Wednesday, April 25, 2018

लक्ष्य विधानसभा








म . टा . वृत्त सेवा , अकोले -"आली आली डोंगरची काळी मैना "दहा रुपयाला आठवा , घ्याल तर


म . टा .  वृत्त सेवा , अकोले -"आली आली डोंगरची काळी मैना "दहा रुपयाला आठवा , घ्याल तर हसाल न घ्याल तर फसाल , अशी जोरदार आरोळी ठोकत आदिवासी भागातील वाडी वस्तीवरील शाळेतील पोरं  बांबूच्या व प्लॅस्टीकच्या  टोकरीत काळे करवंन्दे घेऊन पर्यटकांना आर्जवी करीत असताना दिसू लागली आहे तर पर्यटकही मोहित होऊन हि करवंदे घेण्यासाठी आपल्या वातानुकूलित गाड्या  रस्त्याच्या कडेला उभ्या करून या मुलांकडून डोंगरची काळी मैना घेताना दिसत आहे . आदिवासी भागाला निसर्गाचे वरदान लाभल्याने कळसुबाई - हरीशचंद्र गड परिसरात आंबळे , करवंदे , जांभळे , मोहाची फुले , आळवे हि फळे व काही ठिकाणी रानफुलेही चमकू लागल्याने या निसर्गातून परिसरातील  आदिवासी छोट्या मुलांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे . तर या मिळालेल्या पैशातून हे विधार्थी शाळेतील सहल व शालेय साहित्य घेण्यासाठी वापर करतात असे सोमा प थवे  हा विधार्थी म्हणाला
आदिवासींचा रानमेवा डोंगरची काळीमैना नावाने ओळख असणार्‍याआंबट गोड चवीचे काळेभोर "करवंद" नावाचे फळ पिकु लागल्याने व शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने चिमुकल्यांना रोजगार मिळवून देवु लागला असुन चिमुकले शालेय विद्यार्थी बाजारपेठेमध्ये विक्री करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
        अकोले तालुक्यातील पश्चिम भागातील भंडारदरा परिसरात मुरशेत,पांजरे,रतनवाडी,घाटघर,वा
की,मुतखेल आदी ठिकाणी असणाऱ्या जंगलात करवंदाच्या काटेरी जाळ्या भरपूर प्रमाणात असुन साधारण एप्रिल महिन्याच्या अखेरीस या काटेरी जाळ्यांना आंबटगोड चवीचे काळेभोर गोल आकाराचे फळ पिकण्यास सुरुवात होते.त्यालाच आदिवासी ग्रामीण भागात रानमेवा म्हणुन संबोधले जाते.एप्रिल महिन्यात परीक्षा संपली की दररोज पहाटे लवकर उठायचे हातात पाटी एवजी डोक्यावर पाटी (टोपली)घ्यायची व जंगलचा रस्ता धरायचा जंगलातील काटेरी जाळ्यांना पिकलेली करवंदे तोडुन जमा करायची व पिंपळाच्या,वडाच्या झाडांच्या पानांची डोमे (द्रोण)तयार करून त्यामध्ये वाटे तयार करून सकाळी भंडारदरा बाजारपेठेत,बगीचा,पर्यटन निवास महामंडळ परिसर,महामंडळाच्या बसेस मध्ये करवंदे घ्या करंवदे आवाज देत विक्री करत रोजगार मिळवायचा.विशेष बाब म्हणजे विक्री करणारे सर्व 10 ते 15 वयोगटातील शालेय विद्यार्थी असून 50 ते 100 रुपये विक्री करतात.साधारण महिनाभर चालणाऱ्या या व्यवसायातातुन मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग शालेय उपयोगी सामान खरेदी करण्यासाठी होत असल्याची माहिती शेंडी गावठा येथील ईयत्ता चौथीत शिकणाऱ्या राहुल बोऱ्हाडे या चिमुकल्याने सांगितले.आदिवासी ग्रामीण भागातील डोंगराच्या काळ्या मैनेला गावात जरी योग्य भाव मिळत नसलातरी शहरी भागात 80ते100 रुपये किलो भाव मिळतो मात्र शहरी भागातील बाजारपेठेत जाण्यासाठी वाहतूक खर्च परवडत नसल्याचे देखील यांनी सांगितले. चौकट -
हिंदीत करौंदा, करुम्चा: शास्त्रीय नाव: कॅरिसा कंजेस्टा) हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे. करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.
करवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते.
कोट ---सौ . राहीबाई पोपेरे --सेंद्रिय शेती  आदिवासी भागातील महिलांना रोजगार मिळाला आहे तर करवंन्दे व जंगली फळे आमच्या छोटया मुलांना रोजगार मिळवून देत आहे .  तोंडातून काही काव्यही बाहेर आले हिरव्या पानामंधी करवंद
जिभेवर लाळ घोळवती
उघडा-नागडा आदिवासी
परी संस्कृती सदा जपती

काळ्या मैनेचे हे प्रेम
चाखली हजारोंनी माया
कातळ-कपारितला गोडवा
नांगरताना गायी आभाळमाया

काटयांचे असणे कधी
करवंदाला टोचत नाही
संकटांचे जगणे बाई
सरकारला बोचत नाही

हिरवाईचा शालू बघा कसा
करवंद जपतो आहे
फाटलेली मने विकासाची
आदिवासी शिवतो आहे

उघड्या माळरानावर सदा
जाळी करवंदाची रूपवती
योजनांचा वंचित राजा
सह्याद्री संस्कृती पेरती

राकट देशा , कणखर देशा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला लोककलांची

म . टा . वृत्तसेवा , अकोले --राकट देशा , कणखर देशा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला लोककलांची समृद्ध अशी परंपरा लाभली आहे . तमाशा , भारूड , कीर्तन , आदिवासींची विविध नृत्यप्रकार , नाटक ,संगीत आखाडी , लोकनाट्य , जागरण गोंधळ , वासुदेवाची गाणी अशा कलांनीच मराठी माणसांच्या वृत्ती घडविल्या यातील तमाशा म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव ग्रामीण महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रियता या कला प्रकाराला लाभली काळाच्या ओघात अपरिहार्यपणे काही बदल तमाशा स्वरूपाला आले असले तरी तमाशात काही अपप्रवृत्ती शिरल्या असल्या तरी अजूनही हि कला मराठी माणसांच्या मनात घर करून आहे. विठाबाई मांग , काळू बाळू, चंद्रकांत ढवळपुरीकर , तुकाराम खेडकर , कांताबाई सातारकर ,दत्त महाडिक पुणेकर ,आदी तमाशा कलाकारांनी आपल्या कलेद्वारे महाराष्ट्रात अनेक वर्षे मनोरंजन व प्रबोधन केले . तमाशा हा महाराष्ट्राचा प्रमुख कला प्रकार लोकप्रिय असला तरी या प्रकाराला शासन दरबारी पाहिजे तशी प्रतिष्ठा मिळालेली नाही . राज्य पातळीवर विविध संस्था , राज्य सरकार अनेक पुरस्काराद्वारे तमाशा कलावंतांना सन्मानित करीत असले तरी देश पातळीवर मात्र महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या या कलेची विशेष दखल घेतली गेली नाही अशी खंत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे . हिंदी चित्रपट सृष्टीतील ५ते १० वर्ष काम केलेल्या आणि अल्पावधीतच विस्तारित जाणाऱ्या अनेक कलावंतांना कलाकार म्हणून पदं पुरस्काराने गौरविण्यात आले आहे मात्र आजपर्यंत एकही तमाशा कलावंताला पदं पुरस्कार मिळालेला नाही अनेक्दाशके तमाशाच्या माध्यमातून कलेची सेवा करणाऱ्या कांताबाई सातारकर , मालती इनामदार ,मंगल बनसोडे यासारख्या एखाद्या तमाशा कलावंताला हा पुरस्कार मिळाल्यास त्या कलावंत बरोबर तमाशा कलेचाही गौरव होईल . आज वयाच्या ८० च्या उंबरठ्यावर असलेल्या कांताबाई सातारकर या अशाच एक उपेक्षित राहिलेल्या तमाशा कलावंत  एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना
कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर खेडकर, मुली
अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित,अभिजित,नात पूजा, जावई दीपकराव मेंगजी, गोतान्बर सौन्दाडेकर, राजेश खोल्लम
असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे. त्यांच्या जीवनावर डॉ संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या
आजवर चार आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला जीवन गौरव
पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना
तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात तंबू लाऊन सिने, नाट्य सृष्टीतील मान्यवरांसाठी
तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमान त्यांना मिळाला आहे. असंख्य पुरस्कार, असंख्य मानसन्मान मिळवलेल्या या महान
कलावतीला मात्र रसिकांचे प्रेम हाच आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान वाटतो. मात्र काही तरी खंतही त्यांच्या मनात सलत आहे त्यांच्याशी बातचीत करताना त्या म्हणाल्या   मी कांताबाई सातारकर, गेली ६५ वर्षे तमाशा क्षेत्रात कार्यरत आहे. माझे पती (कै) तुकाराम खेडकर यांची
तमाशामहर्षी म्हणून अवघ्या मराठी मुलखात ख्याती होती आणि आहे. खरतर तमाशा ही महाराष्ट्राची अस्सल
लोककला पण पण ज्यांच्यासाठी तमाशा नाही आणि ज्यांचा तमाशाशी दुरान्वये संबंध नाही अशा लोकांनी उच्चभ्रू
वर्तुळात तमाशाला बदनाम केले. तमाशा म्हणजे काहीतरी वाईट अशी हाकाटी पिटली. यामुळेच सरकारी
पातळीवरदेखील तमाशाबद्दल एक अनास्था दिसून येते. जगात असे एखादे क्षेत्र आहे का जिथे कोणत्याही अपप्रवृत्ती
नाहीत, थोडेबहुत वाईट लोक नाहीत ? पण मग तमाशालाच आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते.
मी १९५० पासून तमाशात काम करते, आज माझे वय ७८ वर्षाचे आहे. मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्री वेश
परिधान केला त्याच सगळ्या महाराष्ट्राने कौतुक केले. या कलाकारांबद्दल मला मनापासून आदरच आहे पण ही
कांताबाई पाच पाच हजार प्रेक्षकांपुढे शिवाजी साकारते, संभाजी साकारते, तलवार- दांडपट्टा फिरवते, प्रेक्षकांच्या
काळजात धस्स होईपर्यंत एखाद्या कसलेल्या योध्ध्याप्रमाणे रंगमंचावर लढाई खेळते, शेकडो ऐतिहासिक, धार्मिक,
सामाजिक वगनाट्यात भूमिका करून समाज प्रबोधन करते. महाराष्ट्रातल्या एकही आजवर असा एकही प्रेक्षक
सापडणार नाही कि जो सांगेल कि कांताबाईने या या दिवशी आम्हाला मान खाली घालायला भाग पाडले असा
तमाशा केला. साहेब १९५० ते जवळपास १९८५ पर्यंत मी केवळ समाज घडवण्याचेच काम केले. खरेतर काही गोष्टी
सांगायला नको पण मी आणि माझा मुलगा रघुवीर खेडकर याने मिळून आजवर दरवर्षी १० ते १५ तमाशाचे खेळ
शाळा खोल्या, वाचनालय, कुणाचे ऑपरेशन, कुठले तरी मंदिर अशा समाजोपयोगी कामासाठी केले आहेत. या
खेळांचे एक रुपया सुद्धा उत्पन्न न घेता आम्ही दोन ते अडीच कोटी रुपयांची मदत या लोकांना मिळवून दिली आहे.
सांगायचे तात्पर्य हेच कि तमाशासुद्धा समाजात काही चांगले करू शकतो हे आम्ही कृतीतून दाखवून दिले आहे.
साहेब आता एकाच इच्छा आहे कि मायबाप सरकार सगळ्या क्षेत्रात पद्म पुरस्कार देते पण आजवर कोणत्याही
सरकारला तमाशा कलावंताला पद्म पुरस्कार द्यावा वाटला नाही किंवा सरकार पर्यंत आमची बाजू पोहचलीही
नसेल. तमाशा सृष्टीत स्वतःच्या हिमतीवर तमाशा फड उभी करणारी पहिली महिला कलावंत मी आहे. माझे पती
तुकाराम खेडकर यांचे निधन झाल्यावर त्यांच्या तमाशातला सुतळीचा तोडा देखील मला मिळाला नाही ... पण मी
माझी जिद्द सोडली नाही, स्वतःचा तमाशा फड उभा केला आज मला सांगायला अभिमान वाटतो कि माझा मुलगा
रघुवीर खेडकर हा फड समर्थपणे पुढे नेतोय आणि महाराष्ट्रातला नंबर एकचा तमाशा म्हणून लौकिक मिळवतो आहे.
या सगळ्या गोष्टींचा विचार करता माझे डोळे मिटण्यापूर्वी मायबाप सरकारने माझ्यासारख्या कलावंताला पद्म
पुरस्कार देऊन केवळ माझा नव्हे तर तमाशा सृष्टीचा सन्मान करावा... महाराष्ट्राच्या अस्सल लोककलेचा सन्मान
करावा तसे पाहिल्यास प्रत्येक तमाशा कलावती ही विठाबाईचेच जीवन जगत असते. संघर्ष, गरिबी, पुरुषी वर्चस्व, निरक्षरता, आपल्या गणगोतांकडून होणारी फसवणूक, प्रकृती या साऱ्या समस्यांचा सामना     पती तुकाराम खेडकरांच्या अचानक जाण्याने आकाशच कोसळलं. घरचा धनी, फडाचा मालक असा अचानक गेला... पैशांची तरतूद नव्हती. चरितार्थाचा प्रश्न होता. फडही विस्कळीत झाला. पण कांताबाई स्वस्थ बसणाऱ्यातल्या नव्हत्या. त्यांनी पुन्हा जुळवाजुळव केली. पुन्हा फड उभा राहिला. मराठी मुलखातल्या तमाम जनतेच्या मनोरंजनासाठी ढोलकीच्या तालावर कांताबाईंचे घुंगरू पुन्हा नाचू लागले. भिंगरीसारख्या नाचणाऱ्या कांताबाईंच्या तमाशाचे तंबू हजारो लोकांच्या उपस्थितीने गावोगावी ओसंडत वाहू लागले. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात वर्षाकाठी दोनशे सव्वादोनशे दिवस फडातील दोनशे कामकरी, कलाकारांसह आपल्या परंपरागत कलेने मराठी मनाला रिझविण्यासाठी फिरणाऱ्या कांताबाई आजही आपल्याच मस्तीत दंग आहेत. फडाच्या रूपानं खेडकरांचं नाव जिवंत ठेवलं. मुलगा रघुवीर फड चालविण्यास समर्थ बनला. रसिकांचं उदंड प्रेम मिळालं. कलाकाराला आणखी काय हवं? भल्या पहाटेची शुक्राची चांदणी आजही त्यांना याद देते लडिवाळपणे रेंगाळणाऱ्या त्या दिवसातल्या लावणीची!
कोट -डॉ . संतोष खेडलेकर -(लोककलेचे अभ्यासक )- कांताबाई सातारकर, गेली ६५ वर्षे तमाशा क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांचे  पती (कै) तुकाराम खेडकर यांची
तमाशामहर्षी म्हणून अवघ्या मराठी मुलखात ख्याती होती आणि आहे. खरतर तमाशा ही महाराष्ट्राची अस्सल
लोककला पण पण ज्यांच्यासाठी तमाशा नाही आणि ज्यांचा तमाशाशी दुरान्वये संबंध नाही अशा लोकांनी उच्चभ्रू
वर्तुळात तमाशाला बदनाम केले. तमाशा म्हणजे काहीतरी वाईट अशी हाकाटी पिटली. यामुळेच सरकारी
पातळीवरदेखील तमाशाबद्दल एक अनास्था दिसून येते. जगात असे एखादे क्षेत्र आहे का जिथे कोणत्याही अपप्रवृत्ती
नाहीत, थोडेबहुत वाईट लोक नाहीत ? पण मग तमाशालाच आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते.मायबाप सरकारने याबाबत पाऊले उचलावीत व तमाशा कलावंतांना न्याय द्यावा हीच माफक अपेक्षा

2 Attachments

Monday, April 23, 2018

शेकरू











म . टा . वृत्तसेवा , अकोले : -हरिशचंद्र गड -कळसुबाई अभयारण्यात गतवर्षीपेक्षा पाचपट म्हणजे १५६शेकरू वाढल्याचे नुकत्याच झालेल्या शिरगनति नुसार स्पष्ट झाले आहे . वन्य जीव विभागाच्या माहितीनुर या अभयारण्यात आतापर्यंत शेकरूंची घरटी ५९९आढळले आहेत मात्र त्यांची संख्या १५६ असून हि संख्या वाढल्याने वन्यप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे मात्र त्यांचे संवर्धन करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यकता असून तसे प्रयत्न वनविभागाकडून होणे गरजेचे आहे .पावसाळा सुरु होण्यापूर्वी शेकरू नवीन घरटी बनवितात यामुळे शेकरूंची गणना मे मध्ये केली जाते . पहिल्या टप्प्यात शेकरूंची संख्या प्राप्त झाली असून हे सर्वेक्षण जूनच्या पहिल्या आठ्वड्यापर्यंत सुरु असते त्यामुळे अंतिम आकडा हा जून ला मिळेल असे वनविभागाचे मत आहे . हि गणना "जीपीएस "(ग्लोबल पोझिशनींग )या तंत्राद्वारे केली जाते यंदा त्या पद्धतीने केलेल्या गणनेत शेकरूंची आकडा वाढू शकतो अशी आशा उपवनसरंक्षक एम . के . अर्नाळकर यांनी व्यक्त केली आहे . अभयारण्यातील इतरत्र त्यांचा अधिवास आहे का , याचा अभ्यास करणार असल्याचे वनक्षेत्रपाल आडे यांनी सांगितले . अकोले तालुक्यात शेकरूंची नोंद करण्याचे काम काही अंशी झाले असून हरीश्चन्द्र गड अभयारण्यात वापरातील व वापरात नसलेली ५९९ घरटी आढळली असून एकूण १३९ शेकरू या परिसरात असून कळसुबाई घाटघर परिसरात १७ शेकरू असून तिथेही ४३ घरटी आढळली आहे तर गतवर्षी प्राणी पक्षासह अभयारण्य क्षेत्रात २८० प्राणी व ४५० पक्षी आढळले असल्याची माहिती वनाधिकारी आडे . यांनी दिली आहे . चौकट -- शेकरू ...... वजन दोन ते अडीच किलो , लांबी अडीच ते तीन फूट असलेल्या शेकरूंची डोळे गुंजी सारखे लाल असतात त्याला मिशा , अंगभर तपकिरी तलम कोट आणि गेल्यावर , पोटावर पिवळसर पट्टा , झुबकेदार लांब शेपूट असते , शेकरू वर्षातून एकदाच डिसेंबर - जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते . एक शेकरू झाडाच्या बारीक फांद्यावर सहा ते आठ घरटी तयार करते ते १५ ते २० फुटाची लांब उडी मारू शकते . विविध फळे व फुलातील मध हे त्याचे खाद्य असते . महाराष्ट्रात भीमशनकर , कळसुबाई हरीशचंद्रगड अभयारण्य , आजोबा डोंगररांगांमध्ये , माहुली , वासोटा , मेळघाट , ताडोबात हे शेकरू आढळतात शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलात याचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्याची संख्या नजरेला भरण्याइतकी वाढली आहे. विशेषतः सह्याद्रीलगत असलेल्या नारळ, पोफळींच्या बागांमध्ये हा प्राणी हमखास दर्शन देऊ लागला आहे. दाट लाल रंगाचा, आकर्षक शेपटी असलेल्या शेकरूच्या जोड्या नारळाच्या बागांमधून लीलया उड्या मारताना दिसतात. पूर्वी इतक्‍या सहज वस्त्यांलगत त्याचे ..वास्तव्य सोबत फोटो . 2 Attachments










बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...