धांडे -(सामाजिक कार्यकर्त्या आदिवासी समाज )हे पहिले वर्ष असून ५० महिलांनी  घोरपड देवीची पायी पालखी आणून नाशिक आणि नगर जिल्ह्यातील आदिवासी समाज जोडण्याचे काम सुरु केले असून महाराष्ट्रभर हि पालखी फिरून आदिवासी जोडो अभियान राबविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे . तर तुकाराम धांडे  यांनी बोलताना आदिवासी समाज विखुरला असून घोरपड देवीच्या यात्रे च्या माध्यमातून आम्ही आदिवासी समाज जागृती करणार आहोत . आमच्या या अभियानात तनिष्का महिला गटही सहभागी झाले आहेत सोबत फोटो १६p ३,४,५  घोरपड देवीची पालखी घेऊन महिलांनी घोरपड देवीच्या यात्रा



No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...