Monday, April 17, 2017

म . टा . वृत्तसेवा , अकोले -अकोले तालुक्यात शालेय पोषण आहारात सातत्य नसल्यानी जिल्हापरिषद व माध्यमिक शाळांचे धान्य संपले आहे तर आठ महिने उलटून गेले तरी अद्याप भाजीपाला ,ग्यास व स्वयपाक करणाऱ्या महिलांना व कर्मचारी वर्गाला पैसे न मिळाल्यानी शाळा अडचणीत सापडल्या आहेत . यासंदर्भात मुख्याध्यापक संघांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार वजा विनती केली आहे .  सध्या मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत . येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात जूनपासून तरी शालेय पोषण आहाराचे योग्य नियोजन करावे असे पालक वर्गातून मागणी जोर धरू लागली आहे . आदिवासी व अतिदुर्गम भागातील मुला मुलीनी शिक्षणाच्या  प्रवाहात  यावीत म्हणून शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरु केली . मात्र त्यात अनेक अडचणी येत असून प्रभावीपणे हि योजना चालवली जात नसल्याचे चित्र आहे . सध्या येणारे धान्य ,कडधान्य काही प्रमाणत खराब असून मिरची पावडर तर गेली अनेक महिन्यापासून खराब येत आहे मात्र बोलायचे कुणाला आपण बोललो तर आपणच वाईट यामुळे शिक्षक गप्प आहेत त्यात अधिकारी तपासणीला आल्यावर कडक शेरे देणार २ किलो धान्य  कमी आले तर वसुली ठरलेली त्यामुळे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ,मात्र  काही जागृत मुख्याधापक पुढे आले असून त्यांनी शालेय पोषण अधीक्षक यांना याबाबत कळविले आहे . दररोज छोटी शाळा असली तरी १५ ते २० किलो भात शिजवावा लागतो खाजगी स्वयपाक करणारा असेल तर त्याला किलोमागे कमीतकमी २० रुपयेम्हणजे दिवसाला एका वेळी २०० रुपये मजुरी मिळते द् . मात्र ३० रुपये मजुरीने शाळांमध्ये काम करणाऱ्या महिला बचत गटाच्या महिलांना मजुरी मिळते तीही नियमित नाही अलीकडे तर ८ महिन्याची मजुरी शासनाने दिलीच नाही . त्यमुळे मुख्याध्यापक , शिक्षक यांनी वर्गणी काढून पैसे द्यावे लागतात  हि माणसे स्वयपाक करण्यास टाळाटाळ करतात . ग्यास चे तसेच आत्ता ९ टाक्या मिळतात त्य्हि ग्रामीण भागात वेळेवर नाही . कधीकधी जादा पैसे देऊन टाकी घ्यावी लागते . तर लाकडे हि मिळत नाही मिळाले तर ८ रुपये किलो त्याचा वहातुक खर्च वेगळाच ,भाजीपाला मध्यंतरी महाग झाला होता त्यवेळी शिक्षक मंडळींची एकच धावपळ उडाली होती .तरिदेखिल जे अनुदान आहे तेव्हडेच त्यातच भागवा असा शिक्षण खात्याचा फतवा . आज शिक्षक ज्ञान दानाचे काम करण्या पेक्षा भाजीपाला ,ग्यास ,लाकडे ,शोधण्यासाठी धडपडताना दिसत आहे . यासंदर्भात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी शालेय पोषण आहार योजना त्रयस्थ यंत्रणेकडे द्यावी ,येणारे धान्य विशेषता मिरची पावडर खराब असून ८ महिन्यापासून अनुदान नसल्यामुळे आम्ही वर्गणी काढून खर्च भगवतो ,उशिरा पैसे मिळत असल्यानी स्वयपाक करणारे लोक काम करण्यास टाळाटाळ करतात . यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे . यासंदर्भात जिल्हापरिषद व माध्यमिक शिक्षकांचे हेच मत आहे कोट-.डॉ . अजित नवले (माकप )- तालुक्यातील शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिलांना ३० रुपये रोज असून त्यात वाढ करून त्यांना नियमित पगार मिळावा अन्यथा या प्रश्नात लक्ष्य घालून आम्हाला शिक्षण विभागाला व सरकारला जाब विचारावा लागेल याची नोंद घ्यावी

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...