Sunday, April 2, 2017

lagn samudayik ashok bhangare

 अकोले तालुका आदिवासी मित्रमंडळ व अकोले तालुका पश्चिम विभाग वारकरी संस्था अकोले , या संस्थानी सामुदायिक विवाह सोहळ्यात घेतलेल्या उडीला जोरदार प्रतिसाद मिळत असुन त्यांची पहिली सुरूवात चिंचोडी येथील सोमा रामा मधे या युवकाच्या मुलाच्या लग्नाने झाली आहे . त्याने आपल्या मुलाच्या मांडवाच्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा मान पान व आहेर न घेताच आपल्या मुलाचा लग्न सोहळा पार पाडला . यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ . सुनीता भांगरे , माजी सरपंच दिलीप भांगरे , सुरेश गभाले , विजय भांगरे उपस्थित होते . 
    अकोले तालुक्यातील आदिवासी मित्र मंडळ व तालुक्यातील पश्चिम विभागातील वारकरी समाज मंडळीनी  सामुदायिक विवाह सोहळा घडवुन आणण्यासाठी प्रचार व प्रसार मोहीत राबवणे चालु केले असुन या कार्यास त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे . वारकरी संप्रदायाचे जेष्ठ कंपनी ही प्रत्येक गावामध्ये जाऊन विवाहाला मान पान व आहेर न करण्याची विंनती करत आहेत . सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न केल्यास वधु व वर पक्षाच्या पालकांचा होणारा खर्च हा कमी होण्यास मदतच होणार आहे . 
    चिंचोंडी येथील सोमा रामा मधे यांच्या लग्न कार्याचा विवाह सोहळा हा माहीती पडताच सामुदायिक विवाह संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हा विवाह कोणत्यांही मानापानाने पार पाडु नये अशी विंनती केली . त्याने कार्यकर्यांच्या विनंतीस मान देऊन आपल्या दारातील मांडवात कोणताही मान पान न करता प्रत्येकाला श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन गौरव केला . याकामी सोमा रामा मधे यांचे मन वळविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सौ सुनिताताई भांगरे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोकराव भांगरे यांनी मोलाची भुमिका बजावली . पहिला विवाह सोहळा हा पांजरे या गावी गरुवारी दिं १३/४/२०१७ रोजी पार  पडणार असल्याची घोषणा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे . त्यासाठी मंडळाकडे नोंदणी करण्याची विनंती करण्यात आली आहे . या लग्न सोहळ्यात विवाह करण्यात आलेल्या जोडप्याला शासनाकड मिळणारी रक्कम ही वधु व वरांच्या खात्यात जमा होणार आहे . याशिवाय पुरोहीतांनाही लग्न तारखा देताना मंडळाशी चर्चा करुणच देण्याची विंनती मंडळाकडुन करण्यात आली आहे , याशिवाय ज्या वधु वरांच्या पालकांनी लग्नाची पुर्ववत तयारी अगोदरच केलेली आहे त्यांचे माना पानाचे कपडे सदर व्यापार्यास परत करण्याची जबाबदारी मंडळाने घेतली आहे .
     या सोहळ्याला योग्य स्वरुप देण्यासाठी झालेल्या बैठकिसाठी अशोकराव भांगरे , दिलीपराव भांगरे , विठ्ठल बापु खाडे , आंनदराव खाडे , हिरामण सोनवणे , पांडुरंग ईदे , बाबुराव अस्वले , तुकाराम भोरु गभाले , हभप देवराम महाराज ईदे , आंनदराव मधे , मंगळा पटेकर, राजेंद्र मधे , कुडंलिक खाडे , पुनाजी सगभोर , देवराम भांगरे , सुरेश गभाले , सुरेश घाटकर , मधु भांगरे , लक्ष्मण उघडे , युवराज उघडे , यशंवंत बांडे , चंदर बांडे , शंकर झडे , शंकर घारे ,सोमा नावजी मधे , लक्ष्मण भांगरे , सारोक्ते गुरुजी , दशरथ झडे , मुरलीधर मधे  व शेंडी तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .सोबत फोटो rju २प ३,४

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...