Sunday, April 2, 2017

अकोले , ता . २१:अकोले तालुक्यातील उपसासिंचन योजना कोट्यावधी रुपये खर्चून गेली दहा वर्ष उलटूनही अद्याप कार्यान्वित न झाल्याने आदिवासी  शेतकरी संतप्त झाले असून या योजनाची चौकशी होऊन आदिवासी विकास खात्याकडून वर्ग केलेला निधी अधिकारी व ठेकेदार यांचेकडून वसूल करावा अशी मागणी आज चिंचोडी येथे झालेल्या आदिवासी शेतकरी बैठकीत करून याचा निर्णय न झाल्यास संबधित खात्याच्या कार्यालयासमोर उपोषण  करण्याचा निर्धार बैठकीत झाला . यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ . किरण लहामटे , पंचायत सामिती सदस्य दिलीप भांगरे , धोंडीबा सोंगाळ , सुरेश गभाले , आनंदा मधे , मंगळा पटेकर , शरद कोंडा र , रामनाथ भांगरे उपस्थित होते . यावेळी अकोले तालुक्यातील पश्चिम भाग असलेल्या चिचोंडी , वारुंघुशी , वाकी , मान्हेरे , कातलापूर , गुहिरे या उपसा सिंचन योजना दहा वर्ष उलटूनही अद्याप कार्यान्वित झाल्या नाही . या योजना साठी प्रत्येकी साडेतीन कोटी रुपये शासनाचे खर्च झाले असून या योजना सुरु होण्यापूर्वीच मोडकळीस आल्या आहेत . पंप हाउस खराब झाले असून मोटारी गायब आहेत पाइप उघडे असल्याने ते फुटले आहेत , रोहीत्रही गायब झाले आहे .  ठेकेदार गायब तर अधिकारी उत्तरे देत नाही . शासनाच कोट्यावधी रुपये खर्च झाला हे कागदावर दिसत असून प्रत्यक्ष मात्र योजनाच कार्यान्वित नाही . प्रकल्पात बाधित व विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी ह्या बहुउद्देशीय योजनाचा वाजत गाजत शुभारंभ झाला मात्र अर्धवट योजना करून हे का म बंद पडले आहे . या योजनेची चौकशी होऊन अधिकारी व ठेकेदारावर कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्री , जलसंपदा मंत्री , जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदन पाठ विण्यात आले आहे . मात्र सरकारने याची चौकशी केली नाही तर ल घु पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण केले जाइल असा इशारा देण्यात आला आहे . तर ग्रामपंचायत मध्ये तसा ठराव करून पाठविण्यात आला असल्याचे आनंद मधे , सुरेश गभाले यांनी सांगितले आहे .

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...