Sunday, April 2, 2017

अकोले- ठाणे व अहमदनगर जिल्ह्याला जोडणार्‍या शहापूर-घाटघर रस्त्याचे २००१ मध्ये

म. टा . वृत्तसेवा ,अकोले- ठाणे व अहमदनगर जिल्ह्याला जोडणार्‍या शहापूर-घाटघर रस्त्याचे २००१ मध्ये सर्वेक्षण  होऊन ही गेली १५ वर्षे हा रास्ता रखडला होता  . लालफीत च्या कारभारात अडकलेल्या या रस्त्याचे पुन :सर्व्हेसाठी  तसेच शासनस्तरावरील विविध परवानग्यासाठी२०१६-१७या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे . त्यामुळे या कामाला वेग येणार आहे व अकोले मुंबई अंतरी कमी होणार आहे . या रस्त्यासाठी जमीन संपादन व सर्वेषणाचेकाम लवकरच सुरु होणार   असल्याची माहिती माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी महारष्ट्र टाईम्स शी बोलताना दिली आहे . गेली दहा वर्षापासून खासदार झाल्यानंतर या भागाला वेळोवेळी भेट देऊन प्रसंगी पायी दौरा करून हा रस्ता होण्यासाठी मुख्यमंत्री ,सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहे . तर सध्याच्या सरकार मध्ये असणाऱ्या मंत्री व खासदार यांना हा रस्ता किती महत्वाचा व आदिवासी तरुणांना रोजगार , पर्यटन याबाबी सांगून प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे . तर पुढे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे वाकचौरे म्हणाले आदिवासी भागातील इको सेन्सिटिव्ह , तोलारखिंड हे प्रश्न धसास लावण्यासाठी लवकरच दिल्ली येथे जाउन प्रश्न सोडवणार असल्याचे हि ते म्हणाले यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे , धनंजय संत , भाऊसाहेब वाकचौरे , वसंत मानकर आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...